Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

Ratan Tata भारतीय उद्योग जगतातील शालीनता


श्वान प्रेमी आणि मानवता वादी उद्योजक RATAN TATA परतीच्या वाटेवर 

Man in suit walking dawn the fields as he is accompanied by dogs
श्वान प्रेमी Ratan Tata यांना परतीच्या वाटेवर श्वान साथ देत आहेत असे imaginary चित्र. Created with Meta AI


उद्योगपती रतन टाटांचे जाणे म्हणजे उद्यम जगत आणि संस्कृती यांना जोडणारा धागा तुटण्या सारखे आहे. देशाशी इमान हे त्यांचे एकमेव तत्व होते.


रतन टाटांचे नाव कधीच Top billionaire list मधे आले नाही. एकदा ते म्हणाले होते " मी उद्योजक आहे व्यापारी नाही !"( I am an Industrialist not a businessman!) उद्योग हा राष्ट्र उभारणीसाठी असतो व‌ व्यापार हा वैयक्तिक नफ्यासाठी असतो हा फरक त्यांनी एका वाक्यात अधोरेखित केला होता.


रतन टाटांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला.त्यांचे पालनपोषण त्यांची आजी, लेडी नवाजबाई टाटा यांनी केले, कारण त्यांचे आईवडील बालपणातच विभक्त झाले होते. 

शिक्षण

  • त्यांनी मुंबईतील प्रतिष्ठित कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलमध्ये  शालेय शिक्षण घेतले.
  • पुढे श्री टाटा यांनी कॉर्नेल विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले, जिथे त्यांनी 1962 मध्ये आर्किटेक्चरमध्ये विज्ञान शाखेतील बॅचलर पदवी मिळवली.
  • स्थापत्य शास्त्राची (Architecture) पदवी घेतल्यानंतर त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये Advanced मॅनेजमेंट प्रोग्रॅममध्ये शिक्षण घेतले.
  • रतन टाटांकडे व्यावसायिक विमान चालक परवाना ही होता.

Dogs on blue Jaguar car
Dogs resting on Jaguar car. Pic created with Meta Ai


श्वान प्रेमी Dog lover Ratan Tata

Pet Dog
रतन टाटांच्या प्रिय कुत्रा 'गोवा' .गोवा टाटांच्या अंतीम दर्शनासाठी आला होता


पाळीव कुत्र्यासाठी लंडनचे शाही आमंत्रण नाकारले 

रतन‌ टाटा त्यांच्या श्वान‌ प्रेमासाठी (Dog lover Ratan Tata) प्रसिद्ध होते. अब्जाधीश असले तरी ते आलिशान बंगल्यात न रहाता दक्षिण मुंबई तील आपल्या अपार्टमेंट मधे आपल्या Pet Dogs सोबत रहात. एकदा लंडनच्या शाही समारंभाचे त्यांना‌ आमंत्रण होते‌ पण आपला पाळीव कुत्रा आजारी आहे हे लक्षात आल्यावर रतन टाटांनी या समारंभास जाणे नाकारले. शाही यजमानांना टाटांचे न‌ येण्याचे हे कारण समजल्यावर त्यांनी 'टाटांनी योग्य तेच केले' अशी प्रतिक्रिया दिली होती. 



Teen age boy and senior Industrialist posing as friends
रतन टाटा आणि छोटा मित्र शांतनू नायडू pic courtesy Google 


शांतनू नायडू - Ratan Tata  यांचा पुण्याचा छोटा मित्र 

रतन टाटांच्या तरुण मित्राचे नाव शांन्तनू नायडू आहे. शांन्तनू पुण्याचा रहिवासी असून तो टाटा ग्रुपमध्येही काम करतो. रोजच्या ऑफिसच्या वाटेवर  एका विशिष्ट पट्ट्यात सातत्याने कुत्रे अपघात ग्रस्त होवून मरण पावत आहेत असे शांतनू च्या लक्षात आले.यावर त्याने एक अभिनव उपाय शोधला. रात्रीच्या वेळी वाहन चालकांना रस्त्यावरील कुत्रे सहज दिसावेत यासाठी या भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात रेडियम चे प्रकाशमान पट्टे (reflective collars) बांधण्याची योजना शांतनूने आखली, ज्यामुळे ड्रायव्हर्सना ते लांबून दिसू शकतील आणि त्यांचा अपघात होण्याचे प्रमाण कमी झाले. पण या योजनेचा खर्च त्याला वैयक्तिक रित्या उचलने शक्य नव्हते व अखेर त्याने रतन टाटांना पत्र पाठवून याबाबत विचारणा केली. 


रतन टाटांनी या कामाला अतिशय महत्त्व दिले आणि शांन्तनूच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला. टाटा यांनी शांन्तनूला आर्थिक मदत आणि मार्गदर्शन केले, ज्यामुळे या प्रकल्पाचा विस्तार होऊ शकला आणि आणखी अनेक कुत्र्यांचे जीव वाचले.
या प्रकल्पामुळे शांतनू व रतन टाटांची मैत्री झाली ती कायमची.



Logo of Tata company . Courtesy Google 



संयमाने केलेली यशस्वी औद्योगिक वाटचाल 

  • 1960 च्या दशकाच्या सुरुवातीस ते भारतात परतले आणि त्यांनी कुटुंबाच्या व्यवसायात काम करण्यास सुरुवात केली. जामशेदपूरच्या शॉप फ्लोरवर काम करून त्यांनी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला.

  • 1971 मध्ये त्यांना नेशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनी (NELCO) या काहीशी संघर्षरत असलेल्या उपकंपनीचे संचालक-प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले.

  • 1991 मध्ये, श्री टाटा यांनी त्यांचे काका जे आर डी टाटा यांच्यानंतर टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले. रतन टाटांच्या या नियुक्ती कडे काहींनी साशंक नजरेने पाहिले.हा मुलगा काय करणार ? असा प्रश्न समूहाच्या धुरीणींच्या मनात होता. पण रतन टाटांनी संयमाने व सचोटीने काम करत आपली क्षमता सिद्ध केली. तसे 'सिद्ध केली' असे म्हणता येणार नाही कारण तो रतन टाटांचा स्वभाव नसावा. आपले काम फक्त मनापासून करत रहाणे या वृत्तीचे रतन टाटा होते  किंवा असावेत असे एकूणच त्यांचा जीवन आलेख पाहून वाटते. 

  • लायसंस राज संपून 1991 साली भारताने अंगीकारलेले खुल्या अर्थव्यवस्थेचे धोरण रतन टाटांच्या पथ्यावर पडले. या मुक्त वातावरणात रतन टाटांनी हळू हळू टाटा समूहाचे पंख पसरले व अंतरराष्ट्रीय क्षितिजे काबीज केली



महत्वपूर्ण व्यावसायिक खरेदी| अधिग्रहण - Aquasitions:

Tetley Tea

2000- ब्रिटनमधील प्रसिद्ध चहाची कंपनी टेटली टी चे $431.3 मिलियनमध्ये अधिग्रहण, टाटा समूहाचे हे पहिले प्रमुख आंतरराष्ट्रीय अधिग्रहण.

Daewoo Motors 

2004- दक्षिण कोरियातील डेवू मोटर्सच्या ट्रक निर्मिती व्यवसायाचे $102 मिलियनमध्ये अधिग्रहण.


Corus group steel company 

2007- सर्वोच्च खरेदी - अँग्लो-डच स्टील कंपनी कोरस ग्रुपचे $11.3 बिलियनमध्ये अधिग्रहण. ही खरेदी जगातील पाचव्या क्रमांकाचा स्टील उत्पादक म्हणून टाटा समूहाला स्थान मिळवून देणारी होती.

 *याच वर्षी (2007)- वयाच्या 69 व्या वर्षी रतन टाटांनी  F16 आणि F18 फायटर जेट उडवून आपले flying कौशल्य दाखवून दिले होते.

Jaguar  Land Rover British Cars

2008- फोर्ड मोटर कंपनीकडून जग्वार आणि लँड रोव्हर (JLR) या प्रतिष्ठित ब्रिटिश लक्झरी कार ब्रँड्सचे $2.3 बिलियनमध्ये अधिग्रहण.

NANO CAR सामान्यांसाठी कार

याच वर्षी टाटांनी आपली NANO ही Mini कार भारतीय मोटर बाजारात अवतरीत केली होती. फक्त 1 लाख रूपयांत सर्व सामान्यांना परवडेल अशी गाडी निर्माण करण्याचे रतन टाटांचे स्वप्न होते. 

In 2008 Aquasitions of Jaguar and Land Rover. Same year Tata launched ambitious affordable NANO car in India 


भरारी घेण्याची पायलट वृत्ती Ratan Tata 

एव्हिएशनमधील कौशल्यांसाठी प्रसिद्ध, श्री टाटा यांच्याकडे जेट आणि हेलिकॉप्टर दोन्ही उडवण्याचे परवाने होते. 2007 साली 69 व्या वर्षी रतन टाटांनी F16 व F18 ही फायटर प्लेन उडवून आपले Aviation कौशल्य दाखवून दिले होते.

बंगळुरूमध्ये आयोजित एरो इंडिया शोमध्ये US Defence contractor लॉकहीड मार्टिनने F-16 फायटर जेटवर सहपायलट म्हणून सारथ्य करण्याचे आमंत्रण रतन टाटांना दिले होते. यांच्या  दुसऱ्याच दिवशी रतन टाटांनी F18‌ हे मोठे व अवजड फायटर जेट कौशल्य पूर्ण रित्या उडवले होते.


साधी रहाणी 

घरात लुंगी 

रतन टाटांनी आपण घरात कुठल्याही ब्रांडचा नाईट सूट न घालता लुंगी नेसणे पसंद करतो असे सांगितले होते.

अविवाहित 

रतन‌ टाटा अविवाहित राहिले. त्यांची सिम्मी गरेवाल या अभिनेत्री सोबत काही काळ जवळीक होती असे बोलले जाते. 


निवृत्ती आणि नंतर

श्री टाटा 2012 मध्ये निवृत्त झाले, पण तरीही समूहाचे मार्गदर्शन करत राहिले आणि सामाजिक कार्यात सक्रिय राहिले.

Start-up साठी मदत

RNT कॅपिटल अ‍ॅडवायझर्स या त्यांच्या गुंतवणूक कंपनीच्या माध्यमातून Ratan Tata यांनी केली.

Ola Electric scooter 

Paytm 

Lenscart

 यांसारख्या 30 पेक्षा जास्त स्टार्ट-अपना समर्थन दिले.

टाटा ट्रस्ट - सामाजिक कार्य.

JRD Tata यांनी सुरू केलेल्या TATA TRUST द्वारे रतन टाटा आपले सामाजिक योगदान सातत्याने करत राहिले व यांचा गवगवा त्यांनी कधीच केला नाही.

Tata company चा जागतिक विस्तार

जगाच्या 6 खंडांमधील 100 हून अधिक देशांमध्ये  Tata समुहाच्र्या 30 कंपन्या आज कार्यरत आहेत.

उपसंहार 

"मैने देश का नमक खाया है ! " हे वाक्य खरंतर टाटा कंपनी ची निर्मिती असलेल्या टाटा मिठा च्या जाहीरातीचे बोध वाक्य आहे पण हेच वाक्य Ratan Tata यांच्या व्यक्तीमत्व व जीवनाचे संक्षिप्त रित्या मांडलेले सूत्रच वाटते. 

Bye bye या अर्थाने Tata हा शब्द कधी व कसा प्रचलित झाला हे माहित नाही पण रतन टाटांना अंतीम  Tata करताना प्रत्येक भारतीयाचे काळीज आज कालवले असणार 


Old Industrialist smiling closeup
Ratan Tata  pic courtesy Google 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या