Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

Is HYPNOTISM a magic? Abbé Fariya यांनी hypnotism science ला जन्म दिला

 

GOA THE SPELLBOUND connect: गोव्यात जन्मलेल्या आबे फारिया Abbé Faria- FATHER OF HYPNOTISM यांच्या २६८ व्या जयंती निमित्त

 

 

Abbé Faria हे मनोधारणांची जुनी खोडं भाजी सारखी कापणारे संमोहन सम्राट( first Hypnotist of the world) होते. वंशाने पोर्तुगीज असले तरी ते जन्माने गोवेकर(Goan) अर्थात भारतीय होते. एकीकडे ख्रिस्ती धर्म पीठाने त्यांच्यावर अधर्माचा ठपका ठेवला तर दुसरीकडे भारतीयांना ते उपरे वाटत राहिले

Written by Avinash Bhanu Asha Ghodke

Statue and imaginary sketch of Father of Hypnotism Abbé Faria .Courtesy: Google 


वडीलांचे एक वाक्य 

 १७७३ ,  ऐन विशीतला कोवळा गोवेकर पादरी प्रवचन द्यायला उभा राहिला.हे प्रवचन लिस्बन मधे पोर्तुगलच्या राणीपुढे आयोजलं होतं. तरूणाने याआधीच पोप पुढे दिलेलं प्रवचन गाजल्या मुळे हे शाही निमंत्रण राणीसाहेबांकडून आले होतेराणीचा शाही इतमाम अमीर उमरावांचा बढेजाव पाहून तरूण काहीसा भांबावुन सभागृहाच्या मंचकावरून पहात होता . समोरचा शिष्ट जनसमुदाय बघून त्याला काय बोलावे सुचत नव्हते.अशात त्याच्या कानावर शब्द पडले

. "पुताही सोगली बाजीकतोर रे बाजी!! "  

समोर बसलेले वडील त्याला येवून सांगत होते..." पोराही सगळी भाजी आहे रे..  कापून टाक!"   वडिलांचे हे वाक्य ऐक्याचा तरूणाचा धीर एकवटला. एका क्षणात त्याची मानसिकता बदलली. त्याने जनसमुदायाला आपल्या प्रवचनात मंत्रमुग्ध केले . शब्द माणसाच्या मनावर एवढा प्रभाव टाकू शकतात ? हा प्रश्न तरुणाच्या मनात घर करून राहिला . अनेक वर्षांनंतर त्याने या प्रश्नाचे वैज्ञानिक उत्तर शोधले. तो तरूण  होता पोर्तुगीज वंशीय गोवेकर आबे फरीया Abbé Faria. पोर्तुगीज शासन कालात Goa यैथील कांदोळी Candollim गावात जन्मलेल्या Abbé Faria ची ही गोष्ट.

 

गोवा ते लिस्बन मार्गे Paris

३१ मे१७५६ मधे गोव्याच्या कांदोळी Candollim गावचा जन्म .आई वडिलांचं विभक्त होणंमग १५ व्या वर्षी लिस्बन तिथून रोमला जावून वडिलांबरोबर धर्म  शास्त्राची डॉक्टरेट मिळवून पादरी होण्यापर्यंत चा प्रवास त्यांने केला होता. Paris मधे आबे ने खूप प्रसिद्धी मिळवली.पॅरिस शहराचे लोक आबे च्या  flamboyant व्यक्तिमत्वाने  प्रभावित झाले होते ते आबेंची Hypnotism ची व्याख्याने व प्रात्यक्षिके पहायला गर्दी करीत.

 

गोवा जन्मभूमी साठी लढा . Fight for Motherland Goa

Paris हून पुढे गोव्यात परतल्यावर  इथल्या  पोर्तुगीज शासना ला विरोध करणार्या 'Pinto Revolution" या क्रांतीत आबे आपल्या वडिलांबरोबर  सहभागी झाले. पोर्तुगीज वंशीय असले तरी आबे फरीया आपल्या गोवा या मातृभूमीचे ऋण मानत होते .

 

गोव्यातून पुन्हा Paris ला पलायन पुन्हा अटक

 गोव्याच्या पोर्तुगीज सरकारने अटक फर्मान काढल्यामुळे त्यांनी १७८७ मधे पुन्हा पॅरिस गाठले. पुढे 'फ्रेंच राज्यक्रांतीतत्यांनी उडी घेतली. १७९७ मधे त्यांना फ्रेंच राज्यक्रांतीतल्या सहभागामुळे मार्सेल्स Marseille येथे अटक होवून समुद्रातल्या  गढीतील तुरुंगात १० वर्षांची एकांतवासी  कैद भोगावी लागली

 

तुरुंगातील अंधाराने मन: शक्तीचे गुपित उलगडले

 तुरुंगातील अंधार्या काळकोठडीने आबेंना स्वतःच्या अंतर्मनात डोकवायची संधी दिली. इथेच  मानवी मनाच्या असीम आणि गूढ ताकदीचे hypnotical प्रयोग त्यांनी या गढीच्या तुरूंगातील गूढ अंधारात सुरू केले. १० वर्षांचे अथक स्वमनन प्रयोगाअंती सिद्ध झालेली एक 'scientific hypnotical theory' घेवून ते अखेर तुरुंगाबाहेर पडले. संमोहनाचे मूलभूत असे "शास्त्र" आबेंनीच प्रथम जगापुढे मांडलेएव्हाना त्यांनी आपल्या परीचित अशा नाट्यमय आविर्भावात दिलेली hypnotical demonstrations पॅरिस मधे प्रचंड गर्दी खेचू लागली होती

 

संमोहन ही जादू नसून Self Suggestion शास्त्र आहे हे सिध्द केले

 आबे यांच्या आधी मेस्मर यांची 'मेस्मरीझम' ही थियरी संमोहन कलेसाठी प्रचलीत होती ज्यात एका  "अदृश्य नैसर्गिक शक्ती: द्वारे संमोहन अवस्था साधली जाते असे मानले गेले होते ,पण आबे फरिया यांनी ही थियरी अमान्य केलीफरिया यांनी संमोहनाला मनोवैज्ञानिक कक्षेत आणत स्व आज्ञा (self suggestion ) आणि power of imagination मधून संमोहन अवस्था प्राप्त होते अशी नवी प्रणाली जगापुढे मांडली संमोहनाद्वारे मनोविकारांचा ( hypnotics as theropy for psychic disorders)उपचार होतो हे  ही सिद्ध केले

 

ख्रिस्ती धर्मपीठाकडून उपेक्षा भारतीयांसाठी उपरे

 गोव्याच्या कांदोळी गावच्या मुलाला जगाने Father of Hypnotism या उपाधीने गौरवान्वित केले. ख्रिस्ती धर्मपीठाने मात्र या आद्य मनोवैज्ञानिकावर अधर्माचा जादूटोणा करण्याचा ठपका ठेवला. पोर्तुगीज वंशीय असल्यामुळे भारतियांनाही ते विदेशीच वाटत राहिले.  

 

३० सप्टेंबर १८१९ रोजी Abbé Faria आबे फारीया यांचे फ्रांस मधे निधन झाले. Montmartre येथे कुठेतरी त्यांची समाधी आहे असे कळते.

गोव्यात त्यांच्या कांदोळी Candolim या जन्मगावी त्यांचा   पुतळा मुख्य चौकात दिसतो ज्यात ते नाटकीय पद्धतीने एका स्त्री ला संमोहित करत असताना  दिसतात. चौकशी केल्यावर कांदोळी पंचायत कार्यालया जवळ समुद्राच्या बाजूस आबेंचे जन्म घर होते असे कळते.

Abbé Faria या भूमिपुत्राचे कांदोळी(Goa) या जन्मगावी स्मारक व्हावे

आबेंना Goa येथे जन्मून आता २६८ वर्षे झालीत पण आबे फरिया यांचे गोव्यातील  कांदोळी गावात  मोठे स्मारक असे नाही. कांदोळी  पंचायत कार्यालयाला लागून त्यांच्या नावाने एक प्रार्थमिक शाळा सुरू होती पण ती ही अता बंद आहे. या शाळेसमोरच कुठेतरी त्यांचं घर होतं असे कळते

लहानपणी Goa येथे पाहिलेलं कांदोळी च्या सुंदर समुद्र काठाचे hypnotical सौंदर्य हेच आबेंचं  प्रेरणा स्थान असावे हाच समुद्राकाठ आज त्यांचे स्मृती स्मारक आहे असे आपण ही मानायला काय हरकत आहे. मनाची ताकद मोठी असतेमानले की तसे होते. Self suggestion आणि power of imagination मुळे आयुष्य आणि जग बदलता येते असं Abé Faria यांनीच सांगून ठेवलय आणि सिद्ध ही केलय


हे ही वाचा

80s Pop Star  टीना टर्नर चं अध्यात्म  : How Nichiren Buddhism brought peace in Tina Turners life 

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या