अभिषेक ऐश्वर्या नात्यात करडे रंग ! दोघे Gray Divorce च्या वाटेवर ? काय प्रकरण आहे हे Gray Divorce?
Written by Avinash Bhanu Asha Ghodke
सध्या अभिषेक बच्चन व ऐश्वर्या बच्चन या celebrity couple च्या नात्यात तणाव आल्याचे बोलले जात आहे. या दोघांनीही अनंत अंबानी आणि राधिका अंबानी च्या लग्नाला वेगवेगळी हजेरी लावल्या पासून या चर्चेला अधिकच गहिरा रंग चढला आहे. या गहिर्या चर्चेतूनच 'करड्या रंगाचा घटस्फोट' अर्थात दोघांच्या Gray Divorce च्या शक्यता बोलल्या जात आहेत.
ग्रे डिव्होर्स म्हणजे काय ? : Gray divorce एक परिचय
कायदेशीर व्याख्या
Gray divorce अशी divorce पद्धतीची कुठलीही कायदेशीर व्याख्या कायद्यात नाही . कायदेशीर दृष्ट्या हा सर्वसाधारण Divorce च असतो.
Gray Divorce असे नामकरण का?
Gray अर्थात करडा रंग असा शब्द या नामकरणात येतो याचा संबंध वयाशी आहे. साधारणता पन्नाशी मधे व्यक्तीचे केस पांढरे वा करडे (Gray)होवू लागलेले असतात.अशा वयात जर जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला तर त्यास Gray Divorce म्हटले जावू शकते. या प्रकारच्या डिव्होर्सला “Late Life Divorce” किंवा “ Silver Divorce” असेही म्हणतात.
Gray शब्दाचा वेगळा अन्वयार्थ
Gray किंवा करडा रंग हा काळ्या व पांढर्या रंगांच्या मधील रंग छटा असते. हाच अर्थ पकडून जी गोष्ट पूर्णपणे चांगली(white) ही नसते व पूर्ण पणे वाईट (Black) ही नसते अशा गोष्टिंना Gray संबोधले जाते. उदाहरणार्थ सिनेमातील Gray खलनायक. अशा खलनायकाची कुकृत्ये विशिष्ट परिस्थिती च्या अनुषंगाने काही अंशी योग्य वा justifiable ही असू शकतात. Gray Divorce या संकल्पनेत वया व्यतिरीक्त हा अन्वयार्थ समाविष्ट असण्याची ही शक्यता आहे.
Gray Divorce घेण्याचे प्रमाण
अलीकडच्या दशकात Gray Divorce चे प्रमाण वाढले आहे. १९९० पासून ५० वर्षांवरील लोकांच्या घटस्फोटाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. अमेरिकेत, २०१५ मध्ये ५० वर्षांवरील लोकांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण १००० लोकांमागे १० होते, जे १९९० मध्ये फक्त ५ होते.
Gray Divorce का घेतले जातात?
ग्रे डिव्होर्सची अनेक कारणे असू शकतात पण ५ प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- - मुले शिक्षणासाठी वा व्यवसायासाठी घराबाहेर गेल्यामुळे: मुलांच्या पालनपोषणानंतर एकदा ती मोठी होवून घराबाहेर पडली की जोडप्यांना एकमेकांशी जोडलेले वाटत नाही.
- - दीर्घ काळ नातेसंबंधातील निरसता: दीर्घ काळाच्या नातेसंबंधानंतर एकमेकांमध्ये आकर्षण कमी होऊ शकते.
- - आर्थिक स्वावलंबन: महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यात वाढ झाल्यामुळे त्यांना स्वयंपूर्ण जीवन जगायचे असते.
- - आयुष्याच्या ध्येयांमध्ये बदल: जीवनाच्या उत्तरार्धात लोकांची ध्येय आणि महत्वाकांक्षा बदलू शकतात.
- - आरोग्य समस्या: दीर्घकालीन आरोग्य समस्यांमुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो.
80 च्या दशकातील दिग्दर्शिका अरुणा राजे यांचा Gray Divorce
वरील पाच कारणांमधील पहिल्या कारणाच्या अनुषंगाने Bollywood मधे एक Gray Divorce झाला होता . प्रसिद्ध दिग्दर्शिका अरुणा राजे यांचे पती दिग्दर्शक विकास देसाई यांनी त्यांचा पासून divorce घेतला होता. अरुणा राजे या अर्थपूर्ण चित्रपट बनवणार्या feminist विचारांच्या लेखक दिग्दर्शिका व संकलक आहेत. १९६९ साली FTII मधून चित्रपटाचे तांत्रिक शिक्षण घेणार्या त्या पहिल्या भारतीय चित्रपट तंत्रज्ञ. अरुणा राजेंची ९ वर्षांची मुलगी कॅन्सर ने मृत्यू पावली होती. मुलीचे जाणे हा दोघा ही दांपत्यासाठी मोठा भावनिक धक्का होता. या दु:खाची तीव्रता कमी व्हावी या उद्देशाने दोघांनी सामंजस्याने वेगळे होणे पसंत केले होते.
Gray divorce म्हणजे विभक्त होणे आहे का?
ग्रे डिव्होर्स हे फक्त विभक्त (Seperation)होणे नाही. विभक्त होणे म्हणजे नातेसंबंधात राहून एकमेकांपासून वेगळे राहणे, तर ग्रे डिव्होर्स म्हणजे पूर्णपणे कायदेशीररित्या नातेसंबंध तोडणे अर्थात घटस्फोट घेणे आहे.
अशा डिव्होर्स ची कायदेशीर मान्यता
कायदेशीर दृष्ट्या हा सर्वसाधारण Divorce असतो. समाजमाध्यमांनी वयाच्या विशिष्ट टप्प्यावर हा Divorce घेतला जातो म्हणून याचे Gray Divorce असे नामकरण केले आहे.
होय, ग्रे डिव्होर्सला कायदेशीर मान्यता असते. घटस्फोटासाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर न्यायालयाने त्याला मान्यता दिली जाते.
पाश्चात्य सेलिब्रिटींनी घेतलेले ग्रे डिव्होर्स
अनेक पाश्चात्य सेलिब्रिटींनी ग्रे डिव्होर्स घेतले आहेत. काही उदाहरणे:
- - बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स: २७ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर २०२१ मध्ये विभक्त झाले.
- - अल आणि टिपर गोअर: ४० वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर २०१० मध्ये विभक्त झाले.
- - Hollywood Star अर्नोल्ड श्वार्झनेगर आणि मारिया श्रायव्हर: २५ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर २०११ मध्ये विभक्त झाले.
यापूर्वी झालेले काही Bollywood मधील Gray Divorce
- कमल हसन व वाणी गणपती यांनी लग्नाच्या दहा वर्षांनंतर १९८८ साली स्वैच्छिक घटस्फोट घेतला होता.
- सैफ अली खान व अमृता सिंग यांनी २००४ साली १३ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर घटस्फोट घेतला होता.
- हृतिक रोशन व सुझेन खान यांनी २०१४ साली १४वर्षांच्या सहवासा नंतर Gray Divorce घेतला होता.
- अलीकडेच आमीर खान व किरण राव यांनी २०२१ मधे १५ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर घटस्फोट घेतला होता.
- पूजा भट्ट हिने आपला पती मनीष मखीजा यापासून २०१४ साली असाच Gray Divorce घेतला होता.
मराठी चित्रपट सृष्टीतील Gray Divorce
मराठी चित्रपट सृष्टीत अभिनेते गिरीश ओक यांनी अशा पद्धतीने Divorce घेवून दुसरे लग्न केले होते.
असे Divorce बहुतांश सामंजस्याने घेतले जातात व यात वादाचे मुद्दे सहसा नसतात.
चांगल्या व वाईट बाजू
चांगल्या बाजू:
- आर्थिक स्वातंत्र्य: दोन्ही पार्टनरना स्वतःच्या आर्थिक निर्णयांचा अधिकार मिळतो.
- मानसिक शांती: जर नातेसंबंध तणावपूर्ण असतील तर तणावपूर्ण नातेसंबंधातून मुक्तता मिळते.
- नवीन सुरुवात: आयुष्याची नवीन सुरुवात करण्याची संधी मिळते.
वाईट बाजू:
- आर्थिक आव्हाने: निवृत्तीच्या काळात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.
- मानसिक तणाव: एकटेपणाची भावना निर्माण होऊ शकते.
- कौटुंबिक तणाव: मुलां सोबतच्या व नातवंडांच्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो.
परामर्श
Gray Divorce म्हणा किंवा Divorce म्हणा; ही एक अत्यंत संवेदनशील आणि जटिल प्रक्रिया असू शकते. त्यामुळे, योग्य सल्ला आणि समुपदेशन घेतल्यास या प्रक्रियेतून सकारात्मक आणि समतोल दृष्टिकोन ठेवून निर्णय घेतला जावू शकतो.
0 टिप्पण्या