Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

Parle G या  गोजिर्या बिस्किटचं नवं 'डार्क' रूप आणि आठवणीतलं धर्मा बिस्किट Parle G - Dark chocolate Remake of 90s favourite biscuits

Close shot of Parle G Dark biscuit pack. Pack is opened up and a hand seen holding newly launched dark biscuit of Parle

Iconic Film Agneepath's Dark Villain Kancha seen holding a phone. He is smiling devilishly while talking on phone

Be it Films or Biscuits: is the Remake of Cult Classic a good idea 

 अखेर पार्ले च ते धक्कादायक वाटणारं काळं बिस्किट घरी आणलं. चव ठीक वाटली पण पार्ले च्या त्या युनीक आयकाॅनिक चविपुढे हे आपलं उगिच काहितरी असं वाटलं. डार्क शब्दातून जी  mature sensuality आणि romance प्रतीत होतो त्याला पाकिटावरचं जुनंच cute baby  चं चित्र खूप विजोड वाटलं. तसं Parle G चं Parle G Bourbon Choco Biscuit हे आधीच मार्केट मधे उपलब्ध आहे . पण ज्या बिस्किटाला लहानपणापासून आपण आवडीने खात आलोय त्या cult बिस्किटाला पार्ले नी वेगळ्या remake स्वरूपात बाज़ारात आणलय . हा remake थोड़ा stunning ही आहे. तसे आपण कदाचित उगीचच सेंटी होत असू  पण पार्ले च्या या dark biscuit ने दशक भरा पूर्वीच्या एका cult film remake च्या काही आठवणी मात्र जाग्या केल्या.


 AGNEEPATH remake and Dharma biscuit story Parle - G : Why a brand image is put on stake?  for a new market ? 


 दहा वर्षांपूर्वी करण जोहर च्या धर्मा प्रॉडक्शन्स च्या जुन्या खार आॅफिस मधे काही काळ हजेरी लावत होतो.  धर्माचं इन हाऊस किचन होतं व एक धोतर शेंडीवाला आचारी  फारच उत्कृष्ट जेवण तिथं बनवत असे. महाराजजी ची भजी घातलेली 'दही कढी' फारच चविष्ट बनायची. संध्याकाळी चहा बरोबर मात्र फक्त आणि फक्त पारले जी बिस्किटांचं ते छोटसं पाकिट दिलं जायचं.  आॅफिस मधली तरूण असिस्टंट मंडळी Blackberry फोन वापरणारी श्रीमंता घरची पोरं होती.  चहा बरोबर हटकून मिळणाऱ्या या low profile brand biscuit ला त्यांनी चेष्टेने 'धर्मा बिस्किट' असं नामकरण करून टाकलं होतं. "Have some Dharma biscuit!" असं म्हणून  ते खि-खी करून हसायचे.  मध्यम वर्गियांसाठी पार्ले जी म्हणजे काय सेंटी प्रकरण आहे हे  त्या बिचार्यांना काय माहित. एखादा प्रस्थापित ब्रँड काळानुसार जाणून बुजून business strategy म्हणून बदलू पाहतो . असे बदलणे क्वचित अपघाती ही असते.  सातत्याने यशस्वी musical romantic असे  सिनेमे दिल्यानंतर धर्मा प्रोडक्शन सुद्धा feel good cinema देणारे  ब्रांड म्हणून प्रस्थापित झाले होते  आणि अग्नीपथ सारख्या action revenge story चं प्रोडक्शन सुरू झाल्यावर धर्माची ब्रांड इमेज डगमगत होती.  धर्माचा कुठलाही सिनेमा सुरू होण्या आधी त्यांचं अॅनिमेटेड लोगो चित्राचं ते सूर्य चक्र हळूवार पडद्यावर फिरू लागतं. व्हायोलीन्स च्या पार्श्वभूमीवर स्वप्नील भाव प्रदर्शित करणारं कोरस गायन  वगैरे  हे सर्व थिएटर मधील प्रेक्षकांना सूचित करतं की 'एक भाव विभोर हळुवार प्रेमकथा पाहण्यास आता सज्ज व्हा'  पण अशी हळुवार सुरूवात करून पडद्यावर अग्नीपथ चा अंगार आग ओकू लागला तर कसं  वाटेल या मुद्यावर धर्मा मधे  ही चर्चा झाली.  अखेर प्रमोशन काळातच प्रेक्षक या धक्यासाठी immune होतील असा युक्तिवाद पूढे आला.  जमेची अशी एक बाजू होती की अमिताभ बच्चन अभिनित मूळ अग्नीपथ हा धर्मानेच अर्थात करण च्या वडिलांनी यश जोहर यांनीच पूर्वी प्रोड्यूस केला होता.  ब्रांड इमेज चा धक्का पचवून धर्मा आपले commercial dynamics explore किंवा विस्तारीत करू  पहात  होता.  हे करण्यात चाणाक्ष करण जोहर यशस्वी झाला.  करण ने  आज OTT वर ही धर्मा ला expand केलय. आपली मूळ ओळख टिकवून त्याने  हे  केलय. काळा बरोबर बदलणे व्यवसायात तरी अपरिहार्य असते नाहीतर तुम्ही मागे पडता out dated होता.Status Symbol ठरलेल्या Black berry phone चं बघा . QWERTY key pad हा Blackberry Phone चा unique selling point होता पण कालांतराने हाच USP त्याला disadvantageous ठरला . iPhone चे आगमन होताच एवढा मोठा Blackberry Brand नामशेष झाला.Dark biscuit चं variant आणून Parle G ने बदलत्या जगाचा अंदाज घेत पाऊल टाकले आहे हे नक्की. Dedicated buyers ना पार्ले-जी ने वेगळ्या आकाराची  काळी बिस्किटे बाजारात आणली  असती  तर त्यात धक्कादायक असे  काही वाटले नसते  पण तीच आपली ओळखीची पार्ले बिस्किटे अचानक काळ्या रंगात पाहून "पार्ले ने हे काय केलं ?"असं आता तरी आपल्याला वाटतय. भारताला बिस्किट म्हणजे काय हे पार्ले बिस्किट मुळे कळले.  अशा या आद्य बिस्किट कंपनीने किती काळ ग्राहकांच्या भावना गोंजारत बसावे.  तुमचे आवडते बिस्किट आता डार्क स्वरूपातही उपलब्ध आहे  असा एक option  देवून  पुढल्या मोठ्या बदलांची नांदीच पार्ले जी ने दिलीय.  बाकी हे Parle G Dark Biscuit बिन दुधाच्या, म्हणजे Black Tea बरोबर मस्त जाते. बदल अपरीहार्य असतात . तो सृष्टीचा मूलभूत नियमच अाहे .अग्निपथ मधल्या Dark villain कांचा चा गीता उपदेश आठवतो ना ? “ क्या लेकर आया था .. क्या लेकर जायेगा!” ..कालाय तस्मै  नम: म्हणत बदल अनुभवून पहा... -अविनाश भानुआशा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या