Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

Diwali चे आकाश‌ कंदील खरेदी : प्रकार आणि किमती

 दिवाळी चे आकाश कंदील: प्रकार, सौंदर्य आणि बाजारातील किंमती

Diwali lamp stall
नवनवीन प्रकार चे आकाश कंदील बाजारात उपलब्ध 


दिवाळीचा दीपोत्सव आकाश कंदीला शिवाय साजरा होवूच शकत नाही.


दिवाळी मधे घराच्या दारात स्टुलावर चढून कंदील लावायचा आणि नंतर लाईटच बटन on करताच गॅलरीत पडणारा मंद रंगीत प्रकाश अनुभवायचा. सगळ्यात प्रथम दिवाळी आली असे सांगतो तो हा आकाश‌ कंदीलाचा  दारातील प्रकाशच .बाजारात दरवर्षी विविध प्रकारचे आकाश कंदील उपलब्ध असतात . या लेखात आपण आकाश कंदीलांच्या विविध प्रकारांबद्दल आणि त्यांची सध्याची बाजारातील किंमती यावर एक नजर टाकूया.
Two kids doing Diwali decoration
दारात आकाशकंदील लावताना बच्चेकंपनी 


 १. पारंपारिक असे कागदाचे चे आकाश कंदील

कागदाचे आकाश कंदील सर्वात जुने व साधारणपणे सर्वत्र उपलब्ध असलेले आहेत. हे कंदील जिलेटिन किंवा पतंगाच्या कागदाच्या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असतात. बांबू च्या काड्या वापरून हे घरी ही बनवता येतात . चांदणी, षटकोनी व गोल अशा तीन आकारात हे बनवता येतात.  पेपर कंदीलांच्या किमती साधारणतः रु. ५० ते रु. २५० पर्यंत असतात, ज्यात आकार, रंग, व शैलीनुसार किंमत बदलते.

Two boys engaged in making Diwali lantern
बच्चेकंपनी पारंपारिक आकाश कंदील बनवताना

२. प्लास्टिकचे आकाश कंदील

प्लास्टिकचे कंदील हे रंगीबेरंगी, टिकाऊ आणि दीर्घकालीन असतात. हे पाण्याला आणि हवामान बदलांना तोंड देऊ शकतात, ज्यामुळे हे बाहेरच्या सजावटीसाठी लोकप्रिय आहेत. बहुतांशी चीन मधून आयात केलेल्या या कंदीलांच्या किमती साधारणतः रु. १०० ते रु. ५०० पर्यंत असतात. काही खास डिझाइन्समध्ये किंमत वाढू शकते. तुम्ही पर्यावरण प्रेमी असाल‌ तर‌ या‌ कंदीलांना नक्कीच टाळणार किंवा‌ टाळावे.


३. कापडी आकाश कंदील

कापडी आकाश कंदील हे टिकाऊपणासाठी आणि आकर्षकतेसाठी ओळखले जातात. हे विशेषतः हस्तकलेने बनवलेले असतात आणि अनेक वेळा हाताने रंगवले जातात. कापडी कंदीलांमध्ये वारंवार वापर करता येतो, म्हणूनच ते चांगले पर्याय मानले जातात. त्यांची किंमत साधारणतः रु. ३०० ते रु. १५०० दरम्यान असते, जी कंदीलाच्या आकार, रंग आणि हस्तकलेच्या गुणवत्तेनुसार बदलू शकते. दिवाळी नंतर हे कंदील बेडरूम किंवा मुख्य दालनात decorative lamp सारखे ही वापरता येवू शकतात.


४. एलईडी आकाश कंदील

तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले एलईडी आकाश कंदील हल्ली लोकप्रिय होत आहेत. हे रंगीत आणि विविध प्रकारचे प्रकाश देणारे कंदील असतात. या कंदीलांमध्ये मोड्स, डिझाइन्स आणि लाईट्स बदलण्याचे पर्याय असतात, ज्यामुळे दिवाळीच्या रोषणाईला नवीनता येते. यांचे दर साधारणतः रु. ५०० पासून सुरु होतात आणि जटिल डिझाइन्समध्ये रु. २००० पर्यंत असू शकतात.


 ५. इको-फ्रेंडली आकाश कंदील

पर्यावरणस्नेही कंदीलांचा वापर वाढत आहे. हे मुख्यतः बॅम्बू, पाम पानं, ज्यूट, आणि पुनर्वापरित कागदाच्या साहाय्याने बनवले जातात. इको-फ्रेंडली कंदील हे पर्यावरणाची काळजी घेत असलेल्या लोकांसाठी उत्तम पर्याय आहेत. हे कंदील साधारणतः रु. १५० ते रु. १००० पर्यंत उपलब्ध आहेत.


 ६. वायरल डिझाइन आकाश कंदील

दरवर्षी काही खास डिझाइन्स बाजारात येतात, ज्यांना लोक सोशल मीडियावरून घेतात किंवा त्याबद्दल जाणून घेतात. हे डिझाइन्स हल्ली लोकप्रिय आहेत, विशेषतः बाल गटात आणि तरुणाईत. अशा कंदीलांच्या किमती रु. ५०० ते रु. २००० पर्यंत असू शकतात, कधी कधी त्याहूनही अधिक.


७. मॉडर्न कलात्मक (aesthetic) आकाश कंदील 

हे आकाशकंदील काच, कापड व दोरे यांच्या संयुक्त वापराने बनवलेले असतात.  हे थोडे महाग श्रेणीतील आकाशकंदील असतात. पारंपारिक ते घ्या पलीकडे सौंदर्य अनुभूतीचा महत्त्व देवुन हे बनवलेले असतात. चोखंदळ व जास्त पैसे खर्च करण्याची तयारी असलेल्या ग्राहकांसाठी हे‌ कलात्मक व‌ majestic feel देणारे‌ आकाशकंदील असतात.
Designer Diwali lanterns
Majestic feel देणारे कलात्मक आकाश कंदील 




कंदील खरेदी करताना टिप्स

1. बजेट निश्चित करा – खरेदी करण्यापूर्वी बजेट ठरवा, कारण त्यानुसार पर्याय उपलब्ध आहेत.

2. मटेरियल तपासा – प्लास्टिक, कागद, कापड यापैकी पर्यावरणस्नेही पर्याय निवडणे फायद्याचे आहे.

3. स्थिरता आणि टिकाऊपणा बघा – हे कंदील दीर्घकाळ टिकणार की एकाच सणापुरते वापरायचे आहेत, ते ठरवूनच निवड करा.

4. बाजाराचा अभ्यास करा – ऑनलाइन आणि ऑफलाइन किमतींमध्ये फरक असतो. दोन्हीकडील तुलना करून निर्णय घ्या.


मुंबई तील आकाश कंदिलांचे प्रसिद्ध होलसेल मार्केट 

फोर्ट,सुतार गल्ली, 

मुंबई तील फोर्ट भागात crawferd मार्केट जवळील सुतार गल्लीत होलसेल भावात चांगले आकाश कंदील मिळतात. ही गल्ली दिवाळीत खरेदीसाठी तुडुंब भरलेली असते. 

माहिम, कंदील गल्ली 

माहिम च्या कंदिल गल्लीत अगदी ५० रुपयांपासून कंदील उपलब्ध असतात. दादर परेल या प्रामुख्याने मराठी संस्कृती असलेल्या भागाचे लोक माहिम च्या या कंदील गल्लीतूनच आकाश कंदील खरेदी करतात. 

दादर मार्कैट, गोखले रोड

दादर हा मराठी संस्कृती चा मुंबईतील गढच मानला जातो त्यामुळे इथल्या मार्केट मधेच एकूणच दिवाळी खरेदीची झुंबड असते. आकाश कंदीलांच्या इथे चांगल्या व्हरायटीज पहायला मिळतात.

निष्कर्ष

प्रत्येक कंदीलाचा स्वतःचा एक विशेष लूक आणि आकर्षण असते. दिवाळीच्या या प्रकाशमय सणामध्ये आकाश कंदीलांची शोभा आपल्या घराला सणासुदीचे रूप देते. त्यामुळे, आपल्या आवडीचे आणि बजेटला अनुरूप कंदील निवडून घर सजवा आणि दिवाळीला खास बनवा.


हे ही वाचा


दिवाळी म्हणजे रामाचे १४ वर्षांनंतर स्वगृही आगमन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या