Elon Musk म्हणतात सेल-फोन फेकुन देण्याची वेळ जवळ. आता Neuralink येतेय.
Elon Musk म्हणतात सेल-फोन फेकुन देण्याची वेळ जवळ. आता Neuralink येतेय.
संगणकानी ८० च्या दशकात मानवी जीवनात प्रवेश केला. आता अर्धशतकीय वाटचाली नंतर व संगणकीय AI ( Artificial intelligence) चा आविष्कार झालाय. संगणक मानवी जीवनावर आपले लगाम कसतोय की काय अशी शंका वाटू लागलीय. कारण कृत्रिम संगणकीय बुद्धीमत्ते च्या यशानंतर लगेच Neuralink project मार्गी लागतोय. Neurotechnology हा माणसाच्या रोबोटीकरणाचा एक टप्पा आहे का ?
Written by Avinash Bhanu Asha Ghodke - 11:30 am
Elon Musk यांचे X account वर Neuralink बद्दल ट्वीट
Neuralink चे प्रणेते इलोन मस्क यांनी ठामपणे जाहीर केले आहे की भविष्यात Neuralink वापरणाऱ्यांचेच वर्चस्व राहील आणि फोनची आवश्यकता पूर्णपणे संपुष्टात येईल. गाण्यांचे जसे parody song असते तसे प्रसिद्ध व्यक्तींचे social media वर parody account उघडून त्यांची खिल्ली उडविली जाते . अशाच एका parody account वरून Elon Musk यांचा एक फोटो प्रसिध्द झाला ज्यात त्यांच्या मस्तका वर Neuralink network pattern प्रकाशमान झालेले AI निर्मित चित्र दाखविण्यात आले आहे. याच ट्विटरवरील( X ) मस्क यांच्या Parody अकाउंटच्या post ला उत्तर देताना, स्वत: मस्क यांनी ट्वीट केले की, "भविष्यात फोन असणार नाहीत, फक्त न्यूरालिंक असतील," या ट्वीट द्वारे इलोन मस्क यांनी त्यांच्या Neuralink कंपनीच्या चिप तंत्रज्ञानाचे भविष्य स्पष्ट केले.
काय आहे Neuralink ?
भविष्य वेधी कल्पनांचे अचाट वैज्ञानिक प्रकल्प राबणारे उद्योगपती Elon Musk म्हणतात " सेल फोन फेकुन द्यायची वेळ जवळ आहे .. आता Neuralink चे युग येतेय..,.. ............. एलोन मस्क यांनी न्यूरालिंकचे भविष्य वर्तवले आहे, ज्यात भविष्यात माणसाच्या च्या मेंदूतील चिप त्याच्या हातातील फोनची जागा घेईल. Elon Musk यांच्या न्यूरालिंक प्रल्पाने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे ज्यात त्यांनी नोलेण्ड आर्बॉह या तरूणाच्या मेंदूत ही चिप बसवली होती, ज्यामुळे तो आपल्या मना च्या आज्ञाबरहुकूम उपकरणे नियंत्रित करू शकतो. मस्क यांनी X वरील आपल्या अकाऊंट वरून ही बातमी देत आनंद व्यक्त केला आहे.
Neuralink चा Experimental Pilot project
मस्कची महत्वाकांक्षी न्यूरोटेक्नोलॉजी फर्म Neuralink नेअलीकडेच प्रायोगिक तत्वावर एका तरुणाच्या च्या मेंदूत चिप बसवून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. 29 वर्षांचा Noland Arbah नोलेण्ड आर्बॉह हा तरूण , आठ वर्षांपूर्वी झालेल्या अपघातानंतर खांद्यापासून खाली पक्षाघातग्रस्त झाला होता.
आर्बॉह वर 28 जानेवारीला 2024 ला हे ऐतिहासिक Brain Implant Operation केले गेले आणि ऑपरेशननंतर केवळ दोन दिवसांत अपेक्षित अशी आशादायक चिन्हे दिसू लागली. आर्बॉहच्या ऑपरेशनच्या 100 दिवसांच्या टप्प्यावर, Neuralink ने त्याच्या प्रगतीची सविस्तर माहिती ब्लॉग पोस्ट द्वारा प्रसिद्ध केली आणि एलोन मस्क यांनीही विविध ट्वीट्सद्वारे आर्बॉहच्या स्वस्थतेबद्दल प्रसार माध्यमांतून माहिती दिली आहे. News Nation या अमेरिकन वृत्त वाहिनेने २२ में २०२४ रोजी आर्बॉह ची मुलाखत प्रसिद्ध केली ज्यात आर्बॉह ने प्रात्यक्षिक देत आपल्या विचारांच्या अनुसार कंप्युटर स्क्रीन वर चा कर्सर हलवून दाखवला आहे. ही मुलाखत YouTube वर उपलब्ध आहे.
Neuralink च्या मानवी चाचण्या सुरू करण्यासाठी २०२३ मधेच कायदेशीर मान्यता मिळाली होती पण खरंतर ही मान्यता मिळण्यापूर्वी पासूनच रुग्णांकडून Neuralink बद्द्ल उत्सुकता दाखवली जात होती, असे राॅयटर्स या वृत्तसंस्थेने सूत्रांचा हवाला देत सांगितले आहे.
Neuralink ची कार्यप्रणाली
या अभ्यासामध्ये एका रोबोटचा वापर करून मेंदू व संगणकाची एक संवादीनी (Brain Computer Interface) मेंदूतील शरीराच्या हालचालींचे नियंत्रित करणाऱ्या भागात शस्त्रक्रिया करून बसवण्यात (Implant)येणार आहे, असे कळते.
संशोधनाची कालमर्यादा आणि सहभागी
Neuralink च्या संशोधनाची प्राथमिक पूर्णता साल 2026 मध्ये अपेक्षित आहे, तर संपूर्ण अभ्यास 2031 मध्ये संपेल. या अभ्यासामध्ये 22 ते 75 वयोगटातील व्यक्ती ज्यांचे माने खालील पूर्ण शरीर पक्षाघातग्रस्त आहे (quadriplegia) अशा रुग्णांचा समावेश असेल
परामर्श
Elon Musk यांचा Neuralink हा महत्त्वाचा प्रकल्प एका दृष्टीने मानवी जीवनास वरदान ठरणार आहे तर एका दृष्टीने तो मानवाचे यांत्रिकीकरण करणारा ही वाटत आहे. Neuralink चे मानवी जीवनावरील परिणाम येत्या दशकभरात ठळक होतीलच. तोपर्यंत मानवी भावनांच्या रम्य अनुभूती जगून घेवूयात.
0 टिप्पण्या