Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

Priyanka Chopra la south Director Rajamouli ni kele sign-record break maandhan-

राजामौली यांच्या आगामी चित्रपटातून प्रियांका चोप्राचे पुनरागमन: महेश बाबू असणार नायक

Bollywood actor Priyanka Chopra close up
प्रियांका चोप्रा pic courtesy: Google 




प्रियांका चोप्रा ची पुनरागमनासाठी राजामौली यांच्या SSMB 29 या दाक्षिणात्य चित्रपटाची निवड : किती घेतले मानधन?

लग्नानंतर प्रियांका चोप्राने पूर्णपणे हॉलिवूड वर आपले लक्ष केंद्रित केले होते . इथले चांगले चाललेले करीअर सोडून हॉलिवूड मधे नव्याने जम बसवणे सोपे नाही असा तिची आई मधू चोप्रा ने  तिला सल्ला दिला होता असे प्रियांका ने एका मुलाखतीत सांगितले होते पण प्रियांका आपल्या निर्णयावर ठाम होती. 

प्रियांका चोप्रा कायमची हाॅलिवूड ला गेली असे वाटत असतानाच तिच्या पुनरागमनाची बातमी

आई च्या म्हणन्यानुसार मात्र प्रियांका चोप्रा ने भारतातली आपली परपल पिक्चर्स ही प्रोडक्शन कंपनी सुरू ठेवली जिच्या मार्फत छोट्या बजेटचे अर्थपूर्ण प्रादेशिक चित्रटांची निर्मिती ती करत होती. या कंपनीचे काम तिची आईच बघत होती. काही दिवसांपूर्वी प्रियांकाची आई मधू चोप्रा ही कंपनी बंद करून अमेरिकेला शिफ्ट झाली आणि प्रियांका चोप्रा आता बॉलिवूड च्या पडद्यावर कधीच दिसणार नाही असे तिच्या चाहत्यांना वाटू लागले.

नुकतेच प्रियांका चोप्रा ने RRR फेम दाक्षिणात्य दिग्दर्शक राजामौली यांच्या SSMB 29 या आगामी बिग बजेट चित्रपटात काम करत असल्याची अधिकृत घोषणा केली .आता प्रियांका बॉलिवूड नाही पण दाक्षिणात्य निर्मिती असलेल्या व १००० करोड चे बजेट असलेल्या मोठ्या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे निश्चित झाले आहे.

पुनरागमनासाठी प्रियांका चोप्रा ने दाक्षिणात्य चित्रपट का निवडला असावा

डब केलेले दाक्षिणात्य चित्रपट आजकाल भारतात प्रचंड चालत आहेत व त्यांचा बॉलिवूड च्या एकूण नफ्यात अंदाजे 30% वाटा आहे‌ जो खूप मोठा आहे . दाक्षिणात्य चित्रपट क्षेत्रातील शिस्त व व्यावसायिकता प्रसिद्ध आहे. सामान्यांच्या किंवा अती सामान्यांच्या महत्वाकांक्षां भोवती फिरणारे त्यांचे कथानक असते व सादरीकरण अतीशय नाट्यमय व भव्य व धडाकेबाज असे असते. प्रसंगी हे सादरीकरण भडकते कडेही झुकते.

बॉलीवूड झालंय इतिहास की पाठशाला

याच्या विरुद्ध चित्र आज बॉलीवूड मध्ये आहे. बॉलीवूड चे हिंदी सिनेमे कथा explore करण्यापेक्षा advance technology वापरून इतिहास explore करण्याला जास्त महत्व देत आहे. ऐतिहासिक विषयांमध्ये अशा technical indulgence च्या शक्यता जास्त निर्माण होतात . म्हणून सध्या बॉलिवूडमध्ये बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटांची लाट दिसते. प्रसिद्ध ऐतिहासिक महानायकांमधे प्रेक्षकांचा एक भावनिक धागा आयता विणलेला असतो तो बॉलिवूड निर्मात्यांना safe game strategy नुसार सोयीचा वाटतो. ‘तुम्हाला कंटेंपररी कंटेंट पाहिजे तर OTT वर जा आम्ही मात्र तुमच्या अस्मीता जागृत ठेवण्यासाठी ऐतिहासिक चित्रपट बनवत आहोत ‘असे बॉलीवूड चे म्हणणे आहे. तिकडे दाक्षिणात्य चित्रपटांनी मात्र बॉलिवूड चा हक्काचा अटकेपार चा मुलूक ही काबीज करून टाकला आहे.

आम्ही रिजनल सिनेमा नाही- मामूटी

काही वर्षांपूर्वी मल्याळम सुपरस्टार मामुटी यांनी बॉलीवूड च्या एका आंतरराष्ट्रीय महोत्सवात भाषण करताना कन्नड किंवा इतर दाक्षिणात्य चित्रपटांना Regional Cinema संबोधल्या बद्दल जाहीर संताप व्यक्त केला होता. दक्षिण प्रांत म्हणजे अर्धा भारत आहे व आमचे चित्रपट अर्ध्या भारतात पाहिले जातात मग आम्ही प्रादेशिक किंवा Regional Cinema कसे?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

आज परिस्थिती खरंच बदलली आहे. दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूड ला शह देवू पहात आहेत. प्रियांका चोप्रा ने ही पुनरागमनासाठी दाक्षिणात्य चित्रपट निवडला कारण दाक्षिणात्य चित्रपट आज बॉलिवूड पेक्षा सरस ठरत आहेत. राजामौली यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी प्रियांका ला 30 करोड देण्यात आले आहेत अशी बातमी आहे व हा आकडा बॉलिवूड च्या आताच्या टॉपच्या अभिनेत्रींच्या मानधनापेक्षा मोठा आहे. दाक्षिणात्य निर्मात्यांची good pay masters अशी प्रतिमा आहे. दक्षिणेत लेखकांना ही स्टार्स च्या बरोबरीने मानधन दिले जाते. यामुळेच आज दाक्षिणात्य चित्रपट आपल्या पारंपारिक व हुकमी emotional pot boilers च्या जोरावर नवनवे व्यावसायिक कीर्तिमान प्रस्थापित करित आहेत.

राकेश रोशन यांचे दाक्षिणात्य चित्रपटांबाबत वेगळे मत

क्रिश २ ह्या आपल्या येवू घातलेल्या चित्रपटात गुंतलेले राकेश रोशन दाक्षिणात्य चित्रपटांच्या चित्रपटांकडे वेगळ्या दृष्टीने बघतात. ‘दाक्षिणात्य चित्रपट विषयांच्या बाबतीत खूप पारंपारिक असतात याउलट आम्ही रिस्क घेवून काही नवीन देण्याचा प्रयत्न करतो’ असे त्यांचे क्रिश २ चा संदर्भ देवून म्हणने आहे. पण हे‌ संपूर्ण बॉलिवूड ला लागू होत नाही.

नेटफ्लिक्स इंडिया च्या The Roshans या रोशन कुटुंबा वरील docuseries मधे‌ प्रियांका चोप्रा ने‌ मात्र राकेश रोशन यांच्या outsider ना संधी देण्याच्या गुणांची प्रशंसा केली आहे

अनुराग कश्यप ही दक्षिणेकडे 

बॉलिवूड च्या ठोकळेबाज व्यावसायिक नीती मुळे उद्वीग्न झालेल्या दिग्दर्शक अनुराग कश्यप याने नुकतेच बॉलिवूड सोडून दक्षिणेत जाण्याचा आपला निर्णय जाहीर रित्या व्यक्त केला होता.

हा निर्णय घेण्यामागे त्यांनी दोन कारणे ठळकपणे सांगितली आहेत ती म्हणजे निर्मात्यांची अती व्यावसायिकता व स्टार्स ची फी व वागणुकीतील बढेजाव.

बॉलिवूडमधील सर्जनशीलतेचा अभाव: अनुराग कश्यप यांच्या मते, बॉलिवूडमध्ये सध्या फक्त व्यवसाय आणि नफ्यावर चर्चा होते.चित्रपटाची विक्री कशी होईल, यावर आधी विचार केला जातो, ज्यामुळे चित्रपट बनवण्याची मजा कमी होते.त्यांच्या मते, बॉलिवूडमध्ये नवीन प्रयोग करण्याची तयारी कमी आहे आणि फक्त रिमेक चित्रपटांवर भर दिला जातो.

स्टार ट्रिटमेंटची समस्या: अनुराग कश्यप यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या वागणुकीबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे.ते म्हणतात की, हिंदी चित्रपटांतील प्रत्येक अभिनेत्याला स्टार ट्रिटमेंटची गरज असते, परंतु दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत असे घडत नाही.तिथे मोठे कलाकारही चित्रपटातील इतरांप्रमाणेच वागतात. दक्षिणेतील चित्रपट सृष्टीमध्ये कलात्मकतेला पोषक असे वातावरण आहे व तिथे चित्रपट बनविण्यासाठी आवश्यक ऊर्जा व प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


Bollywood ने व्यवसाय नीती बदलण्याची वेळ

2026 साली प्रस्तावित रिलीज असलेल्या SSMB29 या चित्रपटातून दिग्दर्शक राजामौली प्रियांका चोप्रा ला घेवून जंगल कथा मांडणार आहेत असे कळते. Losing the Jungle for woods या उक्तीप्रमाणे बॉलिवूड मात्र झाडे मोजण्यात गर्क आहे.  Multiplex Audience ला कॅश करण्यासाठी movies बनवण्या पेक्षा बॉलिवूड ने आता सामान्यांच्या मनातला Cinema बनवण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या