Kushok Bakula Rinpoche: Ladakh च्या पहाडांना भारताच्या झोळीत टाकणारे बौद्ध भिक्खू व लद्दाखी जनतेचे श्रध्दास्थान |Ladakh story
Collage of Ladakh landscape and airport Runway paired with picture of Kushok Bakula Rinpoche |
Ladakh च्या Kushok Bakula Rinpoche यांच्या जीवन कार्याचा परिचय
Written by Avinash Bhanu Asha Ghodke
कुशोक बकुला रिंपोचे यांचा जन्म १९ मे १९१७ रोजी झाला. ते १९ वे 'रिंपोचे' म्हणून ओळखले जातात. रिंपोचे ही तिबेटी बुद्धीजम मधली उच्चतम आध्यात्मिक अशी पदवी आहे. बकुला रिंपोचे हे Ladakh मधील लोकांचे प्रेरणा स्थान आहेत म्हणूनच आज लद्दाख मधील भारतातील सर्वात उंच विमानतळाला( 3256 मीटर उंच ) त्यांचे नाव देण्यात आलेले आहे. खरंतर हे विमानतळ कुशोक बकुला यांनी भारतीय सैन्याला दान केलेल्या जमीनीवर उभारले गेले आहे ही वस्तुस्थिती आहे.
Ladakh राजघराण्याची legacy
Kushok Bakula Rinpoche यांचा जन्म लद्दाख च्या प्रभावशाली राजघराण्यात झाला. ते लद्दाखच्या राजघराण्याशी संबंधित होते आणि त्यांच्या कुटुंबाचे लद्दाखच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान आहे. लद्दाख चे शेवटचे राजे त्सेपल तोंडुप नमग्याल (1820-1834)Tsepel Tondup Namgyal यांचे ते १९ वे वंशज आहेत.
Ladakh मधील सामाजिक कार्य
कुशोक बकुला रिंपोचे यांनी लद्दाखच्या कष्टप्रद जीवन जगणाऱ्या समाजासाठी खूप सामाजिक कार्य केले. शिक्षण, आरोग्यसेवा, आणि धार्मिक पुनरुत्थान यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी दुर्गम Ladakh मधे शिक्षण संस्था आणि मठ स्थापन केले ज्यामुळे लद्दाखच्या लोकांचे जीवनमान उंचावले. ४०-५० च्या दशकापर्यंत लद्दाखी जनता अतीशय खडतर असे जीवन जगत होती. विशिष्ट भौगोलिक परिस्थिती मुळे शेती वा उद्योग तेथे नव्हते. शासकीय यंत्रणाही या दुर्गम भागापर्यंत पोहोचत नव्हती. अशा बिकट परिस्थितीत Kushok Bakula Rinpoche यांनी लद्दाखी जनतेला मनोधैर्य व प्रेरणा दिली.
लद्दाखी जनतेचे श्रध्दास्थान
Ladakh ची जनता कुशोक बकुला यांना गौतम बुद्धांच्या १६ प्रमुख शिष्यांपैकी एक मानते. लद्दाखी लोकांसाठी ते दैवत आहेत आणि ही केवळ बुद्धीस्ट लोकांची भावना नसून Ladakh मधील सर्व धर्मीय समाज त्यांना देव मानतो.
Ladakh मधे पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध फौज उभी केली
१९४७ च्या भारत-पाक विभाजना नंतर पाकिस्तानने दगाबाजी करून अयोग्य पद्धतीने काश्मिर व लद्दाख भाग काबिज करण्यासाठी हल्ला केला होता. गरीब लद्दाखी जनता या हल्ल्याने भयभीत झाली होती.अशा वेळी Kushok Bakula Rinpoche यांनी या लद्दाखी जनतेला नेतृत्व देवून एकजूट केले. लद्दाख सोडून जाणार्या तरुणांना त्यांनी रोखले व त्यांना सशस्त्र प्रतिकार करण्यासाठी सैनिकी प्रशिक्षण देवून तयार केले. लद्दाख स्काऊट ( Ladakh Scouts)या लद्दाखी तरूणांच्या ब्रिगेड ने ही पाकिस्तानी घुसखोरांचा निकराने सामना केला . एका बौद्ध भिक्खू ने सैनिकी लढ्याचे नेतृत्व करण्याची ही एक अनोखी ऐतिहासिक घटना होती. लद्दाखी जनतेने कुशोक बकुला रिंपोचे यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई जिंकली व Ladakh ला पाकिस्तानात विलीन होण्यापासून वाचवले. लद्दाखी जनता आज ही म्हणते " Kushok Bakula Rinpoche नसते तर आज लद्दाख पाकिस्तानात असते" आणि हे तथ्य कुणीही नाकारू शकत नाही. Ladakh Scouts आज ही भारतीय सेनेत Mountain Defence विभागात कार्यरत आहे.Ladakh मधील राजकीय कारकीर्द
पूढे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी Kushok Bakula Rinpoche यांच्यातील नेतृत्व गुण ओळखून त्यांना राजकीय प्रवाहात आणले. त्या वेळेस Ladakh हा जम्मू-काश्मीर चाच एक भाग होता. नेहरूंच्या आग्रहामुळे कुशोक बकुला रिंपोचे जम्मू काश्मीर चे पहिले आमदार म्हणून निवडून आले.
कुशोक बकुला रिंपोचे यांची राजकीय कारकीर्दही तितकीच महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी लद्दाखच्या आवाजाला राष्ट्रीय पातळीवर नेले. ते जम्मू काश्मीर विधानसभेत Ladakh चे प्रतिनिधित्व करत होते आणि त्यांनी लद्दाखच्या समस्यांवर जोरदार भाष्य केले.
File pic | Courtesy Google| Kushok Bakula Rinpoche at public meeting demanding Union Territory status for Ladakh |
३७० कलम विरोधी भूमिका व Ladakh काश्मीर हून वेगळा असल्याचे प्रतिपादन
कुशोक बकुला यांनी ३७० कलमा च्या विरुद्ध अशी भूमिका सुरूवातीपासूनच घेतली होती. कुठल्याही परिस्थितीत भारताचे ऐक्य अबाधीत रहावे असे त्यांचे म्हणणे होते पण Ladakh काश्मीर प्रांताचा एक भाग आहे हे त्यांच्या लद्दाखी अस्मितेला पटत नव्हते. सांस्कृतिक दृष्ट्या लद्दाख काश्मीर हून भिन्न आहे. इथल्या सामाजिक समस्या वेगळ्या आहेत असे त्यांचे म्हणने होते व Ladakh ला स्वतंत्र Union Territory करावी अशी त्यांची मागणी होती.
1952 च्या पहिल्या बजेट सत्रातील निराशा
१९५२ साली जम्मू काश्मीर विधानसभेत पहिले बजेट सादर झाले त्यात Ladakh साठी कुठलीही आर्थिक तरतूद नव्हती हे लक्षात आल्यावर Kushok Bakula Rinpoche मनातून दुखावले. Speaker सादिक यांची परवानगी घेऊन त्यांनी कुठलाही आवेश न आणता साधेपणाने लद्दाखी भाषेत बोलत आपल्याच पक्षाच्या शेख अब्दुल्ला यांना जनाब असे संबोधत Ladakh वरील आन्यायाचा जाब विचारला.Ladakh मधील मुसलमानांचे आदरस्थान
कुशोक बकुलांना लद्दाखी मुसलमानांकडून नेहमीच प्रेम व आदर मिळाला. आपल्या राजकीय कारकीर्दीत कुशोक बकुला यांचे दोन्ही प्रमूख सहाय्यक हे मुस्लिम होते. Kushok Bakula यांनी कधीच धर्माचे राजकारण केले नाही.चीन बद्दल नेहरूंना चेतावनी दिली होती
१९५० च्या चीनच्या तिबेट वरील कब्जा नंतर कुशोक बकुला यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सचेत करत सांगितले होते " चीनवर भरोसा करणे योग्य नाही! चीन कधीही घात करू शकतो व तो Ladakh व चीन मधील बफर झोन वर आक्रमण करू शकतो!" कुशोक यांचा हा तर्क पुढे खरा ठरला. १९६२ साली चीन ने भारतावर आक्रमण केले.
चंगेज खान च्या मंगोलिया देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती
१९९० साली Kushok Bakula Rinpoche यांची मंगोलियात भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती झाली. १९९० ते २००० असा दहा वर्षांचा काळ ते मंगोलियात राजदूत होते.मंगोलियातील रशियन कम्युनिस्ट राजवट संपुष्टात आल्यानंतरचा तो काळ होता. कम्युनिस्ट राजवटीत बौद्ध धर्माची सर्व प्रार्थना स्थळे नष्ट करण्यात आली होती व बौद्ध धर्म व संस्कृती चा पूर्ण र्हास झाला होता.
मंगोलिया च्या बुद्धीस्ट धार्मिक पुस्तकांत असे भविष्य वर्तवले होते की 'दक्षिण दिशेकडून एक बौद्ध भिक्खू येईल व तो मंगोलियात बौद्ध धर्माची पुनर्स्थापना करेल' मंगोलियन जनतेचा पूर्ण विश्वास होता की Ladakh चे कुशोक बकुला रिंपोचे हे तेच बौद्ध भिक्खू आहेत. मंगोलियन जनतेचा विश्वास सार्थ करत कुशोक बकुला यांनी बौद्ध धर्माला मंगोलियात पुनर्स्थापित केले. अनेक मठ व विहार त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंगोलियात बांधण्यात आले. भिक्खू संप्रदायासाठी प्रशिक्षण व वसतीगृहे कुशोक बकुला यांनी बांधली. गौतम बुद्धांचा जन्म दिवस , ज्ञान प्राप्ती दिवस व महापरिनिर्वाण दिवस हे तीन दिवस मंगोलियात मोठ्या प्रमाणात साजरे होवू लागले यात Kushok Bakula Rinpoche यांचा हात आहे.
२००० साली आपली मंगोलिया तील भारतीय राजदूत पदाची कारकीर्द संपल्यानंतर तीनच वर्षांनंतर
४ नोव्हेंबर २००३ रोजी कुशोक बकुला रिंपोचे यांचे महापरिनिर्वाण झाले
मंगोलिया व Ladakh च्या जनतेच्या कायम स्मरणात
२०१९ पासून मंगोलियात भारताचे राजदूत म्हणून कार्यरत असलेले M P Singh यांनी कुशोक बकुला यांच्या कार्यालयाचे दालन न वापरता सदर कार्यालयीन दालनात त्यांनी Kushok Bakula Rinpoche यांची प्रतिमा स्थापन केली आहे व तिथे नित्य नेमाने पूजा विधी केला जातो.
Kushok Bakula Rinpoche हे फक्त एक धार्मिक नेते नव्हते, तर ते एक महान समाजसेवक आणि राजकीय नेते होते. त्यांच्या कार्यामुळे Ladakh च्या लोकांचे जीवनमान उंचावले . त्यांनी जीवनभर लद्दाखी समाजाच्या भल्यासाठी काम केले. Ladakh च्या लोकांच्या हृदयात Kushok Bakula Rinpoche यांचे स्थान नेहमीच अढळ राहील.
सारांश
Ladakh म्हणजे फक्त रम्य पहाडांचा प्रांत नाही तर तो पहाडांसारखी नैतिक उंची असलेल्या कुशोक बकुला रिंपोचे यांचा प्रदेश आहे हे यापुढे आपण लक्षात ठेवायला हवे.
FAQ
-Ladakh ला किती साली Unio Territory घोषित केले गेले?
Ladakh ला 31 October 2019 रोजी Unio Territory अर्थात केंद्र शासित प्रदेश म्हणून मान्यता दिली गेली
- कारगिल Ladakh चा भाग आहे का?
होय! कारगिल हे Ladakh मधेच अंतर्भूत आहे
-Ladakh किती उंचीवर आहे?
Ladakh समुद्र सपाटी पासून 2,800 ते 4,500 मीटर उंचीवर आहे. Ladakh ची काही पर्वत शिखरे 6000 मीटर हून आधिक उंच आहेत.
1000 मीटर = 3280 फूट हे प्रमाण लक्षात घ्यावे
हे ही वाचा :
- 80s Pop Star Teena Turner चं अध्यात्म
- दिग्दर्शक शेखर कपूर यांची माता अमृतानंदमयी वरची Documentary: SCIENCE OF COMPASSION
0 टिप्पण्या