Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

देहू-पालखी प्रस्थान दिवस-आषाढी वारी २०२४ Photo coverage

Reporting from Dehu , संत तुकाराम पालखी प्रस्थान दिवस २८ जून २०२४ : काही क्षणचित्रे |Photo Coverage 

पाऊस पडेल असे वाटत होते पण फक्त एक हलकी सर येवून गेली. सकाळी ११ वाजेपर्यंत देहू गावात पोहोचलो. हवेत सूखद असा गारवा होता. दुपारी दोन नंतर पालखी मंदिरातून निघेल असे कळाले. दरम्यान देहू गावात फिरत राहिलो. इंद्रायणी च्या घाटावर गेलो. संत तुकाराम वैकुंठ गमन मंदिरा समोरील नांदृक झाडाला गळा भेट दिली. देहू गाव वारकऱ्यांच्या दिंड्यांनी गजबजले होते. टाळ मृदंगाच्या साथीत नाम जपाचा जयघोष कानी पडत होता.  वयोवृद्ध वारकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय दिसत होती. त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा होता. ऊन पाऊस वारा झेलत हे जेष्ठ वारकरी चालत देहू आळंदी हून पंढरपूर ला निघाले होते. ही ताकद श्रद्धेची असते . त्या श्रद्धेला साष्टांग नमस्कार.

Reporting by Avinash Bhanu Asha Ghodke 


A girl creating Rangoli on road as a welcome sign
अवघ्या दहा मिनिटात या मुलीने रस्त्यावर ही विशाल रांगोळी काढली 28 June 2024,देहू गाव ,आषाढी वारी ,पालखी प्रस्थान सोहळा 

Devotees congregation at main gate of temple
देहू च्या मुख्य मंदिरापुढे पालखी सोहळ्यासाठी जमलेले वारकरी २८जून २४ देहू गाव

Devotees at Dehu Gaon
मंदिराकडे निघालेले वारकरी २८ जून २४,देहू

Main gate of Dehu Temple
देहू च्या विठ्ठल मंदिराचे मुख्य द्वार २८ जून २४ देहू


Three men in bright traditional attires at river
दोन वासूदेव व एक सेवेकरी इंद्रायणी घाटावर
 २८ जून २४ देहू
Women devotees doing rituals for divine tree
वैकुंठ गमन मंदिरा समोरील नांद्रुक झाडाला पूजणार्या भाविक महिला २८ जून २०२४

A traditional Vasudeva singing for senior devotee women
इंद्रायणी घाटावर वासूदेवाचं कीर्तन ऐकणार्य जेष्ठ वारकरी महिला 
२८ जून २०२४



A devotee resting under tree at river bank
इंद्रायणी च्या घाटावर विसावा घेणारे वारकरी  २८ जून २०२४

Devotees crossing Indrayani bridge
वारकरी संप्रदाय इंद्रायणी च्या
 पूलावरून जाताना २८ जून २०२४

At Dehu a descending path leading towards Indrayani River
मंदिर रस्त्यावरून इंद्रायणी नदीकडे जाणारी उतरंड
 २८ जून २०२४ 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या