Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

Chat GPT काय आहे? जाणून घ्या


Collage of ChatGPT Logo and a Robot engaged in computer
ChatGPT Logo and a Robot in communication mode pic courtesy Google 


ChatGPT  हे नेमके काय आहे | इतिहास|निर्माण प्रक्रिया | अवलोकन 

 21वे शतक हे संगणक युग आहे. संगणक शोधातील नवनवे आविष्कार समोर येत आहेत त्यातीलच ChtGPT हे  रोबोटिक संवादाला मानवीय रूप देणारे नवे संशोधन आहे


11 डिसेंबर 2015 रोजी कॅलिफोर्निया, अमेरिका येथे OpenAI नावाच्या कंपनीची स्थापना झाली. OpenAI चे मुख्यालय अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को शहरात आहे . Chat GPT या आधुनिक संगणकीय तंत्राचा समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करणे या उद्देशाने ही कंपनी काही उद्योगपती व‌ शास्त्रज्ञांनी एकत्र येवून स्थापली होती.‌

Written by Avinash Bhanu Asha Ghodke 


OpenAI या कंपनीने बनवले ChatGPT 

Open AI कंपनी‌ च्या नावातील OPEN या शब्दातून कंपनीला आपले गैर-नफा( Non Profit )उद्दीष्ट सूचित करायचे आहे. OPEN AI कंपनीने निर्मित केलेले ChatGPT हे एक Softwere product आहे. ChatGPT मधील GPT चा अर्थ 'Generative Pre Trained' असे असलेले transformer किंवा tool . याला NLP(Natural Language Processing Tool)असेही म्हणतात. आपल्या कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून‌ हे tool त्याला शिकविल्या गेलेल्या बोली भाषेत संवाद करते. 

ChatGPT ची काही प्राथमिक कार्ये

General Assistance 

प्रश्नांना उत्तरे देणे

Email ,Resume, नोकरी व इतर अर्ज असे मसूदे लिहून‌ देणे

Creative Assistance 

कविता,गीते,कथा,सारांश असे सर्जनशील लेखन करून देणे,

दिलेल्या माहितीनुसार चित्र वा चित्रफीत (Video)निर्माण करून देणे

पाककृती,भाषांतर करून देणे

Planning Assistance 

Travel Plan, Party Plan अशा योजना आखून देणे

Technical Assistance 

computer program Code लिहिणे

गणिती प्रश्न सोडविण्यासाठी मदत

 

सशोधन कार्याचे टप्पे 

२०१५ ला कंपनीच्या स्थापनेनंतर

 २०१८ साली प्राथमीक स्वरूपातले GPT तयार झाले

२०१९ साली सुधारीत आवृत्ती GPT 2 आली

२०२० ला GPT 3 आवृत्ती‌ आली

आणि

३० नोव्हेंबर २०२२ ला आजची ChatGPT 4 ही आवृत्ती विकसीत झाली


Open AI ने Chat Gpt बरोबरच 

DALL-E हे चित्र निर्माण करणारे व

SORA - हे चित्रफीत Video Generator Tool ही बनवले


कंपनीने आपल्या 'ना नफा 'उद्दिष्टांवरून फारकत घेतल्याने एलोन मस्क ने सोडली Open AI

Peter Thiel, Sam Altman(CEO), Elon Musk, Reid Halfman, Jessica Livingston, Ilya Sutskever

हे Open AI चे मूळ संचालक‌ मंडळ.  


2018 मधे कंपनी ने Chat GPT चे paid version बाजारात आणण्याचा निर्णय घेतला त्यावेळी Elon Musk यांनी कंपनी आपल्या जनसेवेच्या उद्दिष्टा पासून फारकत घेत आहे असे म्हणाले व या कंपनीतून‌ ते बाहेर पडले . कंपनी‌ पूर्णपणे‌ Microsoft च्या हाती गेल्याचे मस्क यांचे म्हणने होते. यावर कंपनी कडून खुलासा केला गेला की Elon Musk कंपनी चे अधिकांश Equity Shares आपणास मिळावेत असा आग्रह करत आहेत व त्यांना चेअरमन पद ही हवे आहे जे योग्य नाही. मस्क व कंपनीतील ही शाब्दिक लढाई सोशल मीडिया वर ही आली होती व मस्क यांनी OpenAI ने नाव बदलून CloseAI करावे असे मिश्किल विधान केले होते.


Chat GPT कार्यप्रणाली व क्षमता

आधीच feed झालेले लाखो शब्द व वाक्यांचे pattern लक्षात ठेवून . या patterns चा संदर्भ घेत ChatGPT आपली‌ वाक्ये‌ लीहीत असतो. अफाट Memory वा स्मरण‌ शक्ती हे ChatGPT चे स्त्रोत व शक्ती स्थान आहे.


काही अक्षमता 

चालू घडामोडींचा परामर्श ChatGPT घेवू शकत नाही. जेवढे व ज्या काळापर्यंतची माहिती feed असेल तिथपर्यंतचेच प्रश्न वा‌ संवाद ChatGPT करू शकतो. 

चालू घडामोडींवर अद्ययावत माहिती देण्याची Google ची जी क्षमता आहे ती ChatGPT कडे नाही.


अचूकतेचा आभाव व यांत्रिक भाषा

Chat GPT जे सांगत आहे ते अचूक असल्याचा दावा Open AI करीत नाही व तसे disclaimer ते प्रदर्शित करतात. ChatGPT ची भाषा अनेकदा यांत्रिक वा Robotic वाटू शकते. भाषेतील मानवीय भावअनूभूती देण्यास तो तितका सक्षम नाही. Hollywood च्या Screen writers नी आपल्या विविध मागण्यांसाठी अलिकडेच संप पुकारला होता त्या मागण्यांमधे सिनेमा लेखनासाठी ChatGPT च्या वापरावर बंदी आणन्याची एक महत्वपूर्ण मागणी त्यांनी केली होती.


प्रतिस्पर्धी 

Microsoft चे COPILOT व Google चे Gemini AI हे दोन‌ प्रतिस्पर्धी ChatGPT ला‌ आहेत.(Microsoft ची ChatGPT मधे ही गुंतवणूक आहे हे विशेष)


सारांश

कितीही high-tech software gadets आले तरी त्यांना निर्माण करणारी ही मानवी बुद्धीमत्ताच असेल . मानविय विचार‌ व मतांमधे‌ फारकत आली‌ वा स्पर्धा भावना किंवा अहंभाव‌ असे भावनिक संकर कार्यास लागले की high-tech software ही दिडमूठ होणार हे निश्चित . 

FAQ

Is ChatGPT  free for public ?

होय ChatGPT ने  free व  paied असे दोन्ही version उपलब्ध केले आहेत.

https://chatgpt.com/ या संकेतस्थळावर free version चा लाभ तुम्ही घेवू शकता

हे ही वाचा

Google चा Gemini Chatbot: ChatGPT चार स्पर्धक 

एलोन मस्क यांचा Neuralink Project -मानवी‌ मेंदूत Chip Installation 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या