Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

आनंद ही आनंद ..The eternal Bliss of an action film maker is his most strongest Villain । Agneepath । kanchaa



AGNEEPATH /आनंद ही आनंद - 
 अग्निपथ च्या संवादा मधला "सच्चिदानंद" शब्द वाचून करण ने सहज विचारले "सच्चिदानंद" मतलब क्या अविनाशजी ?"धर्मा प्रॉडक्शन्स च्या केबिन मधे होमियोपथी च्या गोळ्यांचा डोस हातावर घेत करण मल्होत्रा बोलत होता  .करण च्या या अनपेक्षित अध्यात्मिक प्रश्नाने  माझी व्हीकेट जायचीच पाळी..पण मी सावरलो .करण ला थोडक्यात उत्तर अपेक्षित होतं.मी क्षणात विचार करून म्हटलं "Bliss!! Eternal joy  ..आनंद जो कभी खत्म नही होता " तळहातावरून टेबलावर घरंगळलेली पांढरी गोळी हिकमतीने आडवत तो म्हणाला "अच्छा..!" आता  गोळ्या तोंडात टाकत त्याने दिग्दर्शकाच बेअरिंग सोडलं.. दिलखुलास मिश्कील हसत म्हणाला " मैं तो कांचा हुं..!!"
आपण सच्चिदानंदापेक्षा ऐहीक सुखाचा विचार करतो असं करणला म्हणायचं होतं.अध्यात्मिक शब्दाचा आपण क्षणात अर्थ सांगितला याचा 'विजय' भाव माझ्या चेहर्यावर होताच. प्रेमकथांचे दिग्दर्शक आपल्या नाईकांच्या प्रेमात पडतात पण सूड कथेचा हा दिग्दर्शक खलनायकाच्या आकंठ प्रेमात होता. कांचाने करणला अक्षरशः झपाटून टाकले होते

a trongest undefeatable villain only can make Hero's struggle real and interesting करण ची ही philosophy खूप practicle अशी होती.आपल्या नाईकांच्या सह संवाद लेखक / अग्निपथ  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या