आर्थिक मंदी वर लिपस्टिक चा शिक्का मोर्तब
![]() |
Lipstick Index देते आर्थिक मंदीची पूर्व सूचना |
महिला लिपस्टिक खरेदीवर भर देवू लागल्या तर देशात आर्थिक मंदी येवू घातलीय यांची ती पूर्वसूचना समजावी.
अमेरिकेत ऐन इलेक्शन च्या तोंडावर अमेरिकन अब्जाधीश व गुंतवणूकदार वाॅरन बफेट यांनी एका सौंदर्य प्रसाधन निर्मिती कंपनी मधे मोठी गुंतवणूक केली आणि Lipstick Index च्या सूत्रानुसार आर्थिक मंदीची चर्चा अमेरिकन सोशल मीडियावर सूरू झाली आहे .
![]() |
Artist presentation of Lipstick Index concept |
Lipstick Index : अर्थव्यवस्था आणि सौंदर्य प्रसाधन यांची सांगड घालत लिओनार्डो लॉडर यांनी मांडली होती संकल्पना
लिओनार्डो लॉडर, ज्येष्ठ अमेरिकन उद्योगपती व 'एस्टे लॉडर कॉस्मेटिक्स' या प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधन कंपनी चे अध्यक्ष, यांनी 2001 साली एक अनोखी संकल्पना मांडली जी "लिपस्टिक इंडेक्स" या नावाने ओळखली जाते. ही संकल्पना lipstick विक्रीला आर्थशास्त्रीय घडामोडींशी जोडते.
2001 च्या जागतिक आर्थिक मंदीच्या काळात लिओनार्डो लॉडर यांच्या असे लक्षात आले की अमेरिकन महिलांकडून अचानक lipstick खरेदीमध्ये वाढ झाली आहे. या trend वरून त्यांनी असा दावा केला की lipstick खरेदीत अचानक झालेली वाढ म्हणजे आर्थिक मंदीची संभाव्यता आहे.
![]() |
Lipstick:महिलांचा किफायतशीर आत्मविश्वास booster |
Lipstick Index: मंदीच्या काळात महिलांच्या आत्मविश्वासाचा आधार होते किफायतशीर Lipstick
लिपस्टिक इंडेक्सचे विश्लेषण असे करता येते की आर्थिक संकटांच्या काळात महिला वर्ग मोठे खर्च टाळतो, जसे की लक्झरी कपडे, दागिने किंवा मोठे घरगुती उपकरणे खरेदी करणे. त्याऐवजी त्या छोटे पण मनाला समाधान देणारे असे खर्च करतात. या परिस्थितीत, लिपस्टिक सारख्या स्वस्त सौंदर्य उत्पादनांची विक्री वाढते कारण ती परवडणारी लक्झरी मानली जाते. लॉडर यांच्या मते, मंदीच्या काळात महिलांना आत्मविश्वास मिळवण्यासाठी आणि मानसिक समाधानासाठी लहान खर्च करणे आवडते, आणि आर्थिक मंदी काळात वाढलेली महिलांची लिपस्टिक खरेदी हे त्याचेच प्रतीक आहे.
आर्थिक विश्लेषण आणि लिपस्टिक विक्रीतील मनोवैज्ञानिक संबंध
लिपस्टिकचा रंग, त्याची चमक, आणि त्यातून मिळणारा आत्मविश्वास यामुळे अनेकदा महिलांचा मूड सुधारतो. आर्थिक चणचणीची काळजी विसरण्यासाठी गडद रंगाची लिपस्टिक महिला लावतात व स्वत:चे मनोबळ त्या एकप्रकारे वाढवतात. तसा ही लाल रंग हा ऊर्जेचा स्रोत असतो. धार्मिक विधींमधे भारतीयांमधेही लाल रंगाच्या वापराचे प्रचलन आहे ते यामुळेच.
इतिहासातील उदाहरणे
2001 च्या अमेरिकन मंदीच्या काळात लिपस्टिकची विक्री वाढल्याचे लॉडर यांनी पाहिले होते पण यापूर्वीही, 1929 च्या महामंदीच्या काळात सौंदर्य उत्पादनांच्या विक्रीत विशेष वाढ झाली होती. दुसऱ्या महायुद्धानंतरही म्हणजे १९१८ नंतर लहान सौंदर्य उत्पादने विकत घेण्याचा कल महिलांमधे दिसून आला होता. या उदाहरणांतून असे दिसून आले की मंदीच्या काळात महिलांचा सौंदर्यविषयक खर्च कमी होत नाही, तर तो परवडणाऱ्या गोष्टींवर केंद्रीत होतो.
लिपस्टिक इंडेक्सवर टीका
लिपस्टिक इंडेक्स ही कल्पना अनेक वेळा सत्य ठरली आहे, पण यावर काही टीका देखील झाली आहे. आजच्या डिजिटल युगात, आर्थिक अस्थिरतेतून लोकांची खरेदीची सवय बदलली आहे. महिलांची सौंदर्य उत्पादनां बाबत ची पसंती ही अधिक विस्तृत झाली आहे, ज्यामध्ये फक्त लिपस्टिकच नव्हे तर इतर सौंदर्य उत्पादने आणि सेवांचा समावेश झालेला आहे. शिवाय, काही अभ्यासांनुसार लिपस्टिक विक्रीत वाढ झाली असली तरी, ती मंदीची अचूक सूचक ठरत नाही असे काही अर्थ शास्त्रज्ञ मानतात. केवळ एका लिपस्टिक सारख्या क्षुल्लक उत्पादनाच्या विक्रीवर अर्थशास्त्रीय आडाखा मांडणे या अर्थशास्त्रज्ञांना मान्य दिसत नाही.
आधुनिक काळातील बदल
2001 च्या आर्थिक मंदी नंतर आता 24 वर्षांचा काळ लोटला आहे. Digital revolution मुळे जग पूर्णत: बदलले आहे .सौंदर्य उत्पादनांची श्रेणी ही आताअधिक विस्तारित झाली आहे. आज, त्वचेची काळजी घेणारी उत्पादने, ऑनलाइन खरेदी, आणि सौंदर्य सेवांचा बाजार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे 'लिपस्टिक इंडेक्स' हा पारंपरिक सूचक म्हणून पूर्णतः वापरता येणार नाही. मात्र, आर्थिक संकटांच्या काळात लहान, परवडणाऱ्या डिजिटल उत्पादनांची लोकप्रियता वाढत असल्याचे ही दिसत आहे.
![]() |
Lipstick Index |
टीप: महिलांच्या अतिरिक्त सौंदर्य प्रसाधन खरेदीमुळे जगात आर्थिक मंदी येते असे Lipstick Index सांगत नाही तर अशी अचानक वाढलेली खरेदी फक्त येणारी आर्थिक मंदी Indicate करते असे अनुमान lipstick Index मधून काढले जाते.
निष्कर्ष
लिपस्टिक इंडेक्स ही लिओनार्डो लॉडर यांनी मांडलेली एक अत्यंत प्रभावी आणि मनोरंजक आर्थिक संकल्पना आहे. सौंदर्य उत्पादनांच्या खरेदीतील बदलत्या प्रवृत्ती आणि महिलांच्या मानसिकतेशी ती जोडली गेली आहे. आर्थिक मंदीच्या काळात लहान गोष्टींमधून आनंद मिळवण्याचा मानवी स्वभाव या संकल्पनेच्या मुळाशी आहे. आजच्या काळात जरी सौंदर्य उत्पादनांच्या खरेदीत नवनवीन घटक समाविष्ट झाले असले तरी, Lipstick Index असे नाव प्रातिनिधिक म्हणून स्वीकारता येते . वाॅरन बफेट यांची सौंदर्य प्रसाधन उत्पादन कंपनीतील गुंतवणूक कशाचे सूचक आहे हे येणारा काळच सांगणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत कमला हॅरिसन या महिला स्पर्धेत आहेत ज्यामुळे lipstick Index ला एक वेगळे परिमाण लाभते.
0 टिप्पण्या