Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

Non Stick भांड्यांमुळे अमेरिकेत Teflon Flue

 

Non Stick भांडी अती  तापवल्यास Teflon flew होवू शकतो

Woman seen in kitchen


Non stick Pan ने होवू‌ शकतो Teflon Flue




किचन मधे Non stick भांडी वापरताना घ्या काळजी. वाफेने Teflon Flu होवू शकतो


Non stick pan मुळे अमेरिकेत Taflon Flue

सध्या अमेरिकेत, PTFE (Poly-tetra-fluoro-ethylene) किंवा Teflon वापराच्या वाढत्या प्रमाणामुळे Teflon Flu चे प्रमाण देखील वाढले आहे. PTFE वापराच्या विविध उत्पादनांच्या गरम केल्यावर निर्माण होणाऱ्या धुरामुळे आणि विशेषत: स्वयंपाकघरात Teflon कोटेड भांड्यांचा वापर केल्यामुळे, अनेक नागरिकांना Teflon Flu ची समस्या उद्भवू लागली आहे.


Teflon Flu कशामुळे होतो?

Teflon Flu म्हणजेच पोलिमर फ्यूम फीवर जो PTFE सारख्या पदार्थांच्या गरम केल्यामुळे होतो. तुमचा किचन पॅन‌ जेंव्हा PTFE coated(Non stick )असतो तेंव्हा 170° ते 350°C च्या रेंजमधे वा याहून जास्त तापमानावर तो शेगडीवर तापल्यास  वाफ(fumes )उत्सर्जित करू लागतो. या वाफेच्या संपर्कात आल्यामुळे मनुष्याच्या शरीरात फ्लू सारखी लक्षणे दिसू लागतात. यामध्ये ताप, डोकेदुखी, थकवा, आणि चक्कर येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.


Taflon flew (Teflon flu) मुख्यत्वे Teflon किंवा polytetrafluoroethylene (PTFE) यासारख्या पदार्थांच्या गरम केल्यामुळे होतो. हे पदार्थ उष्णतेमुळे फ्युम्स किंवा धूर निर्माण करतात, ज्यामुळे flu सारखी लक्षणे दिसू शकतात. यामध्ये ताप, डोकेदुखी, थकवा, आणि चक्कर येणे यासारखी लक्षणे असू शकतात. PTFE गरम झाल्यावर 350°C पेक्षा जास्त तापमानावर पोहोचल्यावर हे फ्युम्स उत्सर्जित होऊ शकतात. 


याचा संसर्ग टाळण्यासाठी PTFE असलेल्या भांड्यांचा वापर करताना कमी तापमानावर वापरावीत तसेच किचन मधे  वायुविजन होण्यासाठी खिडक्या वा exaust fan असणे तितकेच गरजेचे आहे.


प्रतिबंधक उपाय काय?

Teflon Flu टाळण्यासाठी खालील उपाय करता येऊ शकतात:

1. PTFE कोटेड भांड्यांचा वापर कमी तापमानावर करावा.

2. स्वयंपाक करताना किचनमध्ये हवा बाहेर जाण्यासाठी पुरेशी वायुविजन व्यवस्था असावी.

3. PTFE कोटेड भांडी उष्णतेवर जास्त वेळ ठेवू नये.

4. PTFE फ्री भांडी किंवा साहित्यांचा वापर करावा.


Teflon Flu मुळे शरीरावर होणारे परिणाम

Teflon Flu मुळे शरीरात खालील परिणाम होऊ शकतात:

  • - ताप
  • - डोकेदुखी
  • - थकवा
  • - चक्कर येणे
  • - छातीत दुखणे
  • - घसा खवखवणे


Teflon Flu झाल्यास काय काळजी घ्यावी?

Teflon Flu झाल्यास खालील काळजी घ्यावी:

1. घरातील वायुविजन व्यवस्था वाढवा

2. भरपूर पाणी प्या आणि आराम करा.

3. घराबाहेर मोकळ्या हवेशीर जागेत बसा

4. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

          5. कपालभाती वा प्राणायाम अशी योगासने योग्य मार्गदर्शन        घेवून करा


Teflon Flu घातक असू शकतो का?

Teflon Flu सामान्यतः गंभीर नाही, पण काही वेळा त्याच्या लक्षणांची तीव्रता वाढल्यास अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. हे विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि श्वसनाच्या आजारांनी पीडित असलेल्या लोकांसाठी घातक ठरू शकते.



PTFE चा इतिहास 

  1. १९३८ साली राॅय प्लंकेट यांनी प्रथम PTFE चा शोध लावला.
  2. १९५४ साली फ्रेंच इंजीनियर मार्क ग्रिगोरी यांनी आपल्या पत्नीच्या आग्रहाखातर Non Stick pan पहिल्यांदा बनवला जो PTFE चे कोटींग करून बनला होता.
  3. १९६१ साली मारीआन ट्रोझोलो यांनी अमेरिकन मार्केट मधे Non Stick cookware उपलब्ध केले

PTFA बद्दल तांत्रिक माहिती 

PTFE (Polytetrafluoroethylene) हा एक सिंथेटिक फ्लोरोपॉलिमर आहे. याचे रासायनिक सूत्र (C2F4)n असे आहे आणि याला सामान्यतः Teflon या व्यापार नावाने ओळखले जाते. PTFE हा एक अत्यंत स्थिर आणि गंजरोधक पदार्थ आहे, ज्याचा वापर विविध औद्योगिक आणि उपभोक्ता उत्पादनांमध्ये केला जातो.

PTFE ची खास वैशिष्ट्ये

  1. अत्यंत कमी घर्षण गुणांक, 
  2. उच्च तापमान सहनशक्ती, 
  3. रासायनिक स्थिरता 
  4. गंजरोधकता. 

यामुळे PTFE चा वापर वैद्यकीय उपकरणे, स्वयंपाकघरातील भांडी, इलेक्ट्रिकल इन्सुलेशन, आणि औद्योगिक उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.



PTFE ( Non stick Material) कसे बनते?

PTFE बनवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:


1. TFE मोनोमर (सूक्ष्म माॅलिक्यूल) चा वापर: PTFE ची निर्मिती करण्यासाठी Tetrafluoroethylene (TFE) या मोनोमरची आवश्यकता असते. TFE चे उत्पादन करून ते PTFE मध्ये  पॉलिमरायझेशन द्वारा रूपांतरित केले जाते.


2. पॉलिमरायझेशन: . पॉलिमरायझेशन म्हणजे लहान मोलेक्यूल्स (मोनोमर्स) एकत्र आणून मोठ्या मोलेक्यूल्स (पॉलिमर्स) बनवण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत TFE चे अणु एकत्र येऊन PTFE चे लांब शृंखला तयार करतात.


3. निर्मिती प्रक्रिया: PTFE च्या निर्मितीसाठी हाय-प्रेशर आणि हाय-टेम्परेचर रिऍक्टर वापरले जातात. या रिऍक्टरमध्ये TFE चे पॉलिमरायझेशन करून PTFE पावडर तयार केली जाते.


4. फॉर्मिंग आणि फॅब्रिकेशन: तयार झालेली PTFE ही पावडर गरम करून आणि दाब देऊन विविध उत्पादनांमध्ये Mould किंवा coat  केली जावू‌ शकते, जसे की पाइप्स, कोटिंग्स, गॅस्केट्स, सील्स इत्यादी.


निष्कर्ष

विज्ञान आपल्याला जीवन सूकर होण्याचे उपाय देतच असते.  पण हे उपाय ही कधी कधी विशिष्ट परिस्थिती मधे अपायकारक होवू शकतात. 

Teflon Flu ही एक आरोग्य समस्या आहे जी PTFE सारख्या पदार्थांच्या विशिष्ट घातक परिस्थिती (उच्च तापमान) तील वापरामुळे होते. यावर प्रतिबंध करण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी विशेषतः गृहिणींनी जागरूक राहून PTFE वापराताना योग्य ती काळजी घेतल्यास, Teflon Flu टाळता येऊ शकतो

.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या