Pune 'Rocks' : पुण्याच्या वेताळ टेकडीवर दगड खाणीत प्रदूषण खाणारे जीवाणू : डॉ. मोनाली रहालकर यांचे संशोधन
Picture of Scientist Dr Monali Rahalkar with inset picture of Methanotrophs she discovered |
पुण्याच्या ARI ( Agharkar Research Institute) या संशोधन संस्थेच्या जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ मोनाली राहालकर यांनी मिथेन खाणार्या जीवाणूं ( bacteria) चा शोध लावला आहे.
हे जीवाणू मुख्यत: पुण्याच्या वेताळ टेकडीवरील दगड खाणीत आढळले आहेत . साधारणतः भात शेतांमधे व पाणथळ अशा दलदलीच्या भागात हे bacteria सापडतात.
Global warming ला उत्तर शोधणार्या डॉ. मोनाली रहालकर: परीचय व कार्य
शिक्षण
Dr मोनाली रहालकर या पुण्याच्या ARI (आघरकर रीसर्च इन्स्टिट्यूट) या अनुसंधान संस्थेत Research and Development Scientist म्हणून गेली ११ वर्षे कार्यरत आहेत. पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून Msc केल्यानंतर त्यांनी जर्मनीतील University of Konstanz मधून Microbial Ecology या विषयावर Doctorate मिळवली. Global warming , Methane Cycle, जीवाणू संवर्धन, शेत जमीनीत Nitrogen वृद्धी करणारे जीवाणू अशा विषयांमधे Dr मोनाली रहालकर यांना रस आहे.
२०१९ -COVID प्रसार संदर्भात संशोधन
COVID विषाणू चीनच्या वूहान प्रयोगशाळेतूनच जगभर पसरल्याचे सिद्ध केले
संपूर्ण जगात COVID साथीची लागण झाल्यावर कोवीडचे विषाणू चीन च्या वूहान येथील प्रयोगशाळेतून जगभर पसरले असा आरोप चीनवर झाला पण चीनने सातत्याने या आरोपाचे खंडण करत COVID चे विषाणू प्राण्यांकडून माणसांमधे पसरले असे सांगितले. चीन चा हा तर्क पुराव्यांसकट खोटा असल्याचे सिद्ध करून Dr मोनाली रहालकर यांनी चीनच्या वूहान प्रयोगशाळेतूच COVID चे विषाणू जगभर प्रसारित झाले असे ठामपणे सांगितले होते.
वातावरण प्रदूषणातील मोठा घटक असलेल्या मिथेन ला खाणार्या जीवाणूंचा शोध
नुकतेच डॉ मोनाली रहालकर यांचा मिथेन खाणार्या जीवाणूंवरील शोध अभ्यास Indian Journal of Microbiology आणि इतर वैज्ञानिक जरनल मधे प्रसिद्ध झाला आहे. वातावरण बदल व Global warming च्या अनुषंगाने या विषयावर सातत्याने पुढील संशोधन होत रहाणे गरजेचे आहे असे डॉ मोनाली राहालकर म्हणतात.
पुण्यातील वेताळ टेकडी वरील संशोधन
पुण्यातील वेताळ टेकडी Morning व Evening walkers चं हक्काचे ठिकाण. छोटासा ट्रेक करून या टेकडीवर जाता येते व गाडीने ही वर थेट पोहोचण्याचा मार्ग आहे. या वेताळ टेकडीवर दगड खाण आहे आणि याच खाणीच्या परीक्षण व संशोधना अंती इथे मिथेन खाणारे जीवाणू आहेत असे डॉ मोनाली राहालकर यांच्या लक्षात आले.
Methanotrophs अर्थात मिथेन खाणारे जीवाणू
सूक्ष्मदर्शकाखाली Methanotrophs Pic courtesy Google |
या Methanotrophs ची शास्त्रीय संज्ञा Methylocucumis Oryaze अशी आहे. सूक्ष्मदर्शकाखाली यांचा आकार काकडी सारखा दिसतो या कारणामुळे 'मिथेन खाणारी काकडी ' ( Methane eating cucumber)असे या Methanotrophs ना टोपण नाव दिले गेले आहे.
डॉ मोनाली राहालकर यांनी संशोधित केलेल्या या Methanotrophs ची संरचना unique अशी आहे व अशा पद्धतीचे Methanotrophs जगात इतरत्र कुठेही आढळलेले दिसत नाही.
Global warming च्या लढ्यातील महत्वाचे पाऊल
हा शोध Global warming विरुद्ध च्या लढ्यातील एक महत्वाचे पाऊल आहे कारण Methane हा Green house gas वातावरणात कार्बनडाय ऑक्साइड पेक्षा २६ पट अधिक असतो.
डॉ मोनाली राहालकर यांच्या संशोधनामुळे वातावरणातील हे विषारी मिथेन कमी करण्यास मदत होणार आहे. Global warming मुळे होणारी निसर्ग हानी कमी करण्या बरोबरच शेती मधे पीक उत्पादनाची प्रत व क्षमता वाढवण्यासाठी डॉ मोनाली राहालकर यांच्या या संशोधनाचा उपयोग होणार आहे .
0 टिप्पण्या