Elon Musk चा महत्वपूर्ण Autopilot Tesla car प्रकल्प : यातायात इतिहासाच्या वाटेवरचा मैलाचा दगड
A milestone innovation by Elon Musk's Tesla Electric car company
पूर्वी एखादा वाहन चालक रस्त्याने बेदरकारपणे गाडी चालवताना दिसला तर त्याला चिडून व कुत्सित पणे "ए पालट!!" असं म्हणून दरडावीत. पूढे विमानांमधे Pilots ना सहाय्य करणारे Auto pilot तंत्र कार्यान्वित झाले. पायलटचं बरंचसं काम हे Auto Pilot तंत्र करू लागले. जगप्रसिद्ध उद्योजक Elon Musk यांनी विमानातील हे Auto Pilot चे तंत्र त्यांच्या Electric Car मधे कसे वापरता येईल यावर संशोधन सुरू केले.
Written by Avinash Bhanu Asha Ghodke
File pic :टेस्ला ची S Model Electric Car अवतरण सोहळ्यात दिमाखात उभी Pic courtesy Google |
टेस्ला च्या मैलाचा दगड असलेल्या स्वयंचलित ग्रीन कार प्रकल्पाचा प्रवास
अंतरराष्ट्रीय इलेक्र्ट्रीक कार कंपनी टेस्ला चा Autopilot प्रकल्प Elon Musk यांच्या महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनाने सुरू झाला. या Autopilot project ची प्राथमिक तयारी 2013 मध्ये सुरू झाली आणि टेस्ला ने Advance Driver Assistance System (ADAS) साठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर विकसित करण्यास सुरुवात केली.
स्वयंचलित गाडीची पहिली आवृत्ती केवळ आठ महिन्यांत. भारतीय वंशीय इंजीनियर अशोक एल्लूस्वामी याचा खूप मोठा वाटा होता
जिथे इतर कंपन्यांना या संशोधनासाठी 10 वर्षे कालावधी लागला तिथे टेस्ला ने अतिशय कमी संसाधनांत केवळ आठ महिन्यांत या प्रकल्पाला प्राथमिक चालना दिली. या कामात भारतीय वंशीय इंजीनियर अशोक एल्लूस्वामी याचा खूप मोठा वाटा आहे असे Elon Musk यांनी आपल्या X या social media Account वर नुकतेच म्हटले आहे व आशोक एल्लूस्वामी यांचे त्यांनी व्यक्तीश: आभार देखील मानले आहेत. ऑक्टोबर 2014 मध्ये टेस्ला ने आपल्या S या मॉडेल मध्ये Autopilot हार्डवेअरची (Hardware 1) पहिली आवृत्ती सादर केली, ज्यात खालील सुविधा समाविष्ट होत्या
टेस्लाच्या पहिल्या आवृत्तीतील सुविधा
चालकाच्या point of view ने पहाणारा समोरचा क्यामेरा (forward facing Camera),
रडार (Radar)आणि अल्ट्रासोनिक सेन्सर्स (Ultrasonic sensors)समाविष्ट होते,
तसेच गाडीला रस्त्याच्या लेनमधे ठेवणे आणि Adoptive cruise Control मध्ये सहाय्य करणारे सॉफ्टवेअर
या प्राथमिक सुविधा Tesla च्या सुरूवातीच्या S या माॅडेल मधे होत्या.
आजची प्रकल्पाची प्रगती
एक दशकाच्या सातत्यपूर्ण अनुसंधानानंतर आज टेस्ला ने आपल्या Autopilot प्रणालीमधे मोठी प्रगती केली आहे. टेस्ला च्या लेटेस्ट माॅडेल्स मधे Full Self-Driving (FSD अर्थात Driverless Car) चे काही प्राथमिक फीचर्स उपलब्ध आहेत. पूर्णपणे driverless car रस्त्यावर यायला अजून तसा वेळ आहे.
FSD (Full Self Driving)
एरवी ड्रायव्हरला वातानुकूलित गाडीत ही घाम फोडणारी अवघड व जिकीरिची अशी कामे टेस्ला चे Autopilot आणि FSD सहजपणाने हाताळू शकतात जसे की शहरातील भरपूर रहदारी असलेल्या किंवा रहदारी ची कोंडी झालेल्या रस्त्यावर Artificial Intelligence चा वापर करत Navigate करणे, लेन बदल करणे, ट्रॅफिक सिग्नल ओळखणे आणि त्याला प्रतिसाद देत वाहतूक नियमांचे पालन करणे, आणि विशेष म्हणजे गाडी स्वयंचलितरित्या पार्किंग (Auto Parking) करणे ही कामे या तंत्राने सहज साध्य होतात.
कोणत्या टेस्ला मॉडेल्स कार स्वयंचलित आहेत
टेस्लाच्या सध्याच्या सर्वच मॉडेल्सवर Auto Pilot सुविधा उपलब्ध आहे ज्यात खालील मॉडेल्सचा समावेश आहे:
- Model S: टेस्ला ची प्रमुख लक्झरी सेडान.
- Model 3: कॉम्पॅक्ट सेडान.
- Model X: मध्यम आकाराची ऑल-इलेक्ट्रिक SUV.
- Model Y: एक कॉम्पॅक्ट SUV जिला affordable श्रेणीतील Tesla असे म्हणू शकतो.
Tesla ची वरील मॉडेल्समधे Auto Pilot तसेच Full Self-Driving क्षमता अजून प्रभावी करण्यासाठी आवश्यक Hardwear उपलब्ध असते. FSD साठी ग्राहकांना काही अतिरिक्त शुल्काचा भुर्दंड सोसावा लागणार आहे असे कळते. आपले मोबाईल सॉफ्टवेअर जसे अपडेट होत रहाते तसे Tesla Car चे हे FSD प्रणाली चे software टेस्ला कडून वेळोवेळी update केले जाईल .
साध्या सोप्या भाषेत Autopilot काय आहे?
साध्या अतांत्रिक भाषेत सांगायचे तर, टेस्ला चे Auto pilot हे एक आधुनिक संगणकीय तंत्रज्ञान आहे जे चालकाला नियमित ड्रायव्हिंग कार्यांमध्ये मदत करते. हे तुमच्या कारसाठी एक 'ड्रायव्हर सहायक' म्हणून काम करते. हे तंत्र कॅमेरा, सेन्सर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा एकत्रित वापर करून कारच्या आजूबाजूचा परिसर समजून घेतं आणि चालकास गाडी चालवताना ला सहाय्य करते. अचानक उद्भवलेल्या जिकीरीच्या प्रसंगात Auto Pilot स्वयंचलितपणे स्टीयरिंग, अॅक्सेलरेट आणि ब्रेक योग्य रित्या वापरण्यास मदत करू शकते.
स्वयंचलित गाडीत टेस्लाने दिलेले फीचर्स
टेस्ला च्या Autopilot मध्ये सुरक्षा आणि सोय या दोन्हींच्या अनुषंगाने फीचर्स दिले गेले आहेत. त्यापैकी काही फीचर्स खालीलप्रमाणे आहेत:
- Traffic-Aware Cruise Control: वाहतुकीच्या प्रवाहाच्या अनुषंगाने कारचा वेग कमी जास्त करणे.
- Autosteer: गाडीला आपल्या लेनमध्ये ठेवण्यासाठी स्टीयरिंग वर ताबा ठेवणे.
- Navigate on Autopilot: हायवे वर ऑन-रॅम्प ते ऑफ-रॅम्प असे नेव्हिगेट करणे तसेच लेन बदलणे आणि मार्गदर्शन देणे.
- Auto Lane Change: समोरील धीम्या गतीने चालणार्या कार्सला ओव्हरटेक करण्यासाठी किंवा नेव्हिगेशन रूट्स फॉलो करण्यासाठी स्वयंचलितपणे लेन बदलणे.
- Summon: मोबाइल अॅप किंवा Key FOB( Frequency Operated Button)वापरून कारला योग्य जागेमध्ये हलवणे.
- Autopark: फक्त एका टचवर गाडीला समांतर (parallel ) आणि काटकोनात (perpendicular) पार्किंग करणे.
FSD Features
Tesla चे Full Self-Driving (FSD) हे तंत्र अधिक प्रगत असे फीचर्स कारला जोडते जसे की ट्रॅफिक सिग्नल ओळखणे आणि प्रतिसाद देणे, स्टॉप साईनवर थांबणे आणि शहरातील high Traffic असलेल्या रस्त्यांवर स्वयंचलितरित्या गाडी चालवणे.
भारतात टेस्ला स्वयंचलित कारची किंमत किती असेल?
सध्या, टेस्ला ने अजून भारतात आपली वाहने लॉन्च केलेली नाहीत. तथापि, त्यांनी भारतीय बाजारात प्रवेश करण्याची मनीषा व्यक्त केली आहे. भारतात टेस्ला कार्सची किंमत US च्या तुलनेत आयात शुल्क आणि करांमुळे जास्त असण्याची शक्यता आहे. अंदाजे असे सांगता येईल की टेस्लाचे मॉडेल 3, जे सर्वात परवडणारे टेस्लाचे मॉडेल आहे, ते सुमारे ₹60-70 लाखांपासून सुरू होऊ शकते, तर अधिक प्रीमियम मॉडेल्स जसे की मॉडेल S आणि मॉडेल X ची किंमत ₹1 कोटीपेक्षा जास्त असू शकते.
भारतीय बाजारात Tesla स्वयंचलित कार कधीपर्यंत येवू शकते?
भारतात संभाव्य खरेदीदारांमध्ये Tesla Autopilot बद्दल मोठी उत्सुकता आहे. सध्या कंपनी भारतातील आपले ऑपरेशन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप करण्यासाठी काम करत आहे. 2021 च्या सुरुवातीला, टेस्ला ने बेंगळुरू ( Banglore, Karnataka)मध्ये आपली सबसिडियरी, टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी प्रा. लि. कंपनी नोंदणीकृत केली, यावरून नजीकच्या काळातच Tesla Autopilot Car च्या भारतातील अधिकृत लॉन्चची घोषणा अपेक्षित आहे.
टेस्ला पूर्णपणे स्वयंचलित कार बनवण्याचा विचार करत आहे का?
टेस्ला पूर्णपणे स्वयंचलित कार बनवण्याचा विचार करत आहे. टेस्ला च्या Full Self-Driving (FSD) सिस्टीमचे अंतिम उद्दिष्ट Level 5 autonomy साध्य करणे आहे, ज्याचा अर्थ टेस्ला कार कुठल्याही परिस्थितीत मानवीय हस्तक्षेपा शिवाय सर्व ड्रायव्हिंग कार्ये स्वयंचलित पणे हाताळू शकेल अशी प्रणाली विकसित करणे. सध्याच्या FSD प्रणालीला ड्रायव्हरच्या देखरेखीची आवश्यकता आहे, परंतु FSD पूर्णपणे स्वयंचलित होण्यासाठी सतत सॉफ्टवेअर अपडेट्स टेस्ला कडून दिले जाणार आहेत. Elon Musk आपल्या Tesla Autopilot चे हे अंतीम टप्पे गाठण्याबद्दल आशावादी आहेत.
"ए autopilot!!"
टेस्ला च्या Auto Pilot प्रकल्पाने अगदी प्रारंभापासूनच प्रगतीचा वेग कायम ठेवला आहे. या प्रकल्पात भारतीय वंशीय इंजीनियर अशोक एल्लूस्वामी याचा खूप मोठा वाटा आहे असे Elon Musk यांनी आपल्या X या social media Account वर नुकतेच म्हटले आहे व आशोक एल्लूस्वामी यांचे त्यांनी व्यक्तीश: आभार देखील मानले आहेत. या बाबी पहाता Autopilot टेस्ला कार्स भारतातील रस्त्यांवर लवकरच दिसतील अशी अपेक्षा आपण करू शकतो. भविष्यात भारतीय रस्त्यावर शिस्तीत over take करणार्या एखाद्या Tesla Autopilot गाडीला चिडून एखादा ड्रायव्हर " ए Autopilot!" असे ओरडला तर टेस्ला कडून काही Auto reply दिला जाईल का ? असा गमतीशीर विचार ही मनात automatically येवून जातो.
0 टिप्पण्या