२०२४ ची आषाढी वारी वेळापत्रक: वैष्णवांच्या दिंड्या पताका आणि विठ्ठल-विठ्ल नामघोषात चालणार्या पावलांचा माग
![]() |
पंढरपूर वारीतील जेष्ठ वारकरी व महिलांची रंगलेली फुगडी |
दर आषाढ मासात पाऊस भरल्या आभाळा खाली दिंड्या पताका नाचवत वैष्णवांचा मेळा पंढरपूर कडे निघतो आहे. ४०० वर्षांपासून अगदी कुठलीही नेटवर्कींग सुविधा अस्तित्वात नसताना च्या काळापासून महाराष्ट्रातील लाखो शेतकरी आषाढ महिन्याच्या विशिष्ठ तारखेला (पंचांगानुसार दक्षिणायन आरंभी ) पंढरपूर कडे पालखी घेऊन निघतात. अनेक संतांच्या पालख्यांपैकी देहू हून निघणारी तुकोबांची पालखी व आळंदी हून निघणारी ज्ञानेश्वरांची पालखी महत्वाची मानली जाते.
या दोन्ही पालख्यांचे आषाढी वारी २०२४ चे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
Written by Avinash Bhanu Asha Ghodke
27 June 2024 :9:00pm
१)आळंदी हून प्रस्थान करणार्या ज्ञानेश्वरांच्या पालखीचे वेळापत्रक-आषाढी वारी २०२४
३० जून रोजी पालखी यात्रा आळंदी हून पुणे मुक्कामाकडे रवाना होणार असून तिचा सोमवार १ जुलैपर्यंत पुण्यात मुक्काम असेल.
2 जुलै मंगळवार रोजी पालखी सासवडकडे रवाना होईल तेथे 3 जुलैपर्यंत मुक्काम असेल.
ज्ञानेश्वर माऊलींच्पा पालखी सोहळ्याचे मुक्काम पुढीलप्रमाणे - आषाढी वारी २०२४
जेजुरी: 4 जुलै गुरूवार
वाल्हे: 5 जुलै शुकवार
लोणंद: 6 जुलै शनीवार
तरडगाव: 7 जुलै रविवार
फलटण: 8 जुलै सोमवार
बरड: 9 जुलै मंगळवार
नातेपुते: 10 जुलै बुधवार
माळशिरस: 11 जुलै गुरूवार
वेळापूर: 12 जुलै शुक्रवार
भंडीशेगाव : 13 जुलै शनीवार
वाखरी : 14 जुलै रविवार
पंढरपूर : 15 जुलै सोमवार
16 जुलैला मंगळवारी पंढरपुरात मिरवणूक व दर्शन
20 जुलैपर्यंत पंढरपूरमध्ये मुक्काम
21 जुलै रोजी आळंदीकडे परतीचा प्रवास सुरु होईल.
रिंगण म्हणजे काय ?
रिंगण म्हणजे पालखी भोवती लाखो वारकरी रिंगण करून उभे रहातात. वारकरी व मध्यभागी स्थापिलेली पालखी यामधे एक वर्तुळाकार मार्गिका मोकळी ठेवली जाते . 'माऊलीचा अश्व' मानला गेलेला पवित्र घोडा ज्याच्यावर संताचा पवित्र आत्मा आरूढ असतो असे म्हटले जाते तो या वर्तुळाकार मार्गिकेमधून स्वयंप्रेरणेने भरधाव वेगात धावतो व प्रदक्षिणा पूर्ण करतो. या अश्वाच्या टापांची माती वारकरी भक्तीभावाने कपाळाला लावतात.
ज्ञानेश्वरांच्या पालखी ची रिंगणे खालील प्रमाणे असतील
चांदोबा लिंब (पहिले रिंगण): 8 जुलै सोमवार
पुरंदवडे (पहिली फेरी रिंगण): 12 जुलै शुक्रवार
कुडूस फाटा (दुसरी फेरी रिंगण): 13 जुलै शनीवार
ठाकूर बुवाची समाधी (तिसरे रिंगण, संत सोपानदेवांच्या मिरवणुकीने भेट): 14 जुलै रविवार
बाजीराव ची मिरवणूक दुसरे उभे रिंगण, चौथे फेरीचे रिंगण: १५ जुलै सोमवार
पादुका (तिसरे उभे रिंगण): १६ जुलै मंगळवार
ज्ञानेश्वर पालखी :महत्त्वाच्या तारखा
नीरा स्नान: ६ जुलै शनीवार
बंधूभेट: १४ जुलै रविवार
२० जुलैपर्यंत मिरवणूक पंढरपूरमध्ये राहील.
21 जुलै रोजी चंद्रभागा नदी, गोपाळपूर काला आणि श्री रुक्मिनी भेट येथे पवित्र स्नान करून सोहळा परत येईल आणि पादुकाजवळ मुक्काम करेल.तद्नंतर परतीचा प्रवास सुरू होईल.
आळंदी : 30 जुलै 31 जुलै रोजी आळंदीभोवती प्रदक्षिणेचा सांगता सोहळा होणार आहे.
२ )जगद्गुरु संत तुकारामांच्या देहुहून निघणाऱ्या पालखीचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे - आषाढी वारी २०२४
यंदा संत तुकाराम महाराजांची ३३९ वी पालखी 28 जून रोजी आषाढी वारी साठी पंढरपूरला प्रस्थान करत आहे.
28 जूनला पालखी ईनामदार साहेब वाडा, देहू येथून प्रस्थान करणार आहे. 16 जुलैला ती पंढरपूरात दाखल होणार आहे. 17 जुलै दिवशी पंढरपूर मध्ये आषाढी एकादशीच्या सोहळ्याला भाविकांसह वारकरी मनोभावे विठ्ठल-रूक्मिणीची पूजा करतात
तुकाराम महाराजांच्या पालखीचे तारीख वार वेळापत्रक
प्रस्थान आषाढी वारी २०२४
पहिला मुक्काम इनामदार वाडा श्री क्षेत्र देहू
29 जून , शनीवारी पहिली अभंग आरती , हजरत सैयद अंगदशहा बाबा दर्गा येथे
दुसरी अभंग आरती चिंचोली येथील पादुका मंदिरा जवळ
पहिला प्रवासी मुक्काम संध्याकाळी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात
30 जून व 1 जुलै रोजी (रविवार व सोमवार)
पालखी मुक्काम पुण्यातील नाना पेठ येथील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात
2 जुलै मंगळवार रोजी पालखी पूण्याहून लोणी काळभोर कडे निघेल व नवीन पालखी स्थळ कदम चाक वस्ती येथे मुक्काम करेल
3 जुलै बुधवार रोजी उरूळी कांचन मार्गे यवत येथील भैरवनाथ मंदिरात पालखी विसावेल
4 जुलै गुरूवार रोजी वरवंड येथील विठ्ठल मंदिरात
5 जुलै शुकवार रोजी उंडवडी गवळ्याची
6 जुलै शनीवार रोजी बारामती शारदा विद्यालय मुक्काम
7 जुलै रविवार रोजी सणसर मुक्काम
8 जुलै सोमवार रोजी सणसर बेलवाडी येथे पहिले रिंगण
याच दिवशी रात्री अंथुर्णे येथे मुक्काम
9 जुलै मंगळवार रोजी निमगाव केतकी मुक्काम
10 जुलै बुधवार रोजी दुसरे गोल रिंगण इंदापूर येथे रात्री चार मुक्काम
12 जुलै शुक्रवार रोजी सकाळी सराटी येथे नीरा स्थान व पुढे प्रस्थान
13 जुलै शनीवार रोजी माळीनगर येथे पहिले स्थायी(उभे) रिंगण व पूढे बोरगाव येथे मुक्काम
14 जुलै रविवार रोजी तोडले बोंडाळे व पिराची कुरोली
15 जुलै सोमवार रोजी बाजीराव विहीर येथे दुसरे स्थायी(उभे) रिंगण
16 जुलै मंगळवार सकाळी भाकरी येथून पंढरपूर कडे प्रस्थान व सायंकाळी शेवटचे तिसरे उभे रिंगण होईल व पालखी पंढरपूर नगरात प्रवेश करेल
संध्याकाळी पंढरपुरात नगर प्रदक्षिणा मार्गावर बांधलेल्या श्री संत तुकाराम महाराज मंदिराच्या नूतन वास्तूत प्रथमच पालखीचा विसावा असेल.
पुढील ६ दिवस वारकरी विठु माऊली चे दर्शन घेवून चंद्रभागेच्या तीरावर वसलेलेल्या पंढरपूरात रममाण रहातील.
21 जुलै रोजी पालखी पंढरपूर हून देहू कडे आपला परतीचा प्रवास सूरू करेल
देव-शयनी आषाढी:धार्मिक मान्यता
या दिवशी सृष्टी निर्माते विष्णू भगवान शयन अवस्थेत अर्थात निद्राधीन होतात अशी मान्यता आहे . विष्णू भगवानांच्या निद्रा काळात सृष्टीचा कारभार शिव शंकराकडे असतो. विष्णू भगवान निद्राधीन होण्याआधी त्यांची भेट घेण्यासाठी संत व वैष्णव भक्तगण त्यांचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरास येत असतात. येणार्या रात्र काळात होणाऱ्या दैत्यांच्या प्राबल्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी ते विष्णू भगवानांचा आशिर्वाद घेतात.
शेतकरी समुदायाची श्रद्धा
हे ही वाचा
0 टिप्पण्या