Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

Cannes Film Festival 2024- a reportage-दबंग इराणी दिग्दर्शक Mohammad Rasoulof यांची हजेरी

 

Cannes Festival 2024 
जागतिक चित्रकर्मींचा मेळावा

Cannes  is more than red carpets and glamour; it's a platform for radical filmmakers like Mohammad Rasoulof.

रेडकार्पेट आणि त्यावर चालणाऱ्या देखण्या अभिनेत्रींचे डिझायनर गाऊन्स हा कांस महोत्सवाचा फक्त बाह्य चेहरा आहे.  कांस महोत्सवाचे अंतर्मन नेहमी सर्वसामान्यांचा लढा रुपेरी पडद्यावर मांडायला उत्सुक असते


Back image of Five person sitting on bench on hill top and gazing night sky
Official poster of Cannes Festival 2024.It features image of Akira Kurosava's Japanies Movie Rhapsody in August (1991)


77 वा Cannes Festival 14 मे ते 25 मे 2024 संपन्न होत आहे त्या निमित्ताने 
Article written by Avinash Bhanu Asha Ghodke 

Location Cannes a French riviera city

कांस शहर अर्थात सिनेमाची जागतिक पंढरी म्हटले गेलेले  दक्षिण फ्रांस मधील मेडिटेरिअन समुद्रा काठचे छोटेसे शहर कांस. 

अंदाजे 74000 लोकसंख्या असलेले कांस वार्षिक चित्रपट  महोत्सव असला की गजबजू लागते.या काळात या शहराची लोकगणना 2 लाख पर्यंत जाते म्हणजे लोकसंखेच्या दुप्पट हून अधिक होते . जगभरातून आलेल्या पाहुण्यांची उठबस हे शहर Cannes Film Festival च्या काळात करत असते. 


इतिहास

1938 साली कांस ची कल्पना प्रथम मांडण्यात आली व 1946 ला खर्या अर्थाने  या चित्रपट महोत्सवाची अधिकृत रित्या सुरूवात झाली तेंव्हापासून अव्याहतपणे Cannes Film Festival आयोजित होत आहे .2024 चा हा महोत्सव 77 वा Cannes Film Festival आहे. 


Indian celebs along with  YouTuber Nancy Tyagi in 77th On going Cannes Film Festival 2024

या वर्षीचा म्हणजे 2024 चा कांस  महोत्सव हा 77 वा महोत्सव आहे. भारतातून बाॅलिवूडचं प्रतिनिधित्व करण्यासाठी  ऐश्वर्या राय, शोभिता धुलीपाडा,दीपिका पडुकोन, प्रियांका चोप्रा, अदिती राव,ऊर्वशी राऊतेला, नमिता थापर,दीप्ती सधवानी व कियारा अडवानी या  देखण्या अभिनेत्री French riviera वर अवतरल्या आहेत. 


Middle class Delhi girl travelling in Rickshaw with shopping bag in hand
Nancy Tyagi travelling in Rickshaw to purchase her dress material 

या Bollywood अभिनेत्रींव्यतिरिक्त कांस मधे  एक उल्लेखनीय उपस्थिती लावणारी मुलगी म्हणजे नॅन्सी त्यागी Nancy Tyagi.  दिल्लीची मध्यम वर्गीय नॅन्सी युट्यूब व इंस्टाग्रामवर fashion posts टाकत असते. मोठ मोठ्या फॅशन डिझायनर च्या डिझाईन्स शी स्पर्धा करू शकतील अशी फॅशन परिधाने ती स्वतः हाताने चालविण्याच्या साध्या शिवण यंत्रावर शिवते व ती नेसून स्वतः माॅडेल म्हणून कॅमेर्या समोर आत्मविश्वासाने उभी रहाते. नॅन्सी चे सोशल मीडियावर 10 लाख हून अधिक फॉलोअर्स आहेत.  Cannes Festival ने  या मध्यमवर्गीय  self made fashion designer ला आमंत्रित करून एक नवा पायंडा घातला आहे. 


Jury and Opening Ceremony 

यंदा मुख्य स्पर्धेमधे विविध देशांचे एकूण 22 चित्रपट सहभागी आहेत व ग्रेटा गेरविंग Greta Gerwig ही अमेरिकन अभिनेत्री व दिग्दर्शिका प्रमुख ज्युरी म्हणून काम पहात आहेत.


14 मे 2024 रोजी उद्घाटन सोहळा संपन्न 

सोहळ्याची सुरूवात फ्रेंच अभिनेत्री कॅमिली कोटिन Camille Cottin हिच्या सूत्रसंचालनाने झाली आहे व सोहळ्याची सांगता ही तीच करणार आहे. 

The Second Act या चित्रपटाच्या प्रदर्शना ने मुख्य विभागातील स्पर्धेची सुरूवात झालेली आहे. 


Award Palme D'or

या प्रतिष्ठित स्पर्धेत विजयी होणार्या चित्रपटास कांस फेस्टिवल चा प्रसिद्ध पुरस्कार Palme D'or प्रदान करण्यात येईल. 1955 पासून हा पुरस्कार फेस्टिवल कमिटी द्वारा दिला जात आहे

3 Honorary Awards

या मुख्य पुरस्कारा व्यतिरिक्त 3  Honorary Awards कांस  जेष्ठ व श्रेष्ठ चित्रकर्मींना देत असते. 

1)या वर्षी  एक पुरस्कार अभिनेत्री मेरिल स्ट्रिप Meryl Streep ला उद्घाटन सोहळ्यात दिला गेला. 

2) दुसरा पुरस्कार  स्टुडिओ घिब्ले Studio Ghible  या संस्थेस 

3) तिसरा  पुरस्कार जॉर्ज लूकास George  Lucas या अभिनेत्यास सांगता सोहळ्यात देण्यात येणार आहे. 


या मुख्य स्पर्धा विभागा व्यतिरिक्त इतर काही विशेष आयोजनांअंतर्गत कांस फेस्टिवल मधे विविध चित्रपटांचे प्रदर्शन होत असते. 

 

This year's 'Striking' controversy

कांस ला कार्यान्वित करण्यासाठी  मोठे मनुष्यबळ लागते व यंदा या मनुष्यबळाने  कांस सुरू होण्याआधीच कामगार आघाडी चा झेंडा उंचावत संप (General Strike) पुकारला होता.   कांस ची अनिश्चित व घातक (precarious)  कार्यपद्धती चा हवाला देत त्यांनी हे पाऊल उचलले होते.  

जीवन मूल्यांना अंकित करणारे चित्रपट जिथे नावाजले जातात तिथेच जीवन मूल्यांसाठी लढा उभा राहिला होता हा यंदाच्या कांस फेस्टीवल चा विरोधाभासच म्हणावा लागेल.


Irani Director Mohammad Rasoulof on right and a still from his film The seed of Sacred Fig on left.  

इराणचे देशद्रोही घोषित दिग्दर्शक Muhammad Rasulof मुहम्मद  रसूलोफची इराण मधून पलायन करून Cannes festival मधे हजेरी

कांस ने नेहमीच शोषितांच्या जगण्याचे हुंकार मांडणाऱ्या चित्रपटांना पुरस्कृत केले आहे.  याच धरतीवर यंदा इराणच्या मुहम्मद रसूलोफ या जीवनवादी व मानवता वादी दिग्दर्शकाचा The Seed Of Sacred Fig या चित्रपटास मुख्य चित्रपट स्पर्धेत सहभागी केले आहे.  इस्लामी राष्ट्र असलेल्या ईराणमधे धर्माच्या नावाने अल्पसंख्यांकावर दडपशाही चे धोरण राबविण्यात येत आहे असे रसूलोफ चे म्हणने आहे.  ईराणी शासनाची ही बाजू  तो सातत्याने  आपल्या चित्रपटांतून निडरपणे मांडत आला आहे. The Seed Of Sacred Fig हा रसूलोफ चा 10 वा चित्रपट आहे.  ईराणी शासनाने या आधीही अनेकदा रसूलोफ वर अटक कारवाई केली आहे पण रसूलोफ बधला नाही.  मागील वर्षी म्हणजे 2023 ला रसूलोफ ला कांस चे ज्यूरी पद बहाल होते  पण तुरूंगात असल्या कारणाने  तो कांस ला येवू शकला नाही.   The Seed Of Sacred Fig या चित्रपटासाठी रसूलोफवर देशद्रोहाचा आरोप ठेवून त्याला 8 वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. कांस मधे  त्याने या चित्रपटाचे प्रदर्शन करू नये म्हणून  रसूलोफ वर दबाव आणन्यात आला पण या सर्व गदारोळातून मुहम्मद रसूलोफ गुप्तपणे ईराणमधून पलायन अरण्यात यशस्वी झाला व तो थेट कांस महोत्सवात पोहोचला आहे.  रसूलोफ बरोबर The Seed Of Sacred Fig या चित्रपटातील तंत्रज्ञांचा चमू देखील आहे.  24 मे 2024 रोजी The Seed Of Sacred Fig या चित्रपटाचे प्रदर्शन कांस महोत्सवात होणार आहे  तेंव्हा मुहम्मद रसूलोफ व चित्रपटांचे तंत्रज्ञ उपस्थित रहाणार आहेत. 

सिनेमाने मानवी जीवन मूल्यांच्या लढ्याला नेहमीच समाजापुढे  प्रभावीपणे  आणले  आहे.  सर्व सामान्यांचे  नायकत्व सिनेमा मुळेच जगाला कळाले. 


यंदा शाम बेनेगल यांचा 'मंथन'(1976) Cannes मधे

अशीच सर्वसामान्य माणसांच्या एकजुटीतून भारतात दुधाची 'धवल क्रांती' (White Revolution) आणनार्या अमूल च्या व्हर्गिस कुरीयन Varghese Corian यांच्या संघर्षावर बेतलेला शाम बेनेगल यांचा 1976 चा 'मंथन'(The Churning) हा चित्रपट Cannes Classic विभागात कांस महोत्सवात दाखविण्यात येणार आहे ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे.  मंथन चित्रपटाचे वैशिष्ट्य असे की याची निर्मिती crowd funding मधून आलेल्या पैशातून करण्यात आली होती.  गुजरातच्या हजारो दूध विक्रेत्या शेतकऱ्यांनी जमेल तसे छोटे आर्थिक योगदान करून मंथन या चित्रपटाच्या निर्मितीस हातभार लावला होता. 

Wishful  thinking 

मंथन प्रमाणेच जब्बार पटेल यांच्या निळू फुले व श्रीराम लागू यांची अभिनय जुगलबंदी असलेला 'सामना' व 'जैत रे जैत' हे चित्रपट  Cannes classic विभागात पुनःप्रदर्शित होतील अशी आशा आहे. सामना ने  1974 च्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली होती हे विशेष.


Cannes महोत्सवाच्या Classic विभागात भारताचे आणखी कुठले चित्रपट दाखवले जावू शकतात असे आपल्याला वाटते?  

Plz comment and Share


FAQ

कांस फेस्टिवल सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी खुला असतो का? 

-नाही!  हा फेस्टिवल फक्त सिने व्यावसायिकांसाठी खुला असतो पण या व्यतिरिक्त सिनेमाचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी व सिने क्लब्स च्या मेंबर्स ना '3 Day in Cannes' हा तीन दिवसीय पास दिला जातो.

कांस फेस्टिवल मधे Documentary व Short film पाठवता येवू शकते का? 

-होय! कांस मधे  Documentary व Short film पाठवता येवू शकते. Documentary व Short film ला कांस मधे Award मिळाल्यास सदर फिल्मला Oscar साठी थेट प्रवेश मिळतो. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या