Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

पावसाळ्यात मांसाहार टाळा | Reasons to avoid Nonveg in rainy season

 पावसाळ्यात मांसाहार का टाळावा?


Written by Avinash Bhanu Asha Ghodke 

पावसाळ्यात चमचमीत झणझणीत व Non veg म्हणजे आजारांना फुकटचे निमंत्रणच 

पाऊस म्हटले की चमचमीत झणझणीत खाण्याची इच्छा होते. पण शक्यतो तेलकट तिखट व विशेष करून non veg खाणे पावसाळ्यात टाळावे.



खालील कारणांमुळे पावसाळ्यात मांसाहार टाळणे श्रेयस्कर ठरू शकते:


१. स्वच्छतेची समस्या:

पावसाळ्यात वाढलेल्या आर्द्रतेमुळे खाद्यपदार्थांमध्ये बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजीवांची वाढ झपाट्याने होते. अशा स्थितीत मांसाची योग्य साठवण आणि स्वच्छता राखणे कठीण होते, ज्यामुळे अन्नातून होणारे आजार पसरण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत रस्त्यावरील फास्ट फूड च्या गाड्यांवरील पदार्थ खाणेही पावसाळ्यात टाळलेलेच बरे अन्यथा पचनसंस्था बिघडणे वा ताप येणे अशा समस्यांना नाहक आमंत्रण दिले जाईल.


२. पाचनसंस्थेची कमजोर स्थिती:

पावसाळ्यात आपल्या पचनसंस्थेची कार्यक्षमता कमी होते. यामुळे जड आणि चरबीयुक्त मांस पचविणे कठीण जाते. अशा परिस्थितीत अपचन, अ‍ॅसिडिटी, आणि इतर पचनाचे विकार उद्भवण्याची शक्यता वाढते.


३. माशांचा प्रजनन काळ व प्राण्यांची रोग बाधा :

पावसाळ्यात मासेमारीवर निर्बंध असते कारण हा मासे 'प्रजननाचा काळ' आहे. त्यामुळे या काळात बाजारात ताजे आणि दर्जेदार मासे मिळणे कठीण होते. परिणामी, विक्रीसाठी उपलब्ध मासे क्वचितच ताजे असतात किंवा साठवलेल्या स्वरूपात असतात, ज्यामुळे ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

याचबरोबर माणसांप्रमाणेच इतर‌ प्राण्यांची रोग‌प्रतिकारक‌ शक्ती या काळात कमी झालेली असते. या प्राण्यांना झालेली रोगबाधा त्यांच्या मांस सेवनातून आपणास ही होवू शकते यामुळे पावसाळ्यात Non veg टाळलेलेच बरे.


४. हाडांचे विकार:

पावसाळ्यात आर्द्रतेमुळे शरीरातील हाडे आणि सांध्यांवर ताण येतो. यावेळी मांसाहार टाळल्यास शरीरातील दाहकता आणि सांध्यांचे दुखणे कमी होण्यास मदत होते. 

५. पर्यावरणीय कारणे:

पावसाळ्यात माशांच्या प्रजातींचे संवर्धन आणि पुनरुत्पादन यासाठी हा काळ महत्त्वाचा असतो. या काळात मांसाहार कमी केल्याने पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होते. 


उपाय आणि पर्याय:


शाकाहाराचे महत्त्व: 

या काळात शाकाहाराला प्राधान्य द्यावे. शाकाहारी आहारामध्ये ताज्या हिरव्या भाज्या, फळे, धान्य यांचा समावेश करावा, जे पोषक आणि हलके असतात.  तसेच एखाद्या दिवशी उपवास करावा‌ जेणेकरून‌ पचन संस्थेस विश्राम मिळेल.

  

प्रथिनांचा स्रोत: 

मांसाहाराच्या ऐवजी कडधान्ये, डाळी, सोया, आणि दूध यांसारख्या प्रथिनांच्या स्रोतांचा समावेश आहारात करावा.


सुप आणि सलाड चे सेवन: 

सूप हे आरोग्यासाठी फायदेशीर असून पचनास सोपे असते. 

Simple Soup Recipe सुकवलेल्या हिरव्या मूगा पासून आपण  अशा प्रकारे सूप बनवू शकता

  • मूग तव्यावर भाजून घ्यावेत 
  • नंतर ते कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. 
  • या शिजवलेल्या कडधान्यास मिक्सर मधून वाटून घ्यावे.
  • एका पातेल्यात ही पेस्ट पाणी टाकून थोडी पातळ करावी
  • ग्यासवर ठेवून उकळी काढावी
  • मीठ व काळी मिरी पूड टाकून नंतर जिरे लसणाची फोडणी द्यावी 

अशाप्रकारे इतरही कडधान्यांचे सूप आपण बनवू शकतो व पावसाळ्यात आपल्या प्रकृतीची उत्तम नीगा राखू शकतो.

इतर ही काही पद्धतीने आपण असे सूप सहज बनवू शकतो. मुगाचे कढण ही याला म्हणतात व अशा रेसीपी YouTube वर उपलब्ध आहेत 

A Bowl of Soup placed on a plate
मुगाचे सूप


पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेतल्यास रोगप्रतिबंधक शक्ती वाढवता येते आणि विविध आजारांपासून संरक्षण मिळते. म्हणून, पावसाळ्यात मांसाहार विचारपूर्वक टाळलेला बरा. Stay healthy in this Monsoon.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या