Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

चीनचा Manus AI आणि V शांताराम यांचा माणूस चित्रपट

 


Image of Human like AI Robot walking on the city road with word MANUS super imposed
China's MANUS  the most advanced AI

MANUS AI !? चीनचा अती प्रगत AI आणि V शांताराम यांचा माणूस चित्रपट

Marathi Film poster
Poster of Marathi film MANUS(1946) Courtesy: Google 



"Artificial intelligence क्षेत्रात वेगाने प्रगती करणार्या चीनने  MANUS  नावाचा अती प्रगत AI रोबोट लाँच केला आहे. MANUS शब्दाचा मराठी अर्थ पहाता हा विरोधाभास विचार करायला लावतो व V. शांताराम यांनी बनवलेल्या ‘माणूस’ (१९३९) या classic मराठी चित्रपटाच्या निर्मितीची आठवण यातून‌ होते.


V शांताराम यांनी माणूस हा चित्रपट का बनवला होता

माणूस (१९३९) हा मराठीतील एक क्लासिक चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन थोर चित्रपटकार V. शांताराम यांनी केले. हा चित्रपट हिंदीमध्ये 'आदमी' या नावाने ही प्रदर्शित झाला होता.

त्या काळात दिलीप कुमार यांच्या 'देवदास' या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर तरुण पिढीमध्ये नैराश्य आणि पराभूत मानसिकता fad प्रमाणे पसरली होती. प्रेमात अपयश आले की आत्महत्या हा एकच पर्याय आहे, अशी भावना वाढू लागली होती. या चित्रपटाने अपयशालाच एक प्रकारचा  दर्जा दिला होता, जो समाजासाठी घातक ठरू शकत होता.

V शांताराम हे चित्र पाहून व्यथित झाले. हा तरुणांवर झालेला नकारात्मक प्रभाव बदलण्यासाठी वी. शांताराम यांनी माणूस हा चित्रपट तयार केला.

MANUS अर्थात माणूस हा चित्रपट एका असामान्य प्रेमाची कथा होती, जिथे प्रेम हे पुरुषाला जगण्याची ताकद बनते. ही एका पोलीस शिपाई आणि वेश्या यांच्यातील प्रेमकहाणी होती. 

V शांताराम यांचा 'डॉक्टर कोटणिस की अमर कहानी' हा चीन च्या पार्श्वभूमीवरील चित्रपट : माणुस पणाची गोष्ट 

'डॉक्टर कोटणिस की अमर कहानी' (1946) हा V शांताराम यांचा दुसरा एक चित्रपट देश सीमा ओलांडून माणूस पणाची साद देणारा दुसरा एक चित्रपट योगायोगाने चीनच्या पार्श्वभूमीवर घडलेली सत्य कथा होती.  मराठी माणुस डॉक्टर कोटणिस यांच्या माणुसपणाची ही गोष्ट होती.

1938 मधे चीन-जपान युद्धा दरम्यान भारताकडून पाठवलेल्या वैद्यकीय मदत चमूचे ते प्रमुख होते.  अतीशय खडतर व प्रतीकूल परिस्थिती मधे प्राण पणाला लावून डॉक्टर कोटणिस यांनी युद्धात घायाळ झालेल्या चीनी सैनिकांचे उपचार व सुश्रुषा केली होती. डॉक्टर कोटणिस यांना चीन आजही विसरले नाही. चीनी लोक डॉक्टर कोटणिस यांना "के दिहुआ" नावाने ओळखतात.माणुसकीचे उच्चतम उदाहरण डॉक्टर कोटणिसांनी चीनला दिले. 


सर्व काही गमावलेले असले तरीही स्वतः चा आत्मसन्मान आणि दुसर्यावरचे प्रेम या माणुसकी घ्या मूलभूत तत्वावर आपण पुन्हा उभे राहू शकतो.यासाठी आपल्यातील ‘माणूस’ जिवंत ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे असा संदेश V शांताराम यांच्या माणूस  या चित्रपटात होता . आजच्या या मानवी प्रतिकृतींच्या (cloning) युगात माणुसपण टिकवायचे असेल तर एकच उपाय आहे—तो म्हणजे आपल्या आतली संवेदनशीलता व आत्मसन्मान टिकवून  ठेवणे.

चीनने अत्याधुनिक MANUS AI बाजारात उतरवला असला तरी माणसाच्या भावनिकतेचे cloning तो कितपत करू शकेल याबद्दल शंका आहे. डॉक्टर कोटणिस यांनी दाखवलेले माणुसपण किंवा माणुसकी चीनचा Manus AI दाखवू शकणे अशक्य आहे.


निष्कर्ष 

 चीनच्या अतीप्नगत AI agent चे नाव MANUS असे ठेवले असले तरी भावनिक पातळीवर एक रोबोट कधीच ‘माणूस’ होऊ शकत नाही हे सत्य आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या