Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

Fig tree and it's significance in religion: अंजीर झाडाचे धार्मिक महत्त्व

 औदुंबर अर्थात अंजीराचे आध्यात्मिक महत्त्व 


पर्यावरण दिना निमित्त जाणून घ्या अंजीर झाडाचे महत्त्व. Fig tree and it's importance in culture and religion 

Written by Avinash Bhanu Asha Ghodke 

.flower and fruits of Fig tree in blossom period
अंजीराचे बहरलेले झाड

अंजीराची उत्पत्ती

अंजीराचे झाड, याचे वैज्ञानिक नाव फिकस कारिका (Ficus carica) असे आहे, इंग्रजीत याला FIG TREE म्हटले जाते . अंजीर हे मूळचे पश्चिम-आशिया आणि मध्यपूर्वेमधील झाड आहे. हे झाड प्राचीन काळापासून लागवड करण्यात येते आणि आज जगभरातील विविध उष्णकटिबंधीय भागांमध्ये ते प्रामुख्याने आढळते.


अंजीराचे पाककला व आहार मूल्य

अंजीर हे एक पौष्टिक फळ आहे ज्याचा उपयोग विविध प्रकारच्या पाककलेत केला जातो. ते ताजे, सुकवलेले किंवा इतर संरक्षित स्वरूपात खाल्ले जाते. अंजीरात तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. अंजीराचे सेवन केल्याने पचनसंस्था सुधारते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि वजन कमी करण्यासही याची मदत होते.


अंजीराचे सांस्कृतिक महत्त्व

अंजीराचे झाड अनेक संस्कृतींमध्ये महत्त्वपूर्ण मानले जाते. प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृतींमध्ये अंजीराचे फळ धन, समृद्धी आणि स्वास्थ्याचे प्रतीक मानले जायचे. विविध कलांमध्ये आणि साहित्यामध्ये अंजीराचे झाड आणि फळ यांचा उल्लेख आढळतो, ज्यामुळे त्याचे सांस्कृतिक महत्त्व अधिक ठळक होते. औदुंबर म्हटले की बालकवींची प्रसिद्ध मराठी कविता औदुंबर आठवतेच. 


औदुंबर

ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून

चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे ,शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गरदी पुढे

पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे, हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे

झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर ,पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर

कवी: बालकवी. (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)

हिंदू धर्मातील अंजीराचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मामध्ये अंजीराच्या झाडाला धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. पिंपळ व वडाच्या झाडासारखेच, अंजीराचे झाडही पवित्र मानले जाते. पिंपळ वड व अंजीर ही तीन झाडे एकत्र असल्यास ते दत्ता चे पवित्र स्थान मानले जाते. दत्त ही दैवी संकल्पना पाश्चात्य वा ख्रिस्ती परंपरेतील Divine Trinity शी साधर्म्य सांगणारी आहे असे काही तज्ञ मानतात .अनेक ठिकाणी अंजीराच्या झाडाखाली धार्मिक विधी केले जातात. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये अंजीराच्या पानांचा वापर होतो. तसेच, अंजीराच्या फळाचा नैवेद्य म्हणून ही उपयोग होतो. अंजीराचे झाड जिथे उगवते तीथेच हमखास भूमीगत जलसाठा असतो असे आढळले आहे.


अंजीराचे ख्रिस्ती धर्मातील धार्मिक महत्त्व

ख्रिस्ती धर्मात देखील अंजीराच्या झाडाचे  महत्त्व आहे. बायबलमध्ये अंजीराच्या झाडाचा उल्लेख आहे आणि त्याला एक प्रतिकात्मक अर्थ आहे. येशू ख्रिस्ताने इस्राईल मधे फळ नं देणार्या एका अंजीर वृक्षास शाप दिला होता असे एका बायबलच्या उद्धधरणावरून सांगता‌ येते.

 Matthew 21:18-22 /New Century Version (NCV)

Seeing a fig tree beside the road, Jesus went to it, but there were no figs on the tree, only leaves. So Jesus said to the tree, “You will never again have fruit.” The tree immediately dried up. When his followers saw this, they were amazed

इथे अंजीराचे झाड हे इस्राईल राष्ट्राचे प्रतीक म्हणून उल्लेखित आहे असे ही म्हटले जाते. 

Adam आणि Eve ची अंजीराच्या पानाची जगातील पहिली वस्त्रे 

ख्रिस्ती धर्म पुराणा अनुसार एडम आणि इव्ह Adam and Eve या ईश्वर निर्मित प्रथम स्री पुरूषांना स्वर्ग लोकीच्या बागेतील सफरचंद खाण्यास ईश्वराने प्रतिबंध केला होता तरी ही त्यांनी ती खाल्ली.आपण केलेली चूक दोघांच्याही लक्षात‌ आली .निरागस पवित्र मनाला अचानक  शरीर लज्जेची जाणीव निर्माण झाल्याने त्यांनी अंजीराच्या झाडांची पाने शिवून त्याची वस्त्रे करून आपली लज्जा झाकली. 

 अंजीराचे फळ अनेकदा ख्रिस्ती धर्माच्या धार्मिक सणांमध्ये वापरले जाते. सद्य स्थितीत इस्राईल मधे अंजीर झाडांचा अफाट असा बहर‌ आहे हे एक शुभ चिन्ह आहे व‌ ते‌ ख्रिस्ताच्या पुनरागमनाचा शुभसंकेत ख्रिस्ती समाज मानतो.


अशाप्रकारे, अंजीराचे झाड हे केवळ एक पौष्टिक फळ देणारे झाड नाही, तर त्याचे सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वही खूप मोठे आहे. विविध धर्मांमध्ये आणि संस्कृतींमध्ये अंजीराचे झाड आणि त्याचे फळ हे आदर आणि श्रद्धेने पाहिले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या