Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

Top International film director Shekhar Kapoor's Documentary on Amma -माता अमृतानंदमयी यांच्यावरील शेखर कपूरचा माहितीपट

 

Science of Compassion -  दिग्दर्शक शेखर‌ कपूर यांच्या या माहितीपटात अम्मा म्हणते 

"प्रेम हे नित्य नवे असते"

written by Avinash Bhanu Asha Ghodke 

Bandit Queen (दस्युकन्या फूलनदेवी), Elizabeth ( कठोर शासनकर्ती स्त्री) या दोन चित्रपटांनंतर शेखर कपूर यांनी Science of Compassion हा माता अमृतानंदमयी यांच्यावरील माहिती पट बनवून‌ एका प्रकारे स्त्री शक्ती विषयाची Trilogy पूर्ण केली. दहा वर्षांपूर्वीची ही documentary आजही उद्बोधक वाटते कारण अम्मा ने म्हटल्याप्रमाणे प्रेम हे नित्य नवे असते

On left spiritual Guru Amma and on right Film Director Shekhar Kapoor
डावीकडे आध्यात्मिक गुरू माता अमृतानंदमयी व उजवीकडे  दिग्दर्शक शेखर‌ कपूर 


अम्मा चे बालपण व आध्यात्मिक ओढ

माता अमृता नंदमयी यांचा जन्म 27 सप्टेंबर 1953 रोजी झाला. केरळमधील  खाडीने वेढलेल्या इवल्याशा अलप्पड गावची सुधा अर्थात सुधामणी इदमनेल लहानपणापासूनच अध्यात्माकडे ओढली गेली होती. देहभान विसरून ध्यान व नामस्मरणात लीन होणे नित्याचे होते. कारूण्यभाव हा तिच्या भाव आविष्करणाचा मूल बिंदू होता. पीडितांचे दुःख पाहून छोट्या सुधा च्या डोळ्यांतून मातृत्वाची सरीता वाहे. याच तिच्या मातृत्व भारल्या डोळ्यांच्या ओढीने आज तिचे जगभर पसरलेले भक्तगण केरळमधील तिच्या आश्रमात येत रहातात. त्यांना त्यांच्या अम्माला भेटायचे असते .सकाळपासून रात्री उशीरापर्यंत दर्शनासाठी भक्तांची रीघ लागलेली असते. अम्मा प्रत्येक भक्ताला वैयक्तीक भेटते हे विशेष. 

अलप्पड च्या खाडीचे विहंगम दृश्य 

Hugging saint अर्थात मातृत्व मिठीत घेणारी साध्वी

अम्मा प्रत्येक भक्ताला तिच्या मातृत्व मिठीत घेवून आशिर्वाद देते. अम्मा ची ही मिठी भक्तांसाठी 'दिव्य अनुभूती' असते. अम्मा च्या या मिठी ने शरीरातील सात आध्यात्मिक चक्रे शुद्ध होतात असे भक्त सांगतात. अम्माच्या याच आध्यात्मिक 'मातृत्व मिठी' मुळे तिला तिचे पाश्चात्य भक्तगण Hugging Saint संबोधतात.  ‌"अध्यात्म म्हणजे करुणा भाव" अशी अध्यात्माची स्पष्ट आणि सोपी परिभाषा अम्मा करते.माणुस एकवेळ आपल्या वैज्ञानिक गणनेत चुकेल पण करुणा भावाने केलेले कर्म नेहमीच अचूक व शाश्वत रहाते असे अमेरिकेतील Stanford University च्या एका परिसंवादात अम्मा म्हणाली होती.

Amma seen pampering infant baby of deciple
अम्मा भक्ताच्या लहान बाळाचे लाड करताना 

वाढदिवस समारोहास पंतप्रधान नरेंद्र मोदींची हजेरी

अम्माच्या याच कारुण्य अध्यात्माचा उलगडा करण्यासाठी प्रसिद्ध सिने दिग्दर्शक शेखर कपूर यांनी आम्मा वर   Science of Compassion (करुणेचे विज्ञान) हा माहितीपट चित्रित केला आहे. 27 September 2013 रोजी अम्माचा जन्म दिन कोल्लम,केरळ येथील अम्माच्या मुख्य आश्रमात साजरा झाला.  या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हजेरी लावली होती.  या सोहळ्या दरम्यानच शेखर कपूर ने 'Science of Compassion' ही अम्मा वरील Documentary चित्रीत केली आहे.

 

सदर माहिती पटात अम्मा ने व्यक्त केलेले काही विचार

3:51-आरशात पाहताना स्वतःच्या अंतर्मनात ही डोकावणे गरजेचे असते 

4:15-सृजनशीलता सगळ्यांमधे आहे .आपण ती ओळखून तिच्यावर काम केले पाहिजे 

12:02- आज च्या शिक्षण पद्धतीमध्ये मूल्य शिक्षणाचा अभाव आहे . विद्यार्थी व शिक्षकांमधे भावनिक नाते निर्माण होत नाही 

22:07- स्वकेंद्री जगण्यामुळे आपण समाजाला काही देणे लागतो हे आपण विसरून गेलो आहोत.

25:56- आध्यात्मिक शांती मनाचं Air conditioning करते मग‌ इतर ऐहिक सुखसुविधांची गरज भासत नाही.

29:30- गत काळाचा व भविष्याचा विचार करणे व्यर्थ आहे.जे आहे ते आज आणि आत्ता आहे

37:08- जिथे प्रेम असतं तिथं कंटाळा उद्भवत नाही कारण प्रेम हे सदैव नित्य नूतन असते 

37:56- बेडकाच्या पिल्लाला ( Tadpole) लहानपणी शेपटी असते तेंव्हा ते फक्त पाण्यात जगू शकते. एकदा शेपटी गेली की ते कुठे ही जावू लागते. आपण मात्र शेपटी मधेच अडकून‌ बसतो. - आत्मज्ञान‌ म्हणजे प्राणिमात्र व परमेश्वर हे एकच आहेत हे समजणे

39:52- माझा वाढदिवस साजरा करणं स्वामींनी सुरू केलं.मी स्वतः वाढदिवस असा मानत नाही.खरंतर ज्या दिवशी तुम्ही विसराल की तुम्ही कधी‌ जन्मला होता तोच तुमचा नवजन्म व वाढदिवस 

44:3- चिंता हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आपल्या कल्पना शक्तीचा सर्वात मोठा दुरूपयोग म्हणजे चिंता

 

Eary morning shot of Amma with director Shekhar Kapoor
अम्मा शेखर कपूर सोबत प्रभात ध्यानाला जाताना 
Documentary SCIENCE OF COMPASSION यूट्यूब वर या लिंकवर पाहता येईल


हे ही वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या