तापत्या
उन्हात कियारा आडवानीचा थंड आमरस आणि पेप्सीकोचा कतरीना कैफला नारळ
Kiyara Advani replaces Katrina Kaif as brand ambassador for
PepsiCo’s SLICE beverage
PepsiCo ने
आंब्याच्या या हंगामात Slice च्या
त्यांच्या तब्बल १५
वर्षे जुन्या brand ambassador कॅटरीना कैफ ला नारळ
दिलाय . ही कॅटरीनाच्या करीअरची
डाऊन फ़ेज़ म्हणायची का ? कॅटरीनाचं
आमरस दुकान बंद करणारी ही
कियारा आडवानी आता आपल्याला स्लाईसचे
रसपुराण तिच्या मधाळ सौंदर्याची डूब देवून उन्हाळाभर
सांगत रहाणार आहे.
Sensuality to playfulness : The changing ad narrative
PepsiCo चं
अकाऊंट सांभाळनार्या Leo Burnett या जाहीरात कंपनीने
या आधी कॅटरीना
ची हाॅट इमेज वापरत ‘आमसूत्र’ अशी sensual ad campaign यशस्वीपणे राबवली होती. Leo Burnett ने ही ad campaign आता
sensuality कडून playful
mood कड़े वळवलेली दिसतेय.नव्या जाहिरातीत रँप वर चालण्यासाठी
सज्ज झालेली देखणी कियारा आडवाणि बाटलीतल्या स्लाईस चा एक घोट
घेते आणि आंब्याच्या रसमोहात
पूर्णपणे भान हरपून जाते.
Slice चा हा बाटलीतला आंबा
गर इतका खरा किंवा real आहे
की कियारा ला असा भास
होतो की तिच्या
हातात Slice ची बाटली नसून
पिकलेला रसभरीत आंबाच आहे ,मग कियारा या
बाटली-अंब्याला सोलून त्याचा रस अगदी हातावरून गळेपर्यंत
मंत्र मुग्ध अवस्थेत या आंब्याचा आस्वाद
घेत रहाते.. हे असं playful narrative या जाहिरातीत दिसून
येतं . कटरीना व कियाराच्या सौंदर्यात
उजव डाव करता येत
नाही . पण अभिनयाच्या मुद्द्यावर
कियाराचं पारडं ज़रा जडच आहे. कटरीना
च्या sensuality ला आव्हान देणारी
ही कियारा आडवाणी ‘अभिनय क्षमता’ या एका मुद्द्यावर
कटरीना पेक्षा ‘स-रस’ ठरू
शकते हे नक्की.
KBC च्या मागील सीझन मधे याच कियाराने हॉट सीट वरून उठून सूत्र संचालक अमिताभ बच्चन यांना पाणी पाजताना तुम्ही पाहिले असेलच . आता तिने जाहिरात क्षेत्रातील स्पर्धेत कतरीनाला पाणी पाजले आहे. आरसपाणी सौंदर्य लाभलेली ही कियारा आहे तरी कोण . गेल्या दशकभराच्या तिच्या सिने कारकिर्दितून तिने आपली ही अभिनय क्षमता बर्यापैकी सिद्ध करून दाखवलीय .
2014 च्या
फगली या चित्रपटातून पदार्पण
करणार्या कियारा आडवाणीने पुढे धोनी, कबीर सिंघ, गुड नीव्झ ,अशा
काही मोजक्या पन वैशिष्टपूर्ण चित्रपटांतून
दमदार अभिनय केलाय. 2018 च्या Lust Stories या Netflix सीरीज मधील तिची बोल्ड भूमिका चर्चेत होती. तसं कियाराचं खरं
नाव आलिया आहे पण आधीच एक आलिया भट इंडस्ट्रीत असताना
अजून एक आलिया नको
असं म्हणून दस्तुरखुद्द सलमान खान ने तिला
कियारा हे नवं screen name देवून तिचं बारसं केलय. सुपरस्टार सलमान कियाराचा family friend आहे व त्याअर्थी त्याने कियाराच्या करीअरची काळजी घेणे साहजीक आहे पण सलमानचीच find असलेल्या व सलमानची जुनी मैत्रीण असलेल्या कतरीना कैफ च्या जागी SLICE AD मधे कियाराचं रिप्लेस होणं यात सलमानचा हात असावा का अशी ही कुजबूज ऐकायला मिळतेय.
Kiyara’s Family
कियारा मुंबईकर आहे . तिचे वडील मूळचे लखनऊचे . मुंबईत ते यशस्वी व्यावसायिक
आहेत. कियाराची आई जेनेविव शिक्षिका
आहे व ती यूरोपियन वंशिय आहे. कियाराच्या आईची सावत्र आई भारती ही
प्रसिद्ध अभिनेते व 50 च्या दशकातील stylish star अशोककुमार यांची मुलगी . तसेच प्रसिद्ध उत्सफूर्त अभनेते सईद जाफ़री ( चश्मे
बद्दूर मधील लल्लन मियाँ) कियाराच्या आईचे काका.
अभिनयातील
दिग्गज अशा कुटुंबीयांचा वारसा सांगणारी कियारा आडवाणी या आंबा हंगामात
PepsiCo साठी Slice
beverage विकून किती गल्ला जमवते हे कळेलच तसेच
आजची तरूणाई खरंच sensuality पेक्षा playful narrative कडे आकर्षित होते
का याचीही उकल लवकरच होईल
.
-अविनाश घोडके
0 टिप्पण्या