Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

पुरूषांचे Y chromosome आकुंचित पावतेय. काही दशलक्ष वर्षांनी Y चा bye bye

 

XX हे स्त्री गुणसूत्र अनादीत्वाचे प्रतीक. पुरूषांचे Y गुणसूत्र होणार नामशेष-Chromosome

A woman watching a shrunk man sitting on a Y shape stand
Meta AI generated humourous image reflecting scientific fact of Male Y chromosome getting shrunk 



पुरुषांचे Y गुणसूत्र होतेय आकुंचित. काही दशलक्ष वर्षांनी Y chromosome चा bye bye!

पुरुषांचे Y गुणसूत्र – म्हणजे पौरुषत्वाचा एक 'जीवशास्त्रीय पुरावाच. Y chromosome म्हणजे पुरूष म्हणून जन्माला येण्याचे मुळाक्षर. पण आता असे दिसतेय की या Y chromosome' मूळाक्षराची' बेगडी पौरुषत्वात संकुचित रहाण्याची त्याची सवयच त्याच्या मुळावर उठलीय! संशोधकांना असं लक्षात आलंय की काळाच्या ओघात हे Y गुणसूत्र लहान होत चाललंय. म्हणजे “पौरुषत्व लहान होत चाललय?” स्त्री चे XX गुणसूत्र मात्र अनादी आहे.

Goddess holding female chromosome letters XX
स्त्री चे xx हे chromosome अनादी आहे असे सुचवणारे प्रतीकात्मक चित्र Generated by Meta AI

स्त्रीयांचे XX गुणसूत्र अनादी 

स्त्री चे XX हे गुणसूत्र तिच्या अनादी ,अढळतेचे प्रतीकच म्हणावे लागेल.  पुरुषांचे गुणसूत्र  XY असे आहे . पुरुषाला विशिष्ट शारीरिक पौरूष बहाल करणारे हे Y गुणसूत्र chromosome आहे पण असे संशोधन पुढे आले आहे की हे Y गुणसूत्र हळू हळू संकुचित होत आहे. म्हणजे पुढील काही दशलक्ष वर्षांनी‌ पुरुषांकडे असेल‌ फक्त एक‌ X chromosome. स्त्रीयांचे दोन‌ X CHROMOSOME मात्र अनादी‌ अनंत काळापर्यंत अबाधित राहणार आहेत. स्त्री गुणसूत्राच्या या अक्षयते मुळेच तिला शक्ती स्वरूप मानले गेले असावे. विज्ञानाने सूचित करण्या आधी अध्यात्माने खूप आधीच हे तथ्य शक्ती स्वरूपात स्वीकारले आहे. वैज्ञानिक संशोधन हे फार अलिकडचे आहे.

संशोधन टप्पे 

पुरुषांच्या Y गुणसूत्रांच्या (Y Chromosome) आकृतीकरणाच्या संदर्भात महत्त्वाचे संशोधन अमेरिकेत National Institutes of Health (NIH) च्या अंतर्गत Human Genome Project (HGP) च्या दरम्यान झाले होते. या संशोधनाचे निष्कर्ष २००३ साली जाहीर केले गेले, ज्यामध्ये संपूर्ण मानवी जीनोमची रचना स्पष्ट करण्यात आली होती व पुरूषांचे Y chromosome आकुंचित पावत असल्याचे सांगण्यात आले.


  • 2003-  NIH द्वारा Human Genome project अंतर्गत पुरुषांच्या Y chromosome संदर्भात मूलभूत निष्कर्ष 
  • 2023 साली , पुरुषांच्या Y गुणसूत्राच्या संपूर्ण आकृतीकरणाबाबत अंतीम टप्प्यातील महत्त्वाचे संशोधन करण्यात आले. हे संशोधन अमेरिका स्थित National Human Genome Research Institute (NHGRI) अंतर्गत वैज्ञानिकांच्या गटाने केले. यामध्ये त्यांनी Y गुणसूत्राच्या पूर्ण आकृतीकरणाची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली, जी यापूर्वी तांत्रिक कारणास्तव पूर्ण होवू शकली नव्हती. 



Y गुणसूत्र म्हणजे काय बुवा?

तुमच्या शरीरात दोन प्रकारची लैंगिक गुणसूत्रे असतात. X आणि Y.  तर बायकांकडे दोन X गुणसूत्रं असतात.  पण पुरुषांनी वेगळ असं पुरूषत्व दाखवण्यासाठी Y ही सोबत ठेवून दिलंय. याच Y गुणसूत्रावर SRY नावाचं जनुक असतं, जे “हं, आता झालास तू पुरुष!” असं सांगतं. हे जनुक लैंगिक विकास, शुक्राणू निर्मिती इत्यादी कार्यांना सांगतं, “कामाला लागा!” . हल्ली Sorry लिहीता ना SRY असं संक्षिप्त लिहिले जाते पण इथे SRY चा अर्थ 'भारी' असा आहे. 


Y गुणसूत्राचा bye bye

आता सगळ्यात गमतीशीर गोष्ट म्हणजे हे पुरुषत्वाचं प्रतीक असलेलं हे Y गुणसूत्र काळाच्या ओघात आकुंचित होत चाललंय. म्हणजे त्यातला डीएनए घसरतोय, फुटतोय. थोडक्यात पुरुषत्वाचा टेंभा मिरवून,थकून “बस्स, झालं रे यार!” असं म्हणत ते हळूहळू लहान होतंय. संशोधक म्हणतात, लाखो वर्षांपूर्वी याचं आकारमान X गुणसूत्रासारखंच होतं. पण हे बिचारं Y एवढं लहान झालंय की त्याला आज 'मायक्रो' गुणसूत्र म्हणावं का अशी शंका येते.


पुढे काय होणार? उंदरांकडून प्रेरणा?

तज्ज्ञ म्हणतात, “हे बघा, अजून काही दशलक्ष वर्षं तरी Y गुणसूत्र आपलं काम करत राहील, पण मग ते एक दिवस ‘गुडबाय’ म्हणेल!” तरी काळजीचं कारण नाही. काही प्राणी यापूर्वीच ‘Y’ गुणसूत्राशिवाय आनंदाने जगताहेत. उदाहरणार्थ, उंदीर!, त्यांच्याकडे Y गुणसूत्र नाही, तरीही ते मजेत प्रजनन करतात. त्यामुळे मानव प्रजातीला याची काळजी करण्याची अजिबात गरज नाही. मानव प्रजाती पृथ्वी तलावरून पूर्णपणे नामशेष होणार नाही एवढं नक्की कारण उंदरांनी पुरुषत्वासाठी Y chromosome ची गरज नाही असे आधीच सिद्ध केलंय . मिसेस उंदीर या मिस्टर उंदरांपेक्षा थोड्या immunity मधे strong असतात व त्यांचे आयुर्मान ही दीर्घ असते हे मात्र लक्षात ठेवा.

A Mice with large family talking to a curious man
पुरूष उंदीर करतात Y गुणसूत्रा शिवाय प्रजनन humourous picture created with Meta Ai


आकुंचनाची कारणं

पुरुषांचे Y क्रोमोसोम आकुंचित होण्याचे शास्त्रीय कारण मुख्यतः त्याच्या संरचनेशी संबंधित आहे. Y क्रोमोसोममध्ये इतर क्रोमोसोमच्या तुलनेत खूपच कमी जीन असतात, आणि यामध्ये सेल्फ-रिपेअर (स्वत:ची दुरुस्ती) क्षमता देखील कमी असते.


1. कमी जीन (genes) : Y chromosome आकाराने लहान आहे, आणि त्यात फक्त पुरुषांच्या लैंगिक गुणधर्मांसाठी आवश्यक असलेले काही जीन असतात. X क्रोमोसोमपेक्षा हा क्रोमोसोम खूपच कमी जीनने संपन्न आहे.


2. रिप्लिकेशन प्रक्रियेत बदल: इतर chromosome जसे की X, मियोटिक प्रक्रियेत पुनर्गठन (recombination) करतात, ज्यामुळे त्यांची जीन रिपेअर क्षमता चांगली असते. परंतु, Y क्रोमोसोम पुनर्गठन करत नाही, ज्यामुळे ते र्हास पावत आहेत.


3. म्युटेशनचा परिणाम: Y chromosome जीनमध्ये म्युटेशनची प्रक्रिया जलद असते, परंतु त्याची दुरुस्ती क्षमता कमी असल्यामुळे हळूहळू ते आकुंचन पावतात.  


अंतिम लढत xx Vs x 

तर मित्रांनो, Y गुणसूत्राचं भविष्य थोडं धूसर दिसत असलं तरी अजूनही मानवाच्या प्रजनन क्षमतेला तसा धोका नाही. विज्ञान आणि जनुक शास्त्राच्या साह्याने पुढे काय होईल हे पाहणं मनोरंजक ठरेल. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसतेय की xx विरुद्ध x या संभाव्य तुल्यबळ नसलेल्या लढतीत स्त्री शक्ती चे पारडे जड होणार आहे. समाजात स्त्री शक्ती ची प्रचीती तशी आताही येत आहेच आणि काही दशलक्ष वर्षांनी ती संपूर्ण प्रतिष्ठापित होईल.

Tall confident woman looking at dwarf man on table
Male Y chromosome is shrinking: Imaginary picture generated with Meta AI






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या