Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

Northern lights in Ladakh India

 भारताच्या आसमंतात दिसले Northern Lights

गेल्या शुक्रवारी भारतात लद्दाख मधे Northern Lights  पाहिल्या गेल्याची बातमी  नेटवर  ट्रेंड झाली. हे Northern lights कसे उत्पन्न होतात याचा आढावा घेण्याचा एक प्रयत्न 


Collage of two northern light pics
Northern Light at Norway pic courtesy Google 




अरोरा म्हटलं की  उत्तर मध्य मुंबईच्या लोकांना माटुंग्याचं अरोरा टाॅकीजच आठवतं . अरोरा हे फार जुनं  प्रसिद्ध असं single screen थिएटर आहे. दर शुक्रवारी तिथे नवे चित्रपट  लागत असतातविशेषतः दाक्षिणात्य . पण गेल्या शुक्रवारी भारतात लद्दाख मधे  Aurora पाहिल्या गेल्याची बातमी  नेटवर  ट्रेंड झाली . ही बातमी अरोरा टाॅकीजबद्दल नव्हती तर सुप्रसिद्ध अशा  NORTHERN LIGHTS बद्ल होती . Aurora हे याच Northern Lights चं तांत्रिक नाव . 


मूलत:Aurora ही ग्रीक पुराणातील पहाटेची किंवा उष:कालाची देवीया देवीच्या नावावरून प्रसिद्ध खगोल  शास्त्रज्ञ गॅलिलिओ ने १६२३ साली आकाशातल्या या प्रकाश शलाकांच्या खेळाचे Aurora असे नामकरण केलेपूर्ण नाव Aurora Borealis असे आहे ज्याचा अर्थ  ‘ऊषे चा प्रकाश’ (light of down) असा होतो.  यातील थोडा विरोधाभास असा आहे की या पहाटेच्या लालिमेसम वाटणार्या प्रकाशाची जादू मद्ध्यरात्री अंधाराच्या पार्श्व भूमीवरच उठून दिसते.  हे Aurora Borealis उत्तर  दक्षिण या दोन्ही ध्रूवा जवळील प्रदेशांत दिसत असतातदक्षिण ध्रूवाकडे याचे नाव Aurora Australis असे बदलते.


काय आहे Northern Lights

आकाशात विस्मयकारक अशा भव्य रंगीत  प्रकाश शलाकांचं दर्शन अर्थात Northern Lights. 


 कुठे?   


उत्तर कॅनडा

नाॅर्वे

स्वीडन

फिनलैण्ड 

अलास्का

रशिया 

आईसलैंड


या दक्षिण ध्रूवास लागून असलेल्या देशांत Northern Lights अरोरा चे नेत्रदीपक दर्शन सातत्याने घडत असते.




भारतातील Northern Lights चे दर्शन


North Pole   South Pole व्यतिरिक्त क्वचित प्रसंगी Solar storm ची तीव्रता अधिक असल्यास  हे Aurora इतरत्र  अती उंच अशा भूभागांवर दर्शन देतातयाच कारणामुळे ११ मे २०२४ रोज़ी भारतात लद्दाख च्या हैनले भागात ,सरस्वती पर्वताच्या वर Aurora पहाण्यात आल्याची  अधिकृत नोंद Indian Astronomical Observatory ने केली आहे  ते फोटो नेटवर वितरीत झालेले ही दिसतातया फोटोवरून आभाळात मध्यरात्री लालिमा पसरलेली दिसते पण प्रकाश शलांकाचा खेळ दिसत नाही . या लालिमेस Aural Red Arch असे तांत्रिक नाव आहे.



Northern Lights दिसण्यामागचे वौज्ञानिक कारण


सूर्य या अतीप्रचंड अग्नी तार्यातून उत्पन्न होणारे वायू ज्याला Solar Wind म्हटले जाते . या सोलर विंड चा विस्फोट होवून हे वायू वादळी रूपात पृथ्वीकडे झेपावतात .७२ करोड़ किलो मीटर / तास इतक्या वेगात पृथ्वीचे चुंबकीय कवच भेदत ते इथल्या वातावरणात शिरकाव करतात याला coronal mass ejection असे म्हटले जाते.  या solar wind मधील protons  electrons ची पृथ्वीच्या वातावरणातील घटकांना एक प्रकारे धडक बसते (coalition) व धडकेतून होणार्या रासायनिक प्रक्रीयेच्या परिणामस्वरूप आसमंतात प्रकाश शलाका फेकल्या जातात ज्यांना आपण Aurora म्हणून पहात असतो.


११मे २०२४ ला उठलेले Solar Storm 

हे गेल्या वीस वर्षांतील सर्वात मोठे सूर्य वादळ होतेयाच कारणामुळे त्याचा प्रभाव भारतात लद्दाख मधेही दिसून आला आहे


अशा प्रकारची Sloar Storms किंवा Solar Flares वरचेवर सूर्याच्या पृष्ठभागातून उद्भवत असतात व दर ११ वर्षांच्या आवर्तननंतर याची तीव्रता वाढलेली दिसते.


Solar storm चा मानवी जीवनास अपाय ?

Solar Storms पासून मानवी जीवनास कुठलाही लक्षणीय असा अपाय झाल्याची नोंद नाही .  या सूर्य वादळाच्या पृथ्वी कक्षेतील प्रवेशामुळे Satellite communication मात्र विस्कळीत होवू शकतेम्हणजे गमतीने असे म्हणू शकतो की समजा अरोरा टाॅकीज मधे जर चित्रपटाचा खेळ satellite द्वारे प्रक्षेपित होत असेल तर प्रक्षेपणात व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एरवी Northern Lights चे आसमंतातील विलोभनीय प्रक्षेपण अनंता पर्यंत सुरू रहाणार आहे.  


आयुष्यात एकदा तरी Northern lights पहाण्याची  तुमची इच्छा आहे का? 

written by Avinash Bhanu Asha Ghodke 


टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या