Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

Mozzarella cheese Bhartiya mhashi chya dudha pasun


भारतीय म्हशी हजारो वर्षांपूर्वी Italy ला पोहोचल्या होत्या. प्रसिद्ध Mozzarella cheese साठी दूध द्यायला.

Written by Avinash Bhanu Asha Ghodke 

4500 वर्षांपूर्वी सुमेरियाने केली होती भारतीय म्हशींची आयात-1400 वर्षांपूर्वी पोहोचल्या Italy मधे


Thumbnail collage with Mozzarella and water Buffalo picture
Indian water buffalo 's contribution for Mozzarella 




मेलुहा एक विकसित नागरी संस्कृति 


भारत आणि पाकिस्तान च्या सद्य स्थितीतील नकाशा च्या उत्तर पश्चिम भागांत  4500वर्षांपूर्वी ( 2500 BC )  'मेलुहा संस्कृति'  उदयास आली होती . 

मेलुहा समाज हा व्यापारी समाज होता व त्यांचा उत्तर पूर्वी यूरोपातील 
मेसोपोटीमिया प्रांतातील प्रसिद्ध अशा प्राचीनतम सुमेरियन (दक्षिण इराक़ी ) समाजाशी व्यापारी संबंध होता . सुमेरिया समाज हा जगातील अतीप्राचीन व पहिला विकसित समाज मानला जातो.

जगातीलपहिले लिहिण्याचे तंत्र (Cuneiform )  याच समाजाने विकसित केले आणि त्यांनी लिहून ठेवलेल्या नोंदींमधून हे लक्षात येते की सुमेरियाने भारतीय मेलुहा समाजाकडून 4500 वर्षांपूर्वी म्हशी आयात केल्या होत्या. काही इतिहासकारांच्या मते सुमेरियन नोंदीं मधे आढळणारे मेलुहा हे Indus valley civilization मधील लोक असावेत. Indus valley उत्खननात आढळलेल्या त्या काळातील चलनी नाण्यांवर बैल अंकित केलेला आढळतो जो वरील तर्कास पुष्टी देतो.  आपल्या गाई गुरांना दौलतीचा दर्जा देणारे ते लोक होते . आज आपण " काला अक्षर भैंस बराबर" असं म्हणून म्हशी ला मठ्ठ निरक्षरपणाशी जोडत असलो तरी जगात पहिल्यांदा अक्षरांचा शोध लावणार्या सुमेरियन समाजाने भारतीय म्हशींचं महत्व ओळखून त्यांना आपलेसे केले होते. 


आवार या तुर्की भटक्या जमातीने भारतीय म्हशी इटलीत नेल्या


भारतीय वंशाच्या म्हशी हजारो वर्षे मेसोपोटिमिया (इराण ,इराक ,सीरिया ,तुर्की ) प्रांतात होत्या. टिग्रीस युफराटिस या नद्यांच्या चिखल-पाण्यात डुंबत होत्या . 1400 वर्षांपूर्वी आवार या तुर्की भटक्या जमातीने इटलीतील कंपानिया भागात या म्हशी आपल्या तांड्यासोबत नेल्या . कंपानिया मधे उथळ पानथळ भूभाग भरपूर असल्यामुळे या म्हशी ही तिथे रमल्या . 

Screen shot of Google Map
Route Map-Mohenjo Daro to Naples. Screen shot-Google Maps - credit Google Maps




Mozzarella cheese ची निर्मिती Naples मधे


इटली मधील  कंपानिया तील मुख्यत्वे  Naples या शहरातील लोकांना हे काळ्या म्हशीचे चविष्ट व घट्ट दूध खूप आवडले. कंपानियातील नेपल्स शहरात सर्वात  प्रथम या म्हशींच्या दुधापासून Mozzarella cheese बनवण्यात आले. 

घट्ट दही सुरीने कापण्याच्या क्रीयेला इटालियन भाषेत Mozzare म्हणतात. या शब्दावरूनच Mozzarella शब्द आला . इटलीच्या राष्ट्रीय झेंड्यातील लाल व हिरवा रंग  अनुक्रमे Tomato Sauce आणि Basil पानांनी या Mozzarella cheese मधे आणला व हे Mozzarella cheese इटालियन अस्मितेचे प्रतिक झाले . इटलीची राणी Queen Margarita हिला हे Mozzarella cheese समर्पित केले गेले . म्हशी किंवा buffalo च्या दुधापासून बनवले जाते म्हणून याला इटलीमधे मोझरेला बुफाला (Mozzarella Bufala) असे म्हटले जाते. 

तसे इटलीत गाईंच्या दुधापासून ही Mozzarella cheese बनते पण जी चव म्हशीच्या दुधापासून बनवलेल्या Mozzarella ला असते ती चव गाईच्या दुधापासून बनवलेल्या Mozzarella ला नसते. तसे इटलीत अनेक प्रकारचे Mozzarella बनवले जाते.


पिझा ची जागतिक लोकप्रियता


इटालीयन पिझा आज जगभर पोहोचला आहे. या Pizza चे सर्वात महत्त्वाचे ingredient आहे Mozzarella cheese. Mozzarella शिवाय pizza असूच शकत नाही. 


Mozzarella ची ही unique चव भारतीय म्हशींच्या दुधामुळे मिळाली आहे त्या मुळे यापुढे Pizza चा स्वाद घेताना “say Cheese “ च्या चालीवर  हसून आपण अभिमान ही व्यक्त करू शकतो.


Mozzarella cheese ची काही वैशिष्ट्ये:


  • Texture: मऊ आणि चिवट, विशेषतः फ्रेश मोझारेलाच्या बाबतीत.
  • स्वाद: हलका आणि थोडासा दूधाचा स्वाद.
  • उत्पादन प्रक्रिया: किमान दोन प्रकारची असते -१) फ्रेश २) लो-मॉइश्चर मोझारेला. फ्रेश मोझारेला पाण्यात ठेवली जाते, तर लो-मॉइश्चर मोझारेला पिझ्झा आणि इतर बेक केलेल्या डिशसाठी वापरली जाते.
  • उत्पत्ती: इटलीतील एक पारंपारिक चीझ, विशेषतः नेपल्स प्रदेशात लोकप्रिय.
  • वापर: पिझ्झा, पास्ता, सलाड, आणि कॅप्रीस सलाडमध्ये प्रमुख घटक म्हणून वापरले जाते.
  • पोषक तत्व: प्रोटीन, कॅल्शियम, आणि व्हिटॅमिन्स यांचा चांगला स्रोत.
  • शेल्फ लाइफ: फ्रेश मोझारेला थोडेच दिवस टिकते, तर लो-मॉइश्चर मोझारेला जास्त काळ टिकते.


परामर्श 


इतिहास चाळला की असे connecting point's मिळतात आणि आपल्याला चकित करतात. विमाने आकाशात उडायच्या आधी हजारो वर्षांपूर्वी मानवानेच नाही तर म्हशींनीही स्थलांतरे केली होती . ही स्थलांतरे केवळ डॉलर कमावण्यासाठी साठी नव्हती तर जागतिक संस्कृती च्या भरणं पोषणासाठी होती. Pizza मधील Mozzarella cheese चिवट असते अगदी‌ पुरातन माणसांच्या विजिगिषु वृत्ती प्रमाणे.

हे ही वाचा :

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या