Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

चिमाजी अप्पा : वसई किल्ल्यावर क्रांतीचा घंटानाद आणि शांतीचा घंटारव

क्रांती चा घंटानाद  आणि   शांतीचा घंटारव
अर्थात चिमाजी अप्पांची शौर्य गाथा :
      
ज्या प्रेषिताने  पराकोटीची सहनशीलता आणि संयम दाखवत क्रुसावर आपल्या प्राणांची आहुती दिली त्याच प्रेषित ख्रिस्ताच्या धर्माचा प्रसार करण्यासाठी पोर्तुगीजांनी जुलूमशाही चा अवलंब करत अन्योन्वित छळाची परिसीमा गाठली . अखेर बाजीराव पेशव्यांचे कनिष्ठ  बंधू 'चिमाजी अप्पा'
यांनी पोर्तुगीजांच्या वसई किल्ल्यावर स्वारी केली. पोर्तुगीजांकडे आधुनिक बंदुका होत्या. चीमाजींकडे राष्ट्र अभिमानाने सळसळनारे लाव्ह्या सारख रक्त होतं.ऐन तिशीतल्या चीमाजींना अनुभवी राणोजी शिंदे सरदारांनी साथ दिली . राणोजी शिंदे हे महादजी शिंदे यांचे वडील. 

शर्थी चे प्रयत्न करत चीमाजींनी वसई किल्ल्याची रसद तोडून किल्ल्याच्या अभेद्य भिंती सुरुंग लावून फोडल्या.
तब्बल तीन महिने चाललेल्या धुमश्चक्री नंतर अखेर १६ मे १७३९ रोजी पोर्तुगीजांनी चीमाजींपुढे शरणागती पत्करली.

कॅप्टन केटानो डी सुझा परेरा यांनी शस्त्र ठेवून शरण नाम्यावर सही केली . कॅप्टन ला किल्ल्यातील पोर्तुगीज नागरिक व इतर लवाजम्यासह किल्ला सोडण्यास आठ दिवसांची मुदत दिली गेली . 

२३ मे १७३९ रोजी पोर्तुगीजांनी वसई किल्ला सोडला . पोर्तुगीजांच्या राजनैतिक शिष्टाचारानुसार, किल्ल्यातील अधिकार्याच्या खिदमतीतील एक पोर्तुगीज स्त्री चिमाजी अप्पांना नजर करण्यात आली . चीमाजींनी मात्र शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत त्या  स्त्री ला सन्मानाने पोर्तुगीजांना परत केली.           
                    'वाईटा मधून हि चांगलं ते घ्यावं' या उक्तीस अनुसरून चीमाजींनी वसई किल्ल्यातील दोन भल्या मोठ्या घंटा विजयाची आठवण म्हणून आपल्या सोबत घेतल्या .या दोन घंटा त्यांनी अनुक्रमे भीमाशंकर देवस्थान,पुणे  आणि वाई येथील देवस्थानाला भेट दिल्या . ख्रिस्ताच्या अहिंसेची आणि मानवतावादाची नांदी देणाऱ्या या घंटा आज शिवालायांच्या प्रांगणात  "ओम शांती ओम " चा घंटारव ही  तितक्याच तन्मयतेने करतात.
          शूर वीरांच्या शौर्य गाथेला असेच शांतीचेच पूर्ण विराम लागतात. भाळावरच्या विजयाच्या टिळयांचे अखेर सात्विक गंध होतात. या गंधांना भगवा ...हिरवा ..लाल असा कुठलाच रंग नसतो. असतो तो केवळ नाद ... राष्ट्राभिमानाच्या हुंकारांचा घंटारवच तो  ...
राष्ट्रभक्त  शूर वीर चिमाजी अप्पांच्या सोबत या वसई युद्धात महादजी शिंदे यांचे वडील राणोजी शिंदे हे ही पोर्तुगीजां विरुद्ध लढले.


वसई युद्धाचा सविस्तर वृतांत 


चिमाजी अप्पा (अनंत बाळाजी भट) हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र आणि थोरले बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू होते. त्यांनी महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील पोर्तुगीज वर्चस्व समाप्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. १७३९ साली झालेल्या वसईच्या लढाईत त्यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून वसई किल्ला जिंकला.

लढाईची पार्श्वभूमी:

१५व्या शतकापासून वसई आणि आसपासच्या प्रदेशांवर पोर्तुगीजांचा अंमल होता. वसई हे त्यांचे मुख्य ठाणे होते, ज्यामधून ते रेवदंडा, कल्याण, ठाणे आणि मुंबईच्या सात बेटांवर आपली सत्ता चालवत होते. मराठ्यांनी १७२० मध्ये कल्याण, १७३० च्या दशकात ठाणे आणि साळशेत बेटांवरील किल्ले काबीज केले. पण वसईवरील पोर्तुगीज सत्तेला आव्हान देण्यासाठी आणखी प्रयत्न आवश्यक होते. 

वसई मोहिमेची सुरुवात:

चिमाजी अप्पांनी वसई किल्ला जिंकण्यासाठी १७३७ मध्ये मोहिमेची सुरुवात केली. मार्च २८, १७३७ रोजी मराठा सैन्याने अर्नाळा किल्ला काबीज केला, ज्यामुळे वसईवरील हल्ल्यासाठी महत्त्वपूर्ण आधार मिळाला. यानंतर मराठ्यांनी वर्सोवा आणि धारावी या बेटांवर आपले बस्तान बसवले. 

वसईचा वेढा आणि लढाई:

फेब्रुवारी १७, १७३९ रोजी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसई किल्ल्यावर वेढा घातला. मराठ्यांनी किल्ल्याभोवती घेरा घालून नाकेबंदी केली आणि गनिमी काव्याने हल्ले सुरू ठेवले. या हल्ल्यांमध्ये पोर्तुगीज सेनापती सिल्व्हेरा दि मेंझेस मृत्युमुखी पडला. मे १६, १७३९ रोजी मराठ्यांनी किल्ल्यावर अंतिम हल्ला केला आणि पोर्तुगीजांनी शरणागती पत्करली. 

हिंदू पुनरुत्थान:

विजयानंतर चिमाजी अप्पांनी वसईचे नाव बदलून बाजीपूर असे ठेवले. पोर्तुगीजांच्या अंमलात झालेल्या धर्मांतरांना उत्तर म्हणून त्यांनी हिंदू धर्मीयांना परत येण्याचे आवाहन केले. तसेच, त्यांनी नागेश्वर, हनुमान, त्रिविक्रम आणि भवानीशंकर यांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार करविला. 

वसई विजयाचे महत्त्व:

वसईच्या विजयामुळे मराठ्यांनी उत्तर कोकणात आपली सत्ता प्रस्थापित केली आणि पोर्तुगीजांच्या पश्चिम किनारपट्टीवरील वर्चस्वाला धक्का बसला. या विजयामुळे मराठ्यांचे आरमार मजबूत झाले आणि हिंदू धर्मीयांना आश्रय मिळाला. 

चिमाजी अप्पांच्या या विजयामुळे मराठा साम्राज्याच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण अध्याय लिहिला गेला.

हे ही वाचा:

मराठा साम्राज्याच्या कोल्हापूर व सातारा या दोन गाद्या कशा ?


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या