दिवाळी सणाच्या तारखा| तिथी|व पूजा विधी वेळा- Diwali 2024 |Rituals time table
चौदा वर्षांचा वनवास संपवून रामाचे आयोध्येस परतणे म्हणजे दिवाळी| शुभ दीपावली |Diwali 2024
दिवाळीचा दीपोत्सव नवा प्रकाश घेवून येत आहे. हा प्रकाश मनातल्या आशंकांचा अंधार उजळत जाणार आहे. उमेदीचे आकाश-कंदील घराचे उंबरठे प्रकाशित करणार आहे. नव वस्त्रांचे रेशिम धागे मनाची जीवन आसक्ती गंधित करणार आहे.
दीपोत्सव का साजरा केला जातो: विविध मान्यता
लंकेश्वर रावणाचा वध करून जेव्हा प्रभू रामचंद्र सीता, लक्ष्मण व हनुमानासह आयोध्येला परतले तो दिवस दीपोत्सव करून अयोध्या वासियांनी साजरा केला होता. त्या दिवशी / रात्री कार्तिक महिन्यातील अमावस्या असल्याने, त्या रात्री जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येत परतले, तेव्हा अयोध्येतील लोकांनी प्रभु रामचंद्रांचे स्वागत दिवे लावून आणि घरांमध्ये रंगोळी काढून केले. आसमंत अंधारले होते पण पृथ्वी वर स्वर्ग वत प्रकाश उजळला होता.
दक्षिणेतील मान्यता
- दक्षिण भारतात मात्र, लोक हा सण भगवान कृष्णाने नरकासुर राक्षसाचा पराभव केल्याच्या निमित्ताने साजरा करतात.
- गोवा राज्यात नरकासुराच्या विशाल प्रतिमा चौकांमध्ये उभ्या करून त्याच्या वधाचा देखावा दाखवण्यात येतो.
- याशिवाय असेही मानले जाते की भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा विवाह ह्याच दिवशी झाला.
- काही परंपरागत कथा सांगतात की देवी लक्ष्मीचा जन्म देखील कार्तिक महिन्यातील अमावस्येला झाला.
Girls at a shop for Diwali shopping |
रांगोळ्या, खरेदी, मिष्टान्न व रोशनाई
Girl doing Rangoli work for Diwali |
पंचांगानुसार २०२४ च्या दिवाळी सणाच्या तिथी, तारखा, सणाचे दिवस, आणि पूजनाची वेळ खालीलप्रमाणे आहे: Diwali Time Table:2024
यंदा (२०२४) लक्ष्मी पूजन मुहूर्ताबाबत संभ्रम | लक्ष्मी पूजन ३१ ऑक्टोबर रोजी की १ नोव्हेंबर रोजी?
| सण / दिवस | तिथी | दिनांक २०२४ | पूजन वेळ |
- २८ ऑक्टोबर २०२४| वसुबारस | गोवत्स द्वादशी | सूर्योदय ते सूर्यास्त - गाय वासरू पूजन
- २९ ऑक्टोबर २०२४| धनत्रयोदशी (धनतेरस) | भौम प्रदोष गुरूद्वादशी |पूजन मुहूर्त सायंकाळी ७:२७ ते रात्री ९:१६ दरम्यान आहे. |
- ३१ ऑक्टोबर २०२४| नरक चतुर्दशी | अभ्यंग स्नान | पहाटे |
- १ नोव्हेंबर २०२४| लक्ष्मीपूजन (मुख्य दिवाळी) | दर्श अमावस्या |पूजन : दुपारी ३ ते ५:१५ | सायंकाळी ६ ते ८:३५ | रात्री ९:१० ते १०:४५ |
- २ नोव्हेंबर २०२४| बळी प्रतिपदा / पाडवा | कार्तिक मास आरंभ | संपूर्ण दिवस - रात्री ८:३० पर्यंत|
- ३ नोव्हेंबर २०२४| भाऊबीज | यम द्वितीया | सकाळी ११.३० वाजेपर्यंत सौभाग्य योग |
- १३ नोव्हेंबर २०२४| तुळशी विवाह | त्रिपुरारी पौर्णिमा-महालय समाप्ती|पूजन मुहूर्त १२ नोव्हेंबर संध्याकाळी ४:४ ते १३ नोव्हेंबर ते दुपारी ०१: ०१ वाजेपर्यंत |
- १६ नोव्हेंबर| देव दिवाळी | वाराणसी येथे मोठा दीपोत्सव असतो.
* Disclaimer: भौगोलिक स्थान व विविध पंचांग व पारंपारीकतां नुसार प्रमाण पूजन वेळेत तफावत असू शकते . तसेच यंदाच्या लक्ष्मी पूजनाच्या पूजा विधी वेळेसंदर्भात समाजात संभ्रम दिसून येत आहे . वर नमूद केलेली लक्ष्मी पूजन वेळ बरोबर असल्याचा आमचा दावा नाही . लक्ष्मी पूजनाच्या अचूक स्थानिक वेळेसाठी अनुभवी स्थानिक पंडितांचा सल्ला घ्यावा ही विनंती.
शुभ दीपावली
Kids enjoying Diwali festivity |
0 टिप्पण्या