माझी लाडकी बहीण योजना|महिलांसाठी अर्ज प्रक्रिया आता अधिक सोपी
महिलांना आता उत्पन्न व इतर प्रमाणपत्रां साठी सरकारकडून शिथिलता जाहीर
उत्पन्न प्रमाणपत्र शिथिलता व इतर बदल
'माझी लाडकी बहीण योजना' महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 1 July 2024 पासून सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाईल. योजना प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, विधवा आणि निराधार महिलांना मदत करण्यावर केंद्रित आहे.
1. उत्पन्नाची अट शिथिल:
ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना योजनेचा लाभ मिळतो. तथापि, जर उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असलेल्या कुटुंबांना उत्पन्न प्रमाणपत्रातून सुट दिली जाते
2. अर्ज प्रक्रिया सोपी केली: Offline अर्ज स्वीकृती केंद्रे
महिलांना माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सुलभतेने करता यावा म्हणून
- अंगणवाडी केंद्र
- बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय,
- ग्रामपंचायत कार्यालय
- सेतू सुविधा केंद्र
*या ठिकाणी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया ठेवण्यात आली आहे
3. माझी लाडकी बहीण योजनेसाठी अन्य आवश्यक कागदपत्रे:
जर आधिवास( Domicile )प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर
- पंधरा वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड
- मतदार ओळखपत्र
- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
- जन्म प्रमाणपत्र
या पर्यायांमध्ये कोणतेही एक कागदपत्र ग्राह्य धरले जाईल.
*महाराष्ट्रा बाहेर जन्मलेल्या महिलांच्या पतीची अधिवास कागदपत्रे ग्राह्य धरली जातील
माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांचे वयोगट आणि इतर अटी:
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
- *पूर्वीची 60 वयाची पात्रता वाढवून आता 21 ते 65 वर्षांच्या महिलांना अर्ज करता येईल.
- अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.सदर उत्पन्न दाखला नसल्यास पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड उत्पन्न पुरावा म्हणून ग्राह्य मानले जाईल.
- अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असू नये किंवा आयकरदाता असू नये.
- अर्जदाराचे बँक खाते आधार आणि मोबाईल क्रमांकाशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
- कुटुंबातील पात्र अविवाहित महिला ही या योजनेचा लाभ घेवू शकतील
आवश्यक कागदपत्रे:
- - आधार कार्ड
- - रहिवासी प्रमाणपत्र
- - उत्पन्न प्रमाणपत्र
- - वयाचा पुरावा
- - रेशन कार्ड
- - जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
- - बँक पासबुक
- - पासपोर्ट-आकाराचे फोटो
- - मोबाईल क्रमांक
प्रक्रिया:
1. माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सादर करणे:
महिलांनी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सादर करावा. Online अर्ज सादर करण्यासाठी
- वेब पोर्टल सरकारची विशेष वेबसाईट https://ahmednagar.nic.in/en/notice/mukhyamantri-mazi-ladki-bahin-yojana-form/
- मोबाइल App | नारी शक्ती दूत App| Nari Skakti Doot App
- सेतू सुविधा केंद्रांचा वापर करता येतो
Offline अर्ज खालील ठिकाणी करता येईल
- अंगणवाडी केंद्र
- ग्रामपंचायत कार्यालय
इत्यादी ठिकाणी भरता येतो.
2.पूर्णत: विनामूल्य अर्ज प्रक्रिया: अंतिम तारीख
अर्ज सादर करण्यासाठी कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही, आणि अर्ज प्रक्रिया विनामूल्य ठेवण्यात आली आहे. सदर अर्ज महिलांनी 31 August 2024 पर्यंत सादर करावयाचा आहे.
या सुधारणा केल्यामुळे जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ घेता यावा हे सरकारचे धोरण आहे. सदर योजने च्या अर्ज प्रक्रियेसाठी कुणी पैशांची मागणी केल्यास नजिकच्या पोलिस ठाण्यात महिलांनी तक्रार नोंदवावी.
पुरावा कागदपत्रे सादर करण्याचा महिलांचा त्रास कमी होणार आहे.| माहिती संकलनासाठी इतर विभागांची मदत
Two dimensional map of Maharashtra state with caption super imposed |
0 टिप्पण्या