Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

Apple logo ची जन्म कथा आणि लोक कथा


Apple लोगो डिझाईन: Gen z पासून Gen Alfa पर्यंत ज्ञानाचा रसरशीत घास

Pic of the creator of Apple logo in collage
Thumbnail with collage of pictures depicting Apple logo story 





डिझायनर Rob Janoff याने Apple चे 'प्रतीक चिन्ह' म्हणून खाल्लेले उष्टे सफरचंद लोकांपुढे ठेवले . भारतीय जनमानसात मात्र फार पूर्वीपासून रामायणातल्या शबरीच्या उष्ट्या बोराची महती अंकित झालेली होती. 

Apple लोगो चिन्ह : जन्म कथा व अख्यायिका 


डिझायनर: रॉब जानॉफ

रॉब जानॉफ, एक प्रसिद्ध ग्राफिक डिझायनर, यांनी Apple कंपनीचा जगप्रसिद्ध लोगो तयार केला. 1977 साली ऍपल कंपनीने नवीन लोगो डिझाइन करण्याचे काम जानॉफला सोपवले होते. त्यानंतर त्यांनी साधेपणा, सौंदर्य आणि नवतेचा विचार करून सध्याचा लोगो तयार केला. 


संकल्पना: साधेपणातून प्रभावी ओळख

स्टीव्ह जॉब्स यांनी  "मला अतीशय साधा व सोपा लोगो हवा आहे जो इंटरेस्टिंग असेल व लक्षात रहायला हवा" असे brief लोगो डिझायनर राॅब जानाॅफ यांना दिले होते.

 राॅब जानाॅफ यांनी स्टीव्ह जॉब्स यांच्या अपेक्षे नुसार सफरचंदाचा आकार दाखवणारा लोगो Apple Software company साठी बनवला  ज्यात साधेपणा आणि आकर्षकता यांचा संगम दिसून येत होता . या लोगो मधे सफरचंदाचा एक छोटा चावा घेतलेला दाखवला आहे. हा छोटासा चावा म्हणजे  Digital ज्ञानाचा घास आहे. तंत्रज्ञानाच्या वाटचालीतील नवनिर्माणाचं ते प्रतीक आहे. पण हा चावा लोगो च्या पहिल्या आवृत्तीत नव्हता. हा चावा नंतर अंतर्भूत करण्यात आला.


सफरचंदाचा चावा नंतर अंतर्भूत केला गेला 

Apple logo मधील या सफरचंदाचा चावा घेतलेले दाखवण्या मागे एक कारण होते. 

proportion - लोगो हा फ्लॅट 2D design असल्या मुळे चाव्या विना पाहताना तो चेरी किंवा टमाटा वाटू शकतो असे डिझायनर च्या लक्षात आले. अशाप्रकारे चावा समाविष्ट झाल्यावर ते सफरचंद आहे हे स्पष्ट झाले.


Apple logo मागील काही प्रचलीत लोककथा खालील प्रमाणे आहेत 

बायबल कथा (Genesis Chapter 3)संदर्भ: ज्ञानाचे प्रतीक

Apple चा लोगो हा अनेकजणांनी बायबलमधील आदाम आणि ईव्हच्या कथेशी जोडलेला मानला आहे. बायबलमध्ये सफरचंद हे ज्ञानाचं प्रतीक म्हणून दाखवलेलं आहे, ज्यामुळे मानवाने आपलं भविष्य निवडण्याची क्षमता प्राप्त केली. अशाप्रकारे, Apple लोगो तंत्रज्ञानाच्या जगातल्या ज्ञानाच्या वाटचालीचं प्रतीक आहे.

कंप्युटर जीनिअस एलन टर्निंग ला श्रद्धांजली 

१९५४ साली गणितज्ञ व computer Genius असलेला एलन टर्निंग यांनी साईनाईड विषाने बाधीत झालेला सफरचंद खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाला होता असे तपासात आढळले होते. चावा घेतलेले हे सफरचंद त्यांच्या मृतदेहाजवळ आढळले होते.  ही आत्महत्या होती की खून याबद्दल अनेक तर्क आहेत. पण एलन हा कंप्युटर मधला गुरू माणूस होता व त्याला श्रद्धांजली म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर २० वर्षांनी स्थापित झालेल्या Apple या कंपनीने आपल्या लोगो द्वारे त्याला श्रद्धांजली दिली आहे असा एक समज जनमानसात आहे. 

न्यूटन चं ॲपल 

काही लोक या Apple logo चिन्हा ला न्यूटन च्या‌ Gravity सीद्धांताला जन्म देणार्या सफरचंदाशी जोडून ते विज्ञानवादाचे प्रतीक आहे असे मानतात.

खरंतर या तिन्ही कथा वास्तवापासून दूर आहेत पण असे‌ असले तरी भावनीक कसोटीवर खर्या वाटतात किंबहुना खर्या नसल्या तरी योग्य आहेत असे वाटते.

Hollywood अभिनेते स्टीफन फ्राय यांनी आपला मित्र असलेल्या Apple च्या निर्मात्या स्टीव्ह जॉब्स ला एकदा विचारले होते की "खरंच का तो Apple logo ॲलन टर्निंग ला श्रद्धांजली आहे?" यावर स्टीव्ह जॉब्स ने , “God, we wish it were.” ( आम्हाला ही‌ वाटते तसे असायला हवे होते) असे उत्तर दिले होते.



लोगोतील बदल: 

Apple चा logo सुरुवातीला Rain Bow colour पट्यांमधे होता, जो जीवनातील विविध रंग आणि तंत्रज्ञानाच्या रंगीत दुनियेचा प्रतीक होता. कंप्युटर ची रंगीत चित्रे बनवण्याची क्षमता हा इंद्रधनू अधोरेखित करीत होता. पूढे 1998 मध्ये ऍपलने  या लोगो मधे बदल केला . इंद्रधनू   रंगपट्यां ऐवजी मोनोक्रोम रंगात नवा Apple logo सादर झाला जो कंपनीच्या धोरणातील साधेपणाचा आणि आधुनिकतेचा विचार दर्शवतो. 


ऍपल लोगो ची प्रतिकात्मकता :  Digital Revolution चं एक जागतिक प्रतीक

Apple चा logo हा आता केवळ कंपनीचं चिन्ह नसून तो जागतिक ब्रँडचा एक प्रमुख भाग बनला आहे. हा लोगो तंत्रज्ञानाच्या दुनियेतला नवा दृष्टीकोन आणि यशाचं प्रतीक बनला आहे . २१ व्या शतकातील Digital क्रांतीचं प्रतीक ही तो आहे.


ऍपल लोगोच्या लोकप्रियतेमागील मानसशास्त्र

ऍपलच्या लोगोची रचना इतकी साधी आकर्षक का आहे यामागील मानसशास्त्र देखील समजून घेण्यासारखं आहे. या चावा घेतलेल्या सफरचंदाच्या आकारात एक स्पष्ट संदेश आहे. चावा घेतलेले सफरचंद पाहणार्याची उत्सुकता वाढवते.

 प्रतिकात्मक दृष्यातून सहसा पुर्णत्व दाखवण्याचा प्रघात आहे पण या प्रघाताला Apple logo ने मोडीत काढले. Apple ने खाल्लेले उष्टे सफरचंद लोकांपुढे ठेवले . तसेही भारतीय जनमानसात रामायणातील शबरीच्या उष्ट्या बोराची महती प्रचलीत आहेच. Apple च्या या logo मधे सफरचंदाच्या फळाचा रसरशीत पणा व त्याचं पौष्टीक मूल्य आणि विशिष्ट गोडवा समाविष्ट होतो . सफरचंद या फळाची 'सरसता' जगमान्य आहे व आपले product या जगमान्यते बरहुकूम आहे असे Apple company सूचित करते. ज्ञानाचा हा पौष्टिक घास (bite)तुम्हीही घ्या असे Apple आपल्याला logo द्वारा आग्रहाने सांगते.


ऍपल लोगोचा सर्व व्यापक परिणाम

Apple  logo चा परिणाम फक्त तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नाही, तर फॅशन, संगीत, कला यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये देखील दिसतो. या लोगोने जगभरातल्या ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे, जो इतर कंपन्यांनाही प्रेरणा देतो.


निष्कर्ष

Apple चा logo हा केवळ एक साधे चिन्ह राहिले नसून, ते तंत्रज्ञानाच्या युगाचे एक क्रांतिकारी चिन्ह बनले आहे.  साधेपणा, अर्थगर्भता, आणि सूचकता यामुळे ते लोकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण करू शकले आहे. 

हे ही वाचा:

माणसाच्या मेंदूत ही बसवणार चिप:Elon Musk यांचा Neuralink project 

Chat Gpt काय आहे जाणून घ्या 

Google चा जेमीनी AI मराठीत माहिती सांगणार 

पृथ्वी ते स्पेस स्टेशन चे अंतर आहे मुंबई ते वडोदरा एवढे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या