बायनॉरल बीट्स binaural beats music | मन:शांती चा shortcut ?
Binaural Beats Article Thumbnail |
बायनॉरल बीट्स या संगीत तंत्राने मनोविकारांवर उपचार | जाणून घेवु या Binaural Beats Music बद्दल
binaural beats music Concept - संकल्पना
जर आपण आपल्या दोन्ही कानांनी प्रत्येकी व एकाच वेळी दोन वेगवेगळ्या frequency चे संगीत ऐकले तर आपल्या मेंदू मध्ये एक तिसरेच आभासी ध्वनी संगीत उत्पन्न होऊन ते आपणास ऐकू येते . या संगीताची frequency आपण ऐकत असलेल्या दोन वेगवेगळ्या संगीतातील frequency च्या फरका एवढी असते . आपला मेंदू दोन ध्वनीच्या frequency मधला फरक भरून काढण्यासाठी हे आभासी संगीत निर्माण करू शकतो. मेंदूच्या या क्षमतेचा वापर करत आपल्या मेंदूला विशिष्ट वा इच्छीत Hz च्या frequency वर Binaural Beats संगीत ऐकून आपल्यालाआणता येते.
binaural beats कशासाठी
असे म्हटले जाते की binaural beats संगीत ऐकल्या मुळे मानसिक तणाव कमी होतो व निद्रा नाश संपुष्टात येतो . आतापर्यंत binaural beats चा हा प्रभाव व्यक्ति गणिक वेगवेगळ्या पातळीवर असल्याचे दिसून आले आहे .
तसे कुठले ही संगीत हे मानवी मनाला शांती प्रदान करते व अनेक आध्यात्मिक ऊर्जा प्रवाहित करते ही गोष्ट सर्वमान्य आहे पण binaural beats ऐकणाऱ्यास क्षणात trans अवस्थेत घेवून जाते असा दावा binaural beats चे समर्थक करतात. हा दावा अमान्य करणारे मतप्रवाह ही आहेत हे वेगळे सांगायला नको.
ज्यांना निद्रानाश आहे असे लोक सर्वसाधारण पणे guided meditation , पॉडकास्ट वा मनः शांती दायक संगीत झोपण्यापूर्वी ऐकतात. यातच आता binaural beats हा एक नवा पर्याय वा उपाय लोकांसाठी उपलब्ध झाला आहे .
binaural beats frequency चे गणिती नियम
एकाच वेळी दोन्ही कानांनी ऐकल्या गेलेल्या वेगवेगळ्या frequency च्या फरका एवढी frequency ऐकणार्याचा मेंदू निर्मित करतो .
म्हणजेच :
जर एका कानाने 300 Hertz व दुसऱ्या कानाने 310 Hertz चे संगीत ऐकले तर ऐकणाऱ्याला 10 Hertz चे आभासी संगीत ऐकू येईल
नियम : दोन्ही कानात ऐकले जात असलेले संगीत 1000 Hz पेक्षा कमी असावे व दोन्ही तिल फरक 35 Hz पेक्षा कमी असावा
निर्मिती : जेव्हा आपला मेंदू दोन्ही कानांनी ऐकू येणाऱ्या दोन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी ऐकतो तेव्हा या दोन फ्रिक्वेन्सी मधला फरक भरून काढण्या साठी तो एक तिसरी फ्रिक्वेन्सी असणारे आभासी संगीत निर्माण करतो हेच ते binaural beats संगीत .
सातत्याने ऐकल्यास
जर binaural beats सातत्याने ऐकत राहिले तर हे संगीत आपल्या brain waves शी तादात्म्य पावते व परीणामत: binaural beats आपल्या मेंदूच्या लहरींचे संचलन (brain waves activity) आमूलाग्र पणे बदलते व आपली जाणीव अधिक तीव्र होते.
मेंदू लहरींवर आधारीत संकल्पना | पाच प्रकारच्या मेंदू लहरी
1) Gama - 30 Hz आणि पुढची frequency upto 50 Hz| एकाग्रता,ध्यान व शिकण्याची क्षमता,स्मरण शक्ती या लहरी देतात | या लहरी सर्वात वेगवान लहरी असतात.
Gama frequency च्या रेंज मधे Binaural beats ऐकल्यास मेंदूच्या वरील क्षमता वृद्धिंगत होता
2) Beta - 13 Hz ते 30 Hz | सर्वसाधारण दिनचर्येतील कार्यक्षमता संचलित होते | Activeness | सजगता |Good Mood
*पण या frequency मधे जास्त वाढ झाल्यास मन चिंता (Anxiety) ग्रस्त होते.
Beta frequency च्या रेंज मधे साधारणतः 15 Hz वर Binaural beats ऐकल्यास मेंदूच्या वरील क्षमता वृद्धिंगत होता
3) Alfa - 8 Hz ते 12.99 Hz frequency| निवांत वा काहीशी झोप आलेली अवस्था असताना Alfa frequency कार्यरत असते.
वरील frequency मधे व्यक्तीची सर्जनशीलता (Creativity) कार्यरत होते.
Binaural beats या Hz frequency वर ऐकल्यास वरील मनोवस्था सहज प्राप्त होते.
4)Theta - 4 Hz ते 7.99 Hz | झोपेची प्राथमिक व द्वितीय अवस्था |हल्की झोप | ध्यान धारणा
योग विद्येतील ध्यान धारणेची मानसिक पातळी Binaural beats 6 Hz frequency वर ऐकल्यावर गाठता येवू शकते
5) Delta - 1 Hz ते 3.99 Hz | गाढ झोप लागण्याची अवस्था
Delta waves म्हणजे सर्वात मंद गतीने संचलित होणाऱ्या मस्तिष्क लहरी.
मेंदूच्या या अवस्थेत व्यक्ती गाढ झोपेत जाते व तिला स्वप्न दिसण्याची शक्यता असते
summary and conclusion
विशिष्ट Hz च्या ध्वनी लहरींचे संगीत ऐकून मनाला विशिष्ट भाव भूमीकेत नेण्याचे तंत्र म्हणजेच Binaural Beats ही Music therapy आहे. हे तंत्र वापरावे वा वापरू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न असू शकतो. कुठल्याही तंत्राचे चांगले वाईट असे दोन्ही परिणाम दिसून येत असतात. व्यक्ती परत्वे अनूभूती बदलू शकते. या लेखा द्वारे समाजात रूढ होत असलेल्या एका नव्या संगीत थेरपीची ओळख करून देणे एवढाच उद्देश आहे.
FAQ
विशिष्ट Hz चे Binaural beat ध्वनी कुठे उपलब्ध असतात ?
ठराविक Hz च्या sound waves असलले binaural संगीत online उपलब्ध असते तसेच YouTube वर ही या ध्वनी फीती उपलब्ध असतात. हे ध्वनी ऐकताना दोन्ही कानांवर हेडफोन्स असणे गरजेचे असते व आवाज सौम्य पातळीवर असणे आवश्यक असते असे जाणकार सांगतात.
0 टिप्पण्या