Green TARA the Lady Buddha: Feminist goddess from Tibetan Buddhism
अध्यात्मातील पहिला स्त्री वादी हुंकार
Written by Avinash Bhanu Asha Ghodke
:Avinash is a Film writer and Lyricist .His articles published in renowned magazines and newspapers.
In 7th century Princess of Nepal upholds Feminity and claims enlightenment
इ. स. 7 वे शतक .त्या काळात बुद्धीझम मधे स्त्री साध्वींना नगण्य मानले जाई. अशा वेळी नेपाळी राजकन्येने अथक ध्यान साधना व सेवा धर्माचे आचरण करून अध्यात्म जगात ख्याती प्राप्त केली. एक जेष्ठ बौद्ध भिक्कू एकदा राजकन्येस भेटावयास आले व तिला आशिर्वाद देवून म्हणाले " हे मला फारच दुःखदायक वाटते की तुझ्यासारख्या उज्वलीत अशा आत्म्याने स्त्री रूपात जन्म घेतला आहे. आता तुला बोधिसत्व मिळवण्यासाठी पुन्हा एकदा पुरूष म्हणून जन्म घ्यावा लागेल व त्यासाठी मी तुला आशिर्वाद देतो !"
यावर तेजस्वी राजकन्या शांतपणे उत्तरली .." या विश्वात स्त्रीत्व, पौरुषत्व, स्वत्व वा व्यक्तित्व असे काहीच नाही.. स्त्री -पुरूष असा भेद कुणी मानत असेल तर तो मूर्खपणाच असेल!" राजकन्या पुढे म्हणाली...
"पुरुष जन्म घेवून अध्यात्मिक उन्नती प्राप्त करू इच्छिणारे या जगात अनेक असतील पण स्त्री जन्म घेवून मानव सेवेसाठी जगणारे विरळाच. आणि म्हणूनच मी शपथ घेते की या विश्वाच्या शेवटापर्यंत मी स्त्री जन्मच घेत राहीन व आपल्या सारख्या संत महात्म्यांची व जन सामान्यांची सेवा करीन! "
The Nepali Princess Wed's Tibetan Prince and attains Buddhahood in Tibet
हीच नेपाळी राजकन्या पुढे तिबेटन राजाची राणी झाली. देवी "तारा" म्हणून तिला लौकिक प्राप्त झाला. बुद्ध धर्माच्या तिबेटी तंत्र शाखेतील ती एक महत्त्वाची देवता आहे. हिंदू धर्मातील तंत्रशाखेतही तिला अग्रणी स्थान आहे. भक्तांना तारणारी म्हणून ही 'तारा'. तारा ला 'स्त्री बुद्ध' किंवा Lady Buddha म्हणून ही ओळखतात.
The Green Tara Mantra
Tara as Feminist Icon
अध्यात्म जगतात वाद-प्रतीवाद असंख्य आहेत .धर्म आणि संस्कृती च्या दृष्टीने दावे प्रतीदावे ही अंतहीन आहेत पण "जगाच्या अंतापर्यंत मी स्त्री म्हणूनच जन्माला येणार!" असे ठणकावून सांगणार्या तारा देवीचा यलगार आज च्या feminist विचारांना बळ देणारा नक्कीच आहे
-अविनाश भानुआशा घोडके
0 टिप्पण्या