Ratan Tata यांची इंडिका गाडी आणि विदेशी फोर्ड : Tata Ethics चा विजय
Modest Indica car and luxurious Jaguar standing under TATA banner - pic generated |
रतन टाटा आणि टाटा इंडिका यांची कथा भारताच्या उद्योगविश्वातील एक प्रेरणादायी आणि अभिमानास्पद पान आहे. हा प्रवास त्यांच्या दृढनिश्चय, दूरदृष्टी आणि मातीतून उभ्या केलेल्या टाटांच्या स्वप्नांचा साक्षीदार आहे. टाटा इंडिकाच्या निर्मितीपासून ते फोर्ड कंपनीच्या अधिग्रहणापर्यंतचा प्रवास भारतीय उद्योजकतेसाठी एक महत्वाचा धडा आहे.
रतन टाटांनी बनवलेली पहिली संपूर्णपणे भारतीय बनावटीची Indica या गाडीचा प्रकल्प सुरूवातीला तोट्यात गेला होता पण Ratan Tata यांनी हार मानली नाही.
रतन टाटांचे इंडिकाचे स्वप्न -Ratan Tata
1990 च्या दशकात भारतीय वाहन उद्योगात परदेशी कंपन्यांचे वर्चस्व होते. परंतु, रतन टाटांचे एक स्वप्न होते – भारतातच एक पूर्णपणे भारतीय कार तयार करणे. 1998 मध्ये हे स्वप्न साकार झाले जेव्हा टाटा मोटर्सने जगासमोर 'टाटा इंडिका' सादर केली. टाटा इंडिका ही पहिली भारतीय बनावटीची कार होती. Tata Indica घ्या रूपात भारतीय मध्यमवर्गीयांसाठी किफायतशीर किंमतीत चार चाकी वाहन उपलब्ध झाले होते.
सुरूवातीला इंडिकाला मिळालेला अल्प प्रतिसाद
इंडिका कारच्या निर्मितीने खूप अपेक्षा निर्माण केल्या होत्या. परंतु, प्रारंभीच्या टप्प्यात तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. विक्रीच्या संख्येत घट दिसू लागली आणि बाजारात तिच्या गुणवत्तेवर टीका केली गेली. या कालावधीत टाटा मोटर्सला आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावे लागले. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी रतन टाटांनी विदेशी Ford मोटर कंपनी सोबत भागीदारीची चर्चा सुरू केली.
फोर्डची नकारघंटा
Ratan Tata आणि त्यांच्या टीमने 1999 मध्ये फोर्ड मोटर कंपनीशी कराराची चर्चा करण्यासाठी अमेरिका गाठली. त्यावेळी फोर्डचा व्यवसाय व विक्री जोरात होती, तर टाटा मोटर्स आर्थिक संकटात होती. फोर्डने या भागीदारीची ऑफर ऐकून ती जोखमीची असल्याचे सांगून नकार दिला. यावेळी, फोर्डच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने रतन टाटांना सुनावले, "तुम्हाला कार उद्योगाची काहीच समज नाही, तुम्ही तुमचा व्यवसाय विकून त्यातून बाहेर पडायला हवे" या शब्दांनी रतन टाटांना अत्यंत अपमानित वाटले. ते शांतपणे परतले, पण त्यांच्या मनात आता जिद्द जागृत झाली होती. रतन टाटांनी Indica project वर लक्ष केंद्रीत करायचे ठरवले.
इंडिकाचा उदय
फोर्डच्या अपमानास्पद नकारानंतर Ratan Tata रतन टाटांनी त्यांच्या कार उद्योगावर पुन्हा लक्ष केंद्रित केले. त्यांनी त्यांच्या उत्पादन प्रक्रियेत सुधारणा केली, आणि भारतीय बाजाराची गरज ओळखून इंडिकाला अधिक किफायतशीर व आकर्षक बनवले. लवकरच, भारतीय ग्राहकांचा प्रतिसाद मिळायला लागला. इंडिकाची मागणी झपाट्याने वाढली, आणि 2001 पर्यंत ती भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली. टाटा मोटर्सचा व्यवसाय वाढला, आणि कंपनीला स्थैर्य प्राप्त झाले.
फोर्ड वर व्यावसायिक संकटाची वेळ
दरम्यान, फोर्ड कंपनीला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यांच्या लक्झरी कार ब्रँड्स चा व्यवसाय, ज्यात जग्वार आणि लँड रोव्हर यांचा समावेश होता, तोट्यात जात होता. 2008 पर्यंत फोर्डच्या या दोन्ही ब्रँड्सना विक्रीचा विचार करावा लागला. अशा वेळी, रतन टाटांनी संधी साधली आणि या ब्रँड्सना खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला. ज्या फोर्ड ने रतन टाटांना Indica साठी भागीदारी करण्यास नकार दिला होता त्याच फोर्ड घ्या high end luxury cars जग्वार व लँड रोव्हर चा प्रकल्प आता Ratan Tata यांनी विकत घेतला होता. हा नियतीचा काव्यगत न्याय होता.
फोर्डचे टाटांकडून अधिग्रहण Aquasition 2008
टाटा मोटर्सने 2008 मध्ये जग्वार आणि लँड रोव्हर (JLR) ब्रँड्सचे अधिग्रहण केले. रतन टाटांनी हे करार 2.3 बिलियन डॉलर्सला पूर्ण केले. अधिग्रहणाच्या वेळी फोर्डचे चेअरमन, बिल फोर्ड, म्हणाले, "तुम्ही आमची कंपनी वाचवली." एकेकाळी जे टाटा मोटर्सला उद्योगातील नवशिक्या मानत होते, त्यांनीच फोर्डच्या ब्रँड्सनाआज वाचवले होते.
नफ्यात आणलेली JLR
Ratan Tata यांनी जग्वार आणि लँड रोव्हरला केवळ विकत घेतले नाही, तर त्यांना परत नफ्यात आणले. त्यांनी या ब्रँड्समध्ये तंत्रज्ञान, संशोधन आणि विकासावर जोर दिला. टाटा मोटर्सच्या अंतर्गत JLR ची विक्री दरवर्षी वाढू लागली आणि 2013 पर्यंत या ब्रँड्सने मोठा नफा कमवायला सुरुवात केली.
Tata Ethics नीतिमत्तेचा विजय
निष्कर्ष
रतन टाटांनी अपमान, आव्हाने, आणि अडचणींवर मात करून एक अभूतपूर्व यश मिळवले. भारतीय उद्योजकतेच्या इतिहासात त्यांच्या या जिद्दी ची गोष्ट एक प्रेरणा देत राहील. टाटा इंडिकापासून सुरू झालेला रतन टाटांच्या Tata Motors चार प्रवास, फोर्डच्या जग्वार आणि लँड रोव्हरच्या अधिग्रहणापर्यंत पोहोचला. धैर्य, जिद्द, आणि योग्य निर्णयांमुळे यश साध्य होते हे रतन टाटांनी दाखवून दिले आहे. रतन टाटांचा जीवन आलेख नैतिकतेचा परीपाठ देतो.
Ratan Tata |
हे ही वाचा
JRD Tata यांचा जिद्दी चा वारसा: JRD यांनी अपमानीत होवून जिद्दीने बांधले होते Hotel Taj
0 टिप्पण्या