"408 km ला 25 तास? Sunita Williams चं अंतराळ यान 17 च्या Speed नी चालत का भाऊ ?!"
Simple graphic depicting rotation and positioning of Space shuttle and Space station in space above Earth |
Sunita Williams चे Starliner अंतराळ यान इच्छित Target च्या परीघात काही मिनीटांतच पोहोचले पुढील 25 तासांचा वेळ docking ला लागला .
Sunita Williams 408 km वरील अंतराळ स्थानका वरून live communication करणार आहे . या Target स्थळावर तिला 'पोहोचायला' 25 तास लागले असे काही वृत्तांमधे यापूर्वी लिहिले गेले आहे. खरंतर हा वेळ Docking साठी लागला त्याचा खुलासा.
Written by Avinash Bhanu Asha Ghodke
408 km म्हणजे अंदाजे मुंबई ते वडोदरा हे अंतर किंवा मुंबई ते कोकणातील राजापूर. 28000 कि.मी. प्रती तास वेगाने चालणाऱ्या Starliner ला फक्त 408 km साठी 25 तास का? असा प्रश्न सामान्य माणसाला पडणे स्वाभाविक आहे.
५ जून२०२४ रोजी Sunita Williams ही भारतीय वंशीय अंतराळवीर Boeing Starliner या NASA च्या यानाने अंतराळातील ISS (International Space Station) या NASA च्या पृथ्वीपासून 408 km वर स्थित Space Station वर पोहोचली. तांत्रिक कारणांमुळे त्यांचा परतीच्या प्रवासावर सध्या प्रश्न चिन्ह लागले आहे.
पृथ्वीपासून ISS हे स्पेस स्टेशन अंदाजे 408 कि.मी. अंतरावर आहे. हे अंतर मुंबई ते वडोदरा तील अंतरा एवढे आहे पण हा प्रवास vertical आहे. पृथ्वीपासून 80 km वरची वायुमंडळाची (Atmosphere)कक्षा भेदून पुढे अंतरिक्षात प्रवेश करणे हे खूप तांत्रिक आणि जोखीमीचे असे काम आहे.
सर्वात कमी वेळात Space Target गाठण्याचा Record
NASA च्या या Mission चे Commander बच विलमोर (Butch Wilmore) यांच्या सोबत Pilot Sunita Williams ने हे 408 कि. मी. वरचे अंतरिक्षातील Target 25 तासात गाठले. आतापर्यंतच्या रेकॉर्ड अनुसार या संपूर्ण process ला लागलेली ही सर्वात कमी अशी वेळ आहे.
काही वृत्तांमधून मोघम पणे बातमी लिहिताना "प्रवासाला किंवा पोहोचायला 25 तास लागले" असे लिहिले गेले . खरंतर 408 km च्या अंतरिक्ष प्रवासाला 25 तास नाही तर Target गाठायला 25 तास वेळ सुनीता विल्यम्स यांच्या यानाला लागला ही वस्तुस्थिती आहे
अंतरिक्ष यान Target कसे गाठते. The Docking process
28000 km प्रती तास आशा प्रचंड वेगाने सुटलेले पृथ्वीवरून सुटलेले यान तेवढ्याच प्रचंड वेगाने अंतरिक्षात प्रदक्षिणा करणार्या स्पेस स्टेशन (ISS)शी सुसंगती साधत विशिष्ट ठिकाणी जावून जुळते किंवा dock होते. ही प्रक्रिया एक जटील गणितीय प्रक्रिया असते. यानातील Astronaut व पृथ्वी वरील संशोधन केंद्रातील संशोधकांच्या समन्वयातून ही प्रक्रिया घडत असते या प्रक्रियेला Phasing असे म्हणतात.
Phasing
विशिष्ट गणिती व तांत्रिक कौशल्य वापरून अंतरिक्षातील वेगवेगळ्या परीघात वेगात फिरणाऱ्या Space Station व Space craft ला एका पातळीवर आणून Space craft ला Space Station ला dock केले जाते याला Phasing म्हटले जाते.
Phasing प्रक्रियेत Space craft ला Space station शी Horizontal व Vertical या दोन पातळींवर पुढे सरकत Dock व्हायचे असते.
रोज 16 सूर्योदय
Starliner मधील बिघाड काय आहे?
सुनीता विल्यम्स व बच विलमोर या दोघांनी 5 जून रोजी Boeing च्या Star Liner या त्यांच्या Rocket यानाला अंतराळातील 408 कि.मी. वरील ISS ला जोडले किंवा Dock केले. 13 जूनला त्यांचे परत येणे निश्चित होते पण काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा परतीचा प्रवास लांबणीवर पडल्याचे दिसत आहे.
- 1. Helium Leak
- 2. Thruster Malfunction
- हे दोन मुख्य तांत्रिक बिघाड NASA ने यासंदर्भात स्पष्ट केले आहेत.
- 1. Helium Leak
- 2. Thruster Malfunction
- हे दोन मुख्य तांत्रिक बिघाड NASA ने यासंदर्भात स्पष्ट केले आहेत.
वरील तांत्रिक बिघाडामुळे आतापर्यंत 9 वेळा Sunita Williams व Butch Wilmore यांचा परतीचा प्रवास पुढे ढकलण्यात आला आहे.
NASA ने दिलेल्या माहितीनुसार पुढील 45 दिवस Starliner चे दुरुस्ती चे काम चालू रहाणार आहे व एवढे दिवस सर्व system योग्य रितीने चालू राहील इतका इंधन व इतर साठा Starliner वर उपलब्ध आहे.
परतीच्या मार्गावर वायूमंडळात शिरताना विशेष जोखिम
Sunita Williams च्या परतीच्या मार्गावर जेंव्हा पृथ्वीपासून वरील 80 km अंतरावरील वायु मंडळाच्या सीमेला ओलांडून आत येताना नेहमीप्रमाणे जटील व जोखमीची तांत्रिक प्रक्रिया काळजीपूर्वक राबवावी लागेल. या प्रक्रियेत जराही चूक झाल्यास ती घातक ठरू शकते कारण अशा परीस्थिती हे यान अंतराळात कायम स्वरुपी भरकटत रहाण्याची शक्यता असते.
ISS the largest Space Station in Space Pic courtesy Wikipedia |
ISS या Space station बद्दल काही वेचक माहिती
- NASA (United States)
- ROSCOSMOS (Russia),
- JAXA(Japan),
- ESA(Europe),
- CSA(Canada).
- अंतरिक्षात - 20 Nov 1998 सालापासून कार्यरत
- अंतर - अंतरिक्षात पृथ्वीपासून 408 km वर
- वजन- 4,50,000 kg
- लांबी रूंदी - 358 ft - 239 ft
- परीवलन वेग- 7.67 km per Second
- खर्च - 150 Billion Dollars
FAQ
Sunita Williams ने आत्तापर्यंत अंतरीक्षात किती दिवस काढलेत?
आधीचे NASA चे Expedition 32 व अत्ताचे Expedition 33 या दोन्ही च्या सहभागातील एकूण 322 दिवस Sunita Williams अंतरिक्षात राहिली आहे.
जगातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे?
रशियाची Valentina Tereshkova जगातील पहिली महिला अंतराळवीर आहे. 16 जून 1963 रोजी Valentina ने Vostok 6 या Mission साठी अंतराळात प्रवेश केला.
ISS (International Space Station) किती मोठे असते?
एखाद्या फुटबॉल मैदानाच्या व्याप्ती एवढे Space Station असते.
0 टिप्पण्या