Royal Enfield ची Guerrilla 450 च्या लाँचची अधिकृत घोषणा | आयोजन 17 जुलैला बार्सिलोनामध्ये
Guerrilla 450 Pic courtesy Google |
Royal Enfield ने Guerrilla 450 च्या लाँचची अधिकृत घोषणा केली आहे, ज्याचे आयोजन 17 जुलैला स्पेनमधील बार्सिलोना शहरात करण्यात आले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल आणि CEO गोविंदराजन बालकृष्णन यांनी ही घोषणा केली.
Written by Avinash Bhanu Asha Ghodke
Brand Royal Enfield म्हणजे दणकट शक्ती शाली bike त्यांचीच आहे Guerrilla 450
सर्व परिचित व iconic बुलेट मोटर सायकल बनवणारी Royal Enfield शक्तिशाली बाइक्स बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांची Himalyan bikes series 2016 ला Himalayan 411 च्या निर्मिती पासून सुरू झाली. त्यानंतर दुसर्याच वर्षी 2017 ला Royal Enfield ने Himalayan 450 हे upgraded version बाजारात आणले.
Royal Enfield Guerrilla 450 कशी असणार आहे
बाजारात सध्या उपलब्ध ADV (Adventure ) Bikes च्या तुलनेत Guerrilla 450 मधे काही अधिकचे मूलभूत हार्डवेअर असण्याची शक्यता आहे. Guerrilla 450 तरुणांमध्ये लोकप्रिय झालेल्या हिमालयन 450 पेक्षा अधिक परवडणारी असणार आहे. हिमालयन प्रमाणेच Guerrilla 450 Off Road Biking आणि Touring साठी उपयुक्त बाईक असेल.
हाती आलेली माहिती
आजून Royal Enfield ने अधिकृत पणे Guerrilla 450 चे features जाहीर केले नाहीत पण अनधिकृत सूत्रानुसार काही संभाव्य Basic features खालील प्रमाणे आहेत
- single-pod instrument console
- round LED headlight
- a sizable fuel tank
- one-piece seat
- TFT DISPLAY
हिमालयन शी साम्यता
उपलब्ध माहितीनुसार Royal Enfield च्या Guerrilla 450 ची इंधन टाकी आणि Tail section साधारणतः हिमालयन 450 प्रमाणेच आहेत,हिमालयनचे शेर्पा 450 इंजिन देखील यामध्ये वापरण्यात आले आहे ज्यामुळे हे डिझाइन हिमालयीन बाईक चेच पुनरावृत्त असे रूप आहे असे म्हणावे लागेल
हिमालयन पेक्षा काही वेगळे
हिमालयनला स्पोक व्हील्स आणि ट्यूब टायर्स आहेत पण नव्या Guerrilla 450 बाईकमध्ये अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्स आहेत. तसेच, हिमालयनवर दिसणारे USD फोर्क बदलून गेटर केलेले टेलीस्कोपिक फोर्क Guerrilla 450 मधे वापरण्यात आले आहेत.
Guerrilla 450 चे इंजिन हिमालयन प्रमाणेच?
Guerrilla 450 मधील इंजिनचे ट्युनिंग अद्याप निश्चित झालेले नाही. हिमालयनमध्ये, 452cc सिंगल-सिलिंडर इंजिन 40hp आणि 40Nm टॉर्क निर्माण करते आणि 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. Guerrilla 450 चे इंजीनही याच क्षमतेचे असेल की काही नवीन क्षमता एनफिल्ड कडून इंजिन ला जोडल्या जातील हे येत्या काही दिवसांत कळेलच.
हे ही वाचा
गुगल चे नवे GOOGLE GEMINI AI ChatGPT च्या स्पर्धेत
Elon Musk यांचा NEURALINK project मानवी मेंदूत Chip बसवण्यात यशस्वी
TESLA च्या Auto Pilot तंत्राने चालणार्या गाड्या व या Autopilot तंत्राची ओळख
FAQ
Off Road Biking म्हणजे काय?
साहसपूर्ण प्रवासाचा छंद असेल तर नेहमीच्या परिचित व Safe वाटा सोडून अनोळखी,अनवट अशा दुर्गम वाटा ने प्रवास करावा लागतो. अशा वाटांचा प्रवास खडतर असतो व अशा वाटांवर तग धरण्यासाठी दणकट बांधणीच्या ADV BIKES उपयोगी ठरतात. या बाइक्स वाळू, माती , खडकाळ रस्ते, उथळ पाणी,चिखल,बर्फ तसेच अवघड चढण उतार अशा सर्व प्रकारच्या challenges ना लिलया पार करत जातात. असा खडतर अनवट प्रवास म्हणजेच Off Road Biking.
Guerrilla 450 ची अंदाजे price काय असेल?
Guerrilla 450 ची अंदाजे Price INR 2,30,000 ते 2,50,000 असेल
0 टिप्पण्या