" It's amazing what happens when you stop eating an entire Pizza by yourself at 2 am!" -Janet Montgomery on her weight loss
Written by Avinash Bhanu Asha Ghodke
Janet Montgomery चा weight loss look on the beach |
Pls check the Translation button on right Side Bar or below in Mobile view
Janet Montgomery ब्रिटिश वंशीय अभिनेत्री आणि "New Amsterdam" या टीव्ही शोमधील लोकप्रिय Doctor Lauren Bloom च्या भूमिकेसाठी ओळखली जाते. Janet च्या weight loss ची चर्चा Hollywood करत आहे.
Janet Montgomery ची वजन कमी करण्याच्या प्रवासाची सुरुवात
जेनेट मोंटगोमेरीला तिच्या व्यावसायिक जीवनात व्यस्त राहूनही तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करायचे होते. एक अभिनेत्री म्हणून तिला एक विशिष्ट शारीरिक आकर्षण राखणे गरजेचे होते, परंतु तिच्या फिटनेसचा तिच्या आरोग्यावर व एकूणच तिच्या career वर होणारा प्रभाव हे तिच्यासाठी अधिक महत्त्वाचे होते.
आहार आणि पोषण
1. संतुलित आहार: Jenet संतुलित आहारावर विश्वास ठेवते, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, फायबर, आणि चांगल्या प्रकारचे फॅट्स असतात. ती प्रक्रिया केलेले अन्न (processed food)आणि साखर टाळते.
2. हायड्रेशन: ती दिवसभरा पुरेसे पाणी पीते . शरीराला पाण्याचे महत्त्व काय आहे हे तिने समजून घेतले आहे. हायड्रेशनमुळे मेटाबोलिझम सुधारते आणि त्वचा तजेलदार राहते असे आहार शास्त्र सांगते.
3. घरगुती आहार: शक्यतो घरात बनवलेल्या ताज्या आणि सेंद्रिय पदार्थांचा समावेश आपल्या आहारात जेनेट करते.
वर्कआउट आणि फिटनेस रूटीन
1. योग आणि पिलाटेस: Yoga आणि pilates च्या माध्यमातून ती शरीराची लवचिकता आणि बळ वाढवण्याकडे लक्ष देत असते. ह्या व्यायामप्रकारांमुळे मानसिक तणाव निश्चितपणे कमी होतो आणि मनाला शांती मिळते.
2. कार्डिओ वर्कआउट: नियमित धावणे, पोहणे किंवा सायकल चालवणे यासारख्या Cardio एक्सरसाइजेस Janet Montgomery घ्या दिनचर्येचा भाग आहेत. यामुळे कॅलरी बर्न होते आणि हृदयाच्या आरोग्यात सुधारणा होते.
3. वेट ट्रेनिंग: Janet काही प्रमाणात वेट ट्रेनिंगलाही महत्त्व देते. Weight Training मुळे तिच्या स्नायूंना बळ मिळते आणि बॉडी टोन होते.
मानसिक आणि भावनिक आरोग्य
वरील सर्व व्यायामांबरोबरच वजन कमी करताना मानसिक आरोग्याचाही विचार करणं गरजेचं आहे. Janet Montgomery ने ध्यानधारणा आणि श्वसन व्यायामांद्वारे तिच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देते. तिच्या मते, वजन कमी करण्याच्या प्रवासात तणावमुक्त राहणे आणि स्वतःच्या शरीरावर प्रेम करणे महत्त्वाचे आहे.
प्रेरणा आणि शिस्त
जेनेट मोंटगोमेरीला तिच्या फिटनेस प्रवासात तिच्या कुटुंबीयांचे आणि मित्रांचे पाठबळ आहे. ती म्हणते की वजन कमी करणे हा एक दीर्घकालीन प्रवास आहे ज्या प्रवासात आपल्या मित्र व कुटुंबियांच्या साथी शिवाय आपण गन्तव्य गाठू शकत नाही.
अशाप्रकारे, Janet Montgomery च्या वजन कमी करण्याच्या प्रवासातून आपल्याला संतुलित आहार, नियमित व्यायाम, आणि मानसिक आरोग्याचं महत्त्व शिकता येतं. Janet Montgomery चा प्रवास हा खरंच प्रेरणादायक आहे, जो फिटनेस आणि आरोग्याच्या बाबतीत सजग राहण्याची जाणीव करून देतो.
Janet Montgomery चे Career highlights
जेनेट मोंटगोमेरी एक बहुआयामी अभिनेत्री आहे, जिला विविध प्रकारच्या भूमिकांमध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनय क्षमतेसाठी ओळखले जाते. तिच्या करिअरचा आढावा घेतला तर, तिच्या अभिनय प्रवासात अनेक आव्हाने व उतार चढाव आहेत.
सुरुवातीचे जीवन आणि करिअर
जेनेट मोंटगोमेरीचा जन्म 29 ऑक्टोबर 1985 रोजी इंग्लंडमध्ये झाला. ती लहानपणापासूनच अभिनयात रुची घेऊन वाढली. जेनेट ने शाळेत असतानाच लघुनाटिकांमधून कामे करायला सुरुवात केली. मनात अभिनयाची आवड इथेच निर्माण झाली. हळूहळू ती अभिनय कलेचे बारकावे शिकत गेली. वयाच्या 16 व्या वर्षी तिने Balle नृत्य शिकण्यासाठी शाळा सोडली. या काळात ती नाट्य अभिनय ही करत होती. तसेच तिने एक छोटी नाटीका ही निर्माण केली. 2004 साली तिने थेट अमेरिकेतील Los Angeles शहर गाठले जिथे तिची स्वप्न नगर Hollywood होते. पुढील 4 वर्षांतच तिला तिचा 1st break Skins या मालिकेत मिळाला.
उल्लेखनीय भूमिका आणि प्रोजेक्ट्स
1. "Skins" (2008): जेनेटने तिच्या करिअरची सुरुवात ब्रिटिश Teen Drama "स्किन्स" मधील भूमिका साकारून केली. या शो मधील तिच्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा झाली.
2. "Black Swan" (2010): हॉलीवूडमधील तिच्या पहिल्या महत्त्वपूर्ण भूमिकांपैकी एक होती. डॅरेन अरोनोफ्स्कीच्या या चित्रपटात नतालि पोर्टमॅनसह काम करताना तिने स्वतःचा ठसा उमटवला.
3. "Made in Jercy" (2012)**: या CBS ड्रामा मालिकेत जेनेटने मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले पण Janet Montgomery चा हा शो जास्त काळ चालला नाही.
4. "Salem" (2014-2017): ही Super Natural Horror टेलीव्हिजन सिरीज होती. "सालेम" मध्ये मरी व्हेबस्टरच्या भूमिकेत तिने आपल्या अभिनयाने जादू केली.
As Dr Loren In 'New Amsterdam' serial Courtesy: Google |
5. New Amsterdam (2018-2023) NBC च्या Medical Drama मधे Dr लॉरेन ब्लूम च्या भूमिकेत ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. या संयत पणे साकारलेल्या भूमिकेसाठी तिला खूप प्रशंसा मिळाली आणि तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली.
अभिनय कारकिर्दीचा आलेख वर जात असताना या टप्प्यावर Janet Montgomery ने आपल्या व्यक्तीमत्त्वात आमूलाग्र असा बदल करत, Diet व exercises चा आधार घेत Chiseled look मधे प्रेक्षकांना दर्शन दिले व तिच्या या new look ची चर्चा होवू लागली.
करिअरची वैविध्यता आणि आव्हाने
Janet Montgomery ने तिच्या करिअरमध्ये विविध भूमिका साकारताना तिची अभिनय क्षमता सिद्ध केली आहे. तिला ड्रामा, थ्रिलर, आणि हॉरर अशा विविध शैलींमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. तिच्या अभिनयाने तिला प्रेक्षकांमध्ये एक खास स्थान मिळवून दिले आहे.
वैयक्तिक जीवन
जेनेटने तिच्या वैयक्तिक जीवनातही संतुलन साधले आहे. Janet Montgomery ला तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडते आणि तिच्या कामातून तिला जो आनंद मिळतो त्याबद्दल ती खूप समाधानी आहे.
लक्षात घेण्यासारखे
Janet Montgomery चा अभिनय प्रवास व कारकीर्दीचा आलेख प्रेरणादायी आहे. तिच्या करिअरमधील विविध भूमिकांनी तिला एक बहुचर्चित अभिनेत्री बनवले आहे. तिची मेहनत आणि अभिनयाची आवड ह्या गुणांमुळेच ती आज यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. Janet Montgomery च्या येणाऱ्या प्रोजेक्ट्सबद्दल प्रेक्षक ही उत्सुक आहेत आणि तिच्या आगामी भूमिकांचा आनंद घेण्यासाठी ते आतुर आहेत. Janet च्या घटलेल्या वजना सोबत तितक्याच पटीने तिचे सिनेमा विश्वातील व्यावसायिक वजन वाढत जाणार आहे एवढे नक्की.
Janet च्या "मध्यरात्री २ ला उठून अख्खा Pisa एकट्यानेच खाणं बंद केल्यावर जे काही घडत ते Amazing आहे!!" या वक्तव्यातून अवेळी खाणे व junk food न खाणे या दोन गोष्टी तर प्रामुख्याने टाळायला हव्यात हेच Janet Montgomery अधोरेखित करते.
Janet Montgomery प्रमाणेच George Conway, Ariana Grande, Kevin James या Hollywood अभिनेत्यांनीही आपले weight loss चे लक्ष गाठले आहे.
Also read:
6 types of Intermittently Fasting
Bollywood actor Manoj Bajpayee observing Intermittent fasting for last 14 years
0 टिप्पण्या