Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

Google चा नवा Gemini AI मराठीत माहिती सांगणार

 

Logo of Google Gemini on black background
Logo of Google GEMINI courtesy Google 

Chat Gpt ला नवा स्पर्धक:  GEMINI  हा गुगलचा नवा AI सहाय्यक Mobile App मैदानात

AI अर्थात Artificial intelligence ही नव्या Digital युगाची नांदी आहे.  Open Ai घ्या chat Gpt ला स्पर्धक म्हणून बलाढ्य Google ने  स्वतःचा Gemini हा AI App अवतरीत केला आहे त्याबद्दल 

Written by Avinash Bhanu Asha Ghodke 

20 June 2024 : 4:20 pm

गुगल CEO सुंदर पिचाई यांची घोषणा 

गूगलने नुकतेच ( १८ जून २०२४ रोजी) त्यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सहाय्यक, GEMINI भारतात लाँच केला आहे. गुगल जे CEO सुंदर पिचाई यांनी आपल्या X च्या अकाऊंट वरून ही घोषणा केली. भारतातील 9 प्रमुख भाषांमधे ही सुविधा उपलब्ध आहे व त्यात मराठीचा ही समावेश आहे. इंग्रजी (Indian English), हिंदी, ऊर्दू , गुजराती,बंगाली,कन्नड, तेलगू, तमीळ या इतर भारतीय भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. अर्थात वरील भाषांमधे तुम्ही या App शी संवाद करून आवश्यक माहिती मिळवू शकता.जेमिनी तुमची कार्यक्षमता वाढवण्यात मदत करू शकेल असे  मदतनीस प्रकाराचे software आहे.

   Gemini ची वैशिष्ट्ये

 * लेखन, विचारमंथन करणे, नवीन‌ गोष्टी शिकणे आणि इतर गोष्टींमध्ये तुमची मदत करणे

 * तुमच्या Gmail किंवा Google Drive मधून माहितीचा सारांश आणि त्वरित माहिती शोधून देणे

 * दिलेल्या माहितीनुसार (Prompt)चित्र निर्माण करणे

 * तुमच्या type केलेल्या मजकुराच्या सहाय्याने, Recorded message ने किंवा दिलेल्या फोटो च्या आधारे Gemini हे सहाय्यक App आवश्यक माहिती चा माग काढून ती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते.

 * "Hey Google" असे  type करून वा बोलून तुम्ही तुमच्या फोन स्क्रीनवर काय  हवे आहे याबद्दल जेमिनीकडे विचारणा करू शकता. 

 * Google Maps आणि Google Flights चा वापर करून तुमच्या प्रवासी योजना तुम्ही आखू शकता.

जेमिनी आणि चॅट GPT ची तुलना

Gemini चा व्यक्तीगत आढावा व‌ तद्नुसार माहिती पुरवठा 

जेमिनी आणि चॅट GPT या दोन्ही कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सहाय्यक असले तरीही या‌ दोघांमधे काही प्रमुख फरक आहेत. जेमिनी हे Google च्या मालकीचे असून तो Google च्या अनेक लोकप्रिय सेवांचे (जसे Google Maps आणि Google Drive) एकत्रित वापर व  समायोजन करत माहिती चा धांडोळा घेते. याचा अर्थ असा की जेमिनी तुमच्या Online अस्तित्वाच्या उपलब्ध माहितीनुसार डाटा  संकलित करतो आणि माहिती पुरवताना personalised असा अनुभव देऊ शकते.

Chat Gpt ला तुमचे गुगल चे वैयक्तिक माहिती क्षेत्र निषिद्ध 

Open AI चा चॅट GPT हा एक स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आहे जो एलॉन मस्कच्या OpenAI द्वारे विकसित केला गेला आहे. चॅट GPT मोठ्या प्रमाणात मजकुरावर प्रशिक्षित केला गेलाआहे आणि तो विविध लेखन शैली आणि स्वर आत्मसात करण्यात सक्षम आहे. तथापि, चॅट GPT तुमच्या वैयक्तिक Google डाटावर प्रवेश करू शकत नाही, म्हणून Gemini तुमच्यासाठी जितके personalised असू शकते तितके Chat Gpt वैयक्तिक वा व्यक्तीगत पातळीवर माहिती देवू शकत नाही.

निष्कर्ष 

जेमिनी आणि चॅट GPT या दोन प्रभावी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) असून दोन्हीही सहाय्यकाची भूमिका निभावतात , पण दोन्ही पैकी तुमच्यासाठी कोणते App वा software चांगले आहे हे तुमच्या गरजा आणि प्राधान्यांवर अवलंबून आहे. Gemini ने तुमच्या Google platform वरची माहिती वापरणे हे तुम्हाला कदाचित तुमच्या वैयक्तिक क्षेत्रातील घुसखोरी ही वाटू शकते. त्यामुळे Chat Gpt किंवा GEMINI या दोहोतली निवड ही सर्वस्वी तुमच्या इच्छेवर अवलंबून असेल अन्यथा Google च्या GEMINI चे dynamics Chat Gpt हून अधिकच  आहेत एवढे नक्की.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या