Great Maratha महादजी शिंदे: युद्धसामग्रीसाठी ‘Make In India’ तत्त्व अमलात आणणारा दृष्टा राजा
![]() |
Great Maratha Mahadji Shinde |
महादजी शिंदे हे केवळ एक पराक्रमी सेनानीच नव्हते, तर दूरदृष्टी असलेले कुशल उद्योजक ही होते. स्वयंपूर्णता आणि लष्करी सामर्थ्य वाढवण्याची दूरदृष्टी महादजींनी दाखवली.
एमरिस च्यू (Emrys Chew) हे प्रख्यात इतिहासकार आणि केंब्रिजचे स्कॉलर, आपल्या ‘Arming the Periphery: The Arms Trade in the Indian Ocean during the Age of Global Empire’ (पालग्रेव मॅकमिलन प्रकाशित) या पुस्तकात लिहितात की, "महादजी शिंदे यांनी आग्रा जवळ स्वतःचे सैनिकी-औद्योगिक संकुल (Military Industrial Complex) उभारले."
स्वदेशी तंत्रज्ञान आणि स्थानिक उत्पादकांना आधार
महादजी शिंदे यांच्या सैनिकी-औद्योगिक संकुलात दारुगोळा आणि पोलादी तोफांची निर्मिती केली जात होती. यासाठी त्यांनी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला आणि स्थानिक उत्पादकांना यामध्ये सहभागी करून घेतले.
![]() |
Maratha Cannon |
![]() |
Maratha Cannon pic courtesy Google |
मराठ्यांचे तोफखाने आणि शस्त्रनिर्मिती हे कोणत्याही परकीय मदतीशिवाय चालत होते, हे ब्रिटिशांसाठी मोठा धक्का होता. तेव्हाच्या ईस्ट इंडिया कंपनीला या स्वयंपूर्ण लष्करी उत्पादन व्यवस्थेमुळे मोठी चिंता वाटू लागली. त्यामुळेच, ब्रिटीश सरकारने आपल्या नागरिकांना मराठ्यांसाठी तोफगोळे डागणाऱ्या तोफखान्यात काम करण्यास बंदी घातली आणि भारतीय उपखंडात बंदुकींच्या व्यापारावरही निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला.
'मेक इन इंडिया’ Make in India तत्त्वाची सुरुवात
आज ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना नवीन वाटत असली, तरी महादजी शिंदे यांनी तब्बल २५० वर्षांपूर्वीच या तत्त्वाची अंमलबजावणी केली होती. त्यांनी मराठ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व लष्करी सामग्रीसाठी स्वदेशी उत्पादन व्यवस्था निर्माण केली.
यामुळे मराठ्यांना युरोपियन व्यापारावर अवलंबून राहावे लागत नव्हते. याशिवाय, भारतीय शस्त्रनिर्मितीला चालना मिळाली, स्थानिक कारागीर आणि उत्पादकांना व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या.
महादजी शिंदे: एक द्रष्टे नेतृत्व
महादजी शिंदे यांचा हा दृष्टिकोन केवळ सैनिकी क्षेत्रापुरता मर्यादित नव्हता. त्यांनी मराठा राज्याचे संपूर्ण राजकीय, आर्थिक आणि लष्करी स्वरूप स्वयंपूर्ण बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली.
त्यांच्या पुढील पिढीतील शिंदे राजांनीही उद्योग, व्यापार आणि लष्कराच्या विकासासाठी धोरणे आखली. ग्वालियरच्या वाणिज्य विकासात त्यांचा मोठा वाटा होता आणि पुढे जाऊन टाटा आणि बिर्ला यांसारख्या उद्योगपतींनाही शिंदे घराण्याचा आधार मिळाला.
उत्साह, स्वाभिमान आणि राष्ट्रनिर्मितीचा आदर्श
महादजी शिंदे यांनी दाखवलेला ‘मेक इन इंडिया’ Make in India चा मार्ग आजच्या भारतासाठीही प्रेरणादायी आहे. देशी उत्पादन, लष्करी स्वयंपूर्णता आणि स्थानिक उद्योजकांचा विकास या तत्त्वांवर त्यांनी उभारलेली व्यवस्था भारतीय सैनिकी धोरण आणि आर्थिक धोरणांसाठी एक आदर्श आहे.
सिंधिया घराण्याने महादजी शिंदे यांच्या उद्योजकतेचा वारसा पुढे चालवला
महाराज माधवराव (द्वितीय) शिंदे
महाराज माधवराव (द्वितीय) शिंदे, जे 'माधो महाराज' म्हणून प्रसिद्ध होते, त्यांनी भारतीय व्यवसायांना नवे मार्ग उपलब्ध करून दिले. स्वदेशी उद्योग आणि कुटीर व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी १९०६ मध्ये ग्वालियरच्या लष्कर येथे पहिले Chamber of Commerce (वाणिज्य मंडळ) स्थापन करण्यात आले.
TATA BIRLA यांना भांडवल पुरवठा
जयाजीराव शिंदे यांचे भारतीय रेल्वे साठी योगदान
जयाजीराव शिंदे यांनी भारतीय रेल्वेच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, जी देशाच्या आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाचे माध्यम बनली.
१८७२ मध्ये, शिंदे संस्थानाने Great Indian Peninsula Railway च्या आग्रा-ग्वालियर मार्गाच्या बांधणीसाठी ₹७५ लाख कर्ज दिले. त्यानंतरच्या वर्षी, राजपूताना-माळवा रेल्वेच्या इंदूर-नीमच विभागासाठी समान रक्कम कर्जस्वरूपात दिली.
महादजी शिंदे यांनी भारताला राष्ट्रवाद , युद्ध नीती व व्यापार यांची सांगड घालून पुढे जाण्याची प्रेरणा दिली आहे. भारत त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून स्वयंपूर्णतेकडे आज यशस्वी वाटचाल करीत आहे.
-Do read the English version of this Blog on my LinkedIn post
हे ही वाचा ;
0 टिप्पण्या