Intermittent Fasting या उपवास पद्धतीचे 6 प्रकार
Intermittent fasting |
सध्या Intermittent Fasting बद्दल Social media वरून बरेच ऐकायला मिळत असते. या उपवास पद्धती बद्द्ल विशेष माहिती
इंटरमिटेंट फास्टिंग Intermittent fasting म्हणजे
ठराविक तासांच्या कालखंडात सातत्याने पण अंतरा अंतराने उपवास करण्याची एक पद्धत आहे, ज्यामध्ये खाण्याचे आणि उपवासाचे ठराविक वेळापत्रक पाळले जाते. ही पद्धत वजन कमी करण्यासाठी, चयापचय सुधारण्यासाठी उपयुक्त आहे असे म्हटले जात आहे.
Intermittent fasting (इंटरमिटेंट फास्टिंगचे )चे 6 प्रकार
1) 12:12 पद्धत -दर 24 तासातून 12 तास उपवास
2) 16 : 8 उपवास पद्धत
3) 5 : 2 पद्धत (Fast Diet)
4) एक दिवस आड उपवास ( Alternate day fasting)
5) आठवड्यातून 24 तास उपवास ( Eat stop Eat)
6) योद्ध्याचा आहार ( Warrior Diet) Intermittent fasting
Intermittent fasting चे फायदे
- वजन कमी होणे : उपवासामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी कमी होते, ज्यामुळे चरबी जलद गतीने जळते.
- चयापचय क्रिया सुधारणे : उपवासामुळे चयापचय वाढतो आणि हॉर्मोन्सची स्थिती सुधारते.
- Ageing अर्थात वय वाढण्याची प्रक्रिया मंदावणे : काही अभ्यासांनुसार उपवासामुळे शरीराच्या पेशींची दुरुस्ती प्रक्रिया चालू राहते, ज्यामुळे म्हातारपणाची प्रक्रिया मंदावते.
ketosis या चयापचय प्रक्रिये वर आधारित आहे intermittent Fasting
आपल्या पारंपारिक उपवास पद्धती मध्ये व त्याच बरोबर चर्चित Intermittent fasting मध्ये ही Ketosis या चयापचय क्रियेचा मूलभूत आधार घेत उपवास संकल्पना मांडली गेली आहे .
केटोसिस म्हणजे काय?
आपल्या शरीरात ऊर्जा निर्मिती करण्यासाठी जेव्हा पुरेसे carbohydrates उपलब्ध नसतात तेंव्हा आपली चया पचय प्रक्रिया शरीरात साठलेली प्रथिने (चरबी) ऊर्जा निर्मिती इंधन म्हणून वापरते. हा चरबी साठा खरं तर अशा आपत्कालीन परिस्थिति साठीच नैसर्गिक रित्या शरीरात राखून ठेवलेला असतो . उपवासा द्वारा आपण अशी आपत्कालीन परिस्थिति योजना बद्ध वा जाणीव पूर्वक निर्माण करत असतो जेणेकरून ऊर्जा निर्मिती साठी शरीरातील चरबी जाळली जाईल . अशा प्रकारे चरबी जाळून निर्माण होणारा पोषक घटक म्हणजे Ketosis होय
विचारात घेण्याचे मुद्दे :
कुठलीही उपचार पद्धती व तिचे सकारात्मक वा नकारात्मक परिणाम व्यक्ती परत्वे भिन्न असतात कारण प्रत्येक व्यक्ती ची शारीरिक ठेवण विशिष्ट व वेगळी असते त्यामुळे वैद्यकीय मार्गदर्शना शिवाय Intermittent fasting वा इतर कुठल्याही उपचार पद्धतीचा अवलंब करू नये.
- Intermittent fasting इंटरमिटेंट फास्टिंग कुणी करू नये
- गर्भवती स्त्रिया,
- स्तनपान करणाऱ्या माता, आणि
- विशिष्ट आजारांनी पीडित असणाऱ्या व्यक्तींनी .
- याचा अवलंब करू नये . केल्यास ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
सुचना:
Intermittent fasting इंटरमिटेंट फास्टिंग weight loss वजन कमी करण्यासाठी एक प्रभावी पद्धत आहे जी योग्य रीतीने वापरल्यास आरोग्याचे अनेक फायदे देऊ शकते. मात्र, ही पद्धत सुरु करण्याआधी योग्य वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. आपल्या विशिष्ट शारीरिक रचनेस ही उपवास पद्धती अनुकूल आहे की नाही यांची खात्री करूनच INTERMITTENT FASTING चा अवलंब करावा .
Intermittent fasting केल्यास उपवासाच्या कालावधीत पुरेसे पाणी प्यावे आणि योग्य पोषण मिळवण्यासाठी आहार संतुलित असावा.
हे ही वाचा :
Bollywood अभिनेता मनोज वाजपेयी करतोय गेली 14 वर्षे Intermittent fasting
0 टिप्पण्या