Vote for Lesser Evil! |गर्भपात म्हणजे हत्या आणि स्थलांतराला विरोध हे गंभीर पाप - Pope Francis
Vote for better Evil - व्हॅटिकन चा घंटानाद |
Vatican चे धर्म गुरू Pope Francis यांनी ट्रम्प व कमला हॅरिस या दोघांना ही वाईट ठरवत 'कमीतकमी वाईटाला' मत द्या असा अमेरिकन जनतेला सल्ला दिला आहे
कमला हॅरिस यांनी केलेले गर्भपाताचे समर्थन व डोनाल्ड ट्रम्प यांची कडक Immigration policy या दोन्ही मुद्यांवर पोप फ्रान्सिस यांची असहमती
पोप फ्रान्सिस यांनी 2024 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवारांच्या गर्भपात आणि स्थलांतर धोरणांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण "जीवनविरोधी" असल्याचे म्हटले आहे. हॅरिस गर्भपाताच्या अधिकाराचे समर्थन करतात, ज्याला पोप फ्रान्सिस "हत्या" म्हणून संबोधतात. दुसरीकडे, ट्रम्प यांच्या स्थलांतरविरोधी कठोर धोरणांचा, ज्यामध्ये लाखो बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून हाकलण्याचा प्रस्ताव आहे यास पोप फ्रान्सिस यांनी "गंभीर पाप" म्हणून निषेध केला आहे.
मतदान टाळू नका
याच वेळी, पोप फ्रान्सिस यांनी अमेरिकेतील कॅथोलिक नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे, आणि मतदान न करणे "चुकीचे" असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. दोन्ही पक्षांच्या Migration आणि Abortion संबंधी भूमिकांना वाईट ठरवत त्यांनी निवडणूक प्रक्रियेत "न्यूनतम वाईट" ( lesser Evil )निवडण्याची शिफारस केली, परंतु कोणत्याही उमेदवाराला थेट समर्थन दिले नाही. त्यांची ही भूमिका काहीशी अस्पष्ट आहे पण गर्भपात आणि स्थलांतर धोरणांविषयीच्या त्यांच्या स्पष्ट अशा मतांवर आधारित आहे .
पोप फ्रान्सिस यांच्या वक्तव्याचा अमेरिकन मतदानावर कितपत प्रभाव
अमेरिकेतील कॅथलिक समाज सुमारे 20% आहे, म्हणजेच अमेरिकेतील जवळपास 52 मिलियन ( ५ करोड २० लाख) लोक स्वतःला कॅथलिक म्हणून ओळखतात. हा समाज वयाने तुलनेने अधिक प्रौढ आहे आणि त्यांचे राजकीय मतप्रवाह असमान आहेत.
हे पाहता पोप फ्रान्सिस यांच्या वैयक्तिक मतांचा अमेरिकन कॅथलिक मतदारांवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो, परंतु त्यांच्या प्रभावाची मर्यादा आहे.
एका सर्वेक्षणानुसार 75% अमेरिकन कॅथलिक पोप फ्रान्सिस यांना अनुकूल मानतात, परंतु यातील अनेक लोक गर्भपातासारख्या मुद्द्यांवर चर्चच्या परंपरागत भूमिकेपासून वेगळे विचारही मांडतात. सुमारे 60% कॅथलिक लोकांनी गर्भपातास समर्थन दर्शवले आहे. त्यामुळे, पोप फ्रान्सिस यांच्या मतांचा प्रभाव काही कॅथलिक मतदारांवर असू शकतो, परंतु हा प्रभाव मर्यादित राहू शकतो.
पोप फ्रान्सिस पहिले लॅटिन अमेरिकन व जेसुइट पोप
पोप फ्रान्सिस हे 266 वे पोप आहेत. त्यांचा खरा नाव जॉर्ज मारिओ बर्गोग्लिओ आहे आणि ते अर्जेंटिनामधील ब्यूनस आयर्स येथे 17 डिसेंबर 1936 रोजी जन्मले. त्यांनी 13 मार्च 2013 रोजी पोप म्हणून पदभार स्वीकारला आणि यामुळे ते पहिले लॅटिन अमेरिकन तसेच पहिले जेसुइट पोप बनले.
पोप फ्रान्सिस यांचे शिक्षण रसायनशास्त्रात झाले होते, परंतु नंतर त्यांनी धर्मगुरु होण्याचा निर्णय घेतला.
- 1969 मध्ये ते पाद्री बनले आणि त्यानंतर जेसुइट ऑर्डरमध्ये प्रवेश केला.
- 1998 मध्ये त्यांची ब्यूनस आयर्सचे आर्चबिशप म्हणून नेमणूक झाली,
- 2001 मध्ये ते कार्डिनल झाले
कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प या दोघांची धार्मिक पार्श्वभूमी
1. कमला हॅरिस: हॅरिस यांची आई भारतीय हिंदू आहे, तर त्यांचे वडील जमैकन वंशाचे ख्रिस्ती आहेत. हॅरिस स्वतः बाप्तिस्मा घेतलेल्या बॅप्टिस्ट ख्रिस्ती आहेत, परंतु त्या आपल्या हिंदू धर्मातील संस्कारांनाही महत्त्व देतात. त्या या दोन्ही धार्मिक परंपरांमध्ये वाढलेल्या आहेत.
2. डोनाल्ड ट्रम्प: ट्रम्प यांचा धार्मिक वारसा प्रोटेस्टंट ख्रिस्ती (Presbyterian) आहे. त्यांनी काही सार्वजनिक प्रसंगी ख्रिस्ती धर्माबद्दल आपली निष्ठा व्यक्त केली आहे.
अमेरिकन मतदानात धर्माचा प्रभाव:
अमेरिकेत मतदानावर धर्माचा प्रभाव महत्त्वपूर्ण असतो. विविध सर्वेक्षणांनुसार, मतदाराचे धार्मिक विश्वास त्यांच्या राजकीय निवडींवर प्रभाव टाकू शकतात. उदाहरणार्थ:
- व्हाइट एव्हॅन्जेलिकल ख्रिस्ती
हे मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन उमेदवारांना (ट्रम्प यांना) पाठिंबा देतात.
- कॅथलिक मतदार
हे द्विधा मनःस्थितीत असतात, ज्यात काही डेमोक्रॅट उमेदवारांना तर काही रिपब्लिकन उमेदवारांना मतदान करतात.
- धर्मनिरपेक्ष आणि नास्तिक मतदार
हे प्रामुख्याने डेमोक्रॅट्सना समर्थन देतात.
30 40% मतदान धार्मिक व सांस्कृतिक मुद्यांनुसार
अंदाजे 30-40% अमेरिकन मतदार त्यांच्या धार्मिक ओळखीनुसार मतदान करतात, विशेषत: सांस्कृतिक मुद्द्यांवर (जसे की गर्भपात, स्थलांतर, विवाह) याचा प्रभाव दिसून येतो .याचा अर्थ पोप फ्रान्सिस यांच्या वक्तव्याचा 30-40% मतदारांवर प्रभाव होण्याची शक्यता आहे.
Pope Francis यांच्या जीवन वादाची मुळे लॅटिन अमेरिकेतील गरीबीत
पोप फ्रान्सिस हे त्यांच्या नम्रतेसाठी व समाजातील गरीब आणि दुर्बल लोकांबद्दल त्यांच्या करुणा भावासाठी ओळखले जातात. त्यांच्या पोपपदाच्या कारकिर्दीत त्यांनी चर्चचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, विशेषत: स्थलांतर, हवामान बदल, आणि जागतिक असमानता यासारख्या मुद्द्यांवर ते नेहमीच आक्रमकपणे बोलले आहेत. लॅटिन अमेरिकेतील त्यांच्या जन्मामुळे त्यांच्यात गरीब समाजाबद्दल आस्था उत्पन्न होणे स्वाभाविक वाटते. उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिकेतील आर्थिक तफावत आपल्या लहानपणी च्या आयुष्यात पाहिल्यामुळेच ते अमेरिकन मतदारांना सतर्क पणे मतदान करण्यास सूचित करित असावेत.
0 टिप्पण्या