Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

Hamida Banu : भारताची पहिली महिला पेहलवान


'मुझसे जीतेगा दंगल, उसीसे करूंगी शुभमंगल'

माझ्याबरोबर जो कुस्ती जिंकेल त्याच्याशी मी विवाहबद्ध होईल!  असे  पुरूष पैलवानांना सनसनाटी  जाहीर आवाहन करणार्या हमीदा बानू या महिला पैलवानाचं डूडल चित्र गूगलने अगदी औचित्यपूर्णतेने ४ मे रोजी प्रदर्शित केलं. त्या हमीदा बानू बद्दल 

written by Avinash Bhanu Asha Ghodke 


Wrestler Hamida Banu's black and white pic along with attached Google doodle of her
Wrestler हमीदा बानू यांचे कृष्णधवल चित्र व खाली Google doodle Courtesy Google
 

गुगलने ४ मे ला हे डूडल का प्रसिद्ध केले?  नाही ४मे हा  हमीद बानो यांचा वाढदिवस वगैरे नाही ,तर १९५४ च्या ४ मे या दिवशी समस्त पुरूष पैलवानांना जाहीर आवाहन करून बडोदा येथे हमीदा बानो ने आपला निर्णायक विजय नोंदवला. 


१९५४ चे हमीदा बानो चे ते आवाहन

" जो कुणी पुरूष पैलवान मला कुस्तीच्या रिंगणात हरवले त्याच्याशी मी विवाहबद्ध होईल! " असं फेब्रुवारी १९५४ मधे हमीद बानोने केलं. हमीदा तेंव्हा ऐन चाळिशीत होती. कूश्ती विश्वात ती एक मोठं नाव होती.आवाहनाच्या तीन महिन्यांनंतर दोन पैलवानांनी हमीदाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. एक पटीयालाचा होता व एक कलकत्त्याचा .हमीदाने दोघांना धूळ चारली. बडोद्याच्या छोटा गामा पैलवानाने आता तिला आवाज दिला. छोटा गामा गायकवाड महाराजांच्या छत्रछायेत तालीम करत होता. बडोदा शहर या लढतीसाठी प्रचंड उत्सूक होते  पण ऐन वेळी "मी एका महिलेशी कुस्ती खेळणार नाही" असे कारण देत छोटा गामाने माघार घेतली.

पुढे ४ मे १९५४ रोजी हमीदा बानो ने केवळ 1 मिनिट 34 सेकंदात एका आंतरराष्ट्रीय कुस्ती सामन्यात बाबा पहलवान या नामचीन कुस्तीगीरास कुस्तीच्या आखाड्यात मात दिली.     या नामुष्की नंतर बाबा पहेलवानने पहेलवानकीतून कायमचा संन्यास घेतला. 


महाराष्ट्रात जन्म व पुढे वाटचाल

हमीदाचा जन्म १९१२ ला महाराष्ट्रात झाला.  तिचे कुटुंब पेहलवानीत आधीपासूनच होते. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर तिचे मूळ गाव. मुंबई हून कुटुंब काही वर्षे मिर्झापूरला स्थिरावले व तिथून थोड्या मोठ्या शहरात अलिगढ ला स्थलांतरीत झाले.  इथेच तिला तिचा प्रशिक्षक सलाम पेहेलवान मिळाला. सलाम ने हमीदा ला कठोर परिश्रम करायला लावले व त्याचे फळ हमीदाला मिळाले. तिने अनेक कुस्त्या जिंकल्या व १९३६ च्या बर्लिन आॅलंपीक्स मधे भारतातून जाणारी ती पहिली महिला पेहेलवान ठरली. 

जागतिक मीडिया ने तिला Amazon of Aligadh असे बिरूद दिले. १९४० ते १९५० या काळात हमीदाने ३०० पेक्षा जास्त कुस्त्या मारल्या. १९४४ ची तिची गुंगा पेहलवान बरोबर ची लढत पहायला प्रेक्षक फार उत्सुक होते . २०,००० प्रेक्षक ही कुस्ती पहायला जमा झाले होते  पण गुंगा पहेलवानाने ऐन वेळी अवास्तव वाढीव पैशांची मागणी करत कुस्तीतून माघार घेतली. चिडलेल्या प्रेक्षकांनी स्टेडियमची तोडफोड करून आपला राग व्यक्त केला. 

पुण्याची लढत

पुण्यातील प्रसिद्ध पहेलवान रामचंद्र साळुंखे सोबत ही तिची लढत अशीच ऐनवेळी रद्द झाली. रामचंद्र साळुंखे तयार होते  पण या वेळी स्थानिक कुस्ती फेडरेशनने या पुरूष-महिला कुस्तीस आक्षेप घेत सामना रद्द केला. 



१९५४ ची महत्वाकांक्षा 

१९५४ ला बाबा पहलवान ला हरवल्यानंतर त्याच वर्षी हमीदा बानो ने मातब्बर रशियन महिला कुस्तीगीर वेरा किस्टिलीन हिला 2 मिनिटांपेक्षा कमी वेळेत रिंगणात पछाडले. आता हमीदाला युरोप खुणावत होते.  युरोप दौरा करून पाश्चात्य पैलवानांना तिला लोळवायचे होते.जगज्जेते व्हायचे  होते.  


प्रशिक्षक सलामचा विरोध

पण तिच्या या स्वप्नाला प्रशिक्षक सलाम ने साथ दिली नाही.  सलाम विवाहित होता पण हमीदा लग्नाविना  मुंबईत कल्याण येथे सलामचा डेअरी व्यवसाय सांभाळत त्याच्या सोबत राही असे हमीदाचा दत्तक मुलगाच सांगतो. हमीदाने आता युरोप दौर्‍यावर जावू नये असे सलामचे स्पष्ट मत होते पण हमीद ऐकत नव्हती.  या मुद्यावरून दोघांत तणाव निर्माण झाला. सलाम ने हमीदाला  मारहाण केली . यात तिचा पाय कायमचा अधू झाला.


शेवटचा काळ

इथुन हमीदाची दुर्गती सुरू झाली.  पैलवानकी बंद झाली. डेअरी व भाड्याने दिलेल्या जागे च्या मिळकतीतून गुजराण होयी.  कल्याणमधे कधी ती रस्त्यावर स्टाॅल लावून खाद्यपदार्थ ही विके.  सलाम मरणासन्न होता तेंव्हा ती एकदा अलीगढला जावून आली.  अलिगढ ची Amazon नदी होती ती. तिच्या विशाल पात्रात क्षमा असणारच.

१९८६ साली महाराष्ट्रात कल्याण येथे हमीदाने देह सोडला.

या महाराष्ट्र कन्येस अभिवादन! 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या