Hot Posts

New York शहर लढतय 30 लाख उंदरांशी...

Advocate Ujjwal Nikam यांना BJP ची उमेदवारी


The smiling Advocate raising victory sign with both hands
File Pic of Advocate Ujjwal Nikam facing media with Victory sign
Bomb blast  to Ballot box 

एखाद्या व्यक्तीचे नाव उच्चारताच त्या व्यक्तीमत्वाचा essence सांगणारे काही शब्द आठवतात .  एडव्हकेट उज्जवल निकम  असं म्हटलं कीतत्वनिष्ठा राष्ट्रप्रेमहे दोन शब्द सरसावत पुढे येतात

Written by Avinash Bhanu Asha Ghodke 


नामांकित वकील महत्वाचे खटले


उज्जवल निकम या नावाला तसा परिचय देण्याची विशेष आवश्यकता भासत नाही  कारणसिर्फ़ नाम ही काफ़ी हैया स्तराचं ते व्यक्तीमत्व आहे.

एडव्हकेट उज्जवल निकम यांची भारतीय जनमानसात प्रसिद्ध अशी प्रतिमा (Popular Image)निर्माण करणारे महत्वाचे तीन खटले म्हणजे 


१९९३ ची मुंबई बाँब ब्लास्ट केस या अंतर्गत येणारी संजय दत्त ची AK 56 रायफल केस 

) २००६ ची खैरलांजी हत्याकांड केस

२००८ ची पाकिस्तानी आतंकवादी कसाब याची मुंबई हमला केस  


या तीन्ही केस साठी पब्लिक प्राॅसिक्यूटर म्हणूनडव्हकेट उज्जवल निकम यांनी काम पाहिलं होतं . उभ्या भारताचं लक्ष लागलेल्या या केसेस मुळे अख्या भारतात त्यांची जबरदस्त अशी प्रतीमा तयार झाली . आपल्या धारदार खड्या आवाजात जेंव्हा ते टेलिव्हिजन मीडिया ला या केसेस चा गोषवारा देत तेंव्हा समस्त भारतीय कान देवून ऐकत.


इतर महत्वपूर्ण खटले


या वरील तीन  केसेस व्यतिरिक्त त्यांचे इतर अनेक खटले उज्जवल निकम यांच्या झंझावाती कारकिर्दीला आकार देत गेले त्यातील काही म्हणजे


१९९१ कल्याण बॉंब ब्लास्ट केस

१९९७ गुलशन कुमार हत्याकांड केस

२००६ प्रमोद महाजन हत्याकांड केस

२०१६ शक्ती मिल गँगरेप केस



कारकिर्द आलेख


३० मार्च १९५३ ला जळगाव येथेडव्हकेट उज्जवल निकम  यांचा जन्म झाला . वडील देवराव माधवराव निकम ही प्रसिद्द वकील होते त्यामुळे कायद्याचे बाळकडूडव्हकेट उज्जवल निकम यांना लहान वयातच मिळाले. B.S.C. केल्यानंतर त्यांनी S S मणियार लॉ कॉलेज , जळगाव येथून LLB पूर्ण केले जळगावात वकीली सुरू केली१९९१ साला पासून त्यांची मुंबई हायकोर्टातली कारकीर्द सरकारी वकील म्हणून सुरू झाली 



भारत सरकारकडून कार्याची दख़ल


२००९   मुंबईवर आतंकवादी हल्ला करणार्या कसाब लाडव्हकेट उज्जवल निकम यांनी न्यायालयात मरेपर्यंत फाशी ची कठोर शिक्षा मागितली ती मान्य करून घेतली . यानंतरडव्हकेट उज्जवल निकम यांच्या सुरक्षेचा विचार करून भारत सरकारने त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान केली.

२०१२ साली न्यू यॉर्क ,अमेरिकेत United Nations द्वारा आयोजित convention on terrorism या महापरिषदेत त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व करून  वाढत्या अंतरराष्ट्रीय आतंकवादा ला आळा घालण्यासाठी कायदा प्रक्रिया राबवणे संदर्भात  महत्वाचे मार्गदर्शन केले.

२०१६ ला भारत सरकारने  एडव्हकेट उज्जवल निकम यांना  पद्मश्री पुरस्कार देवून गौरवान्वित केले 


२०२४ भाजप कडून लोकसभेची उमेदवारी .

झंझावाती पारदर्शी कारकिर्द असलेला

तत्वनिष्ठ माणूस राजकारणात 


२०२४ ची उत्तर मध्य मुंबई ची  लोकसभा उमेदवारीडव्हकेट उज्जवल निकम  यांना भाजपा कडून जाहीर झाली आणि एक प्रश्न मनात उभा राहिला . एकूणच नैतिकतेचा र्हास होत असलेल्या राजकीय क्षेत्रातडव्हकेट उज्जवल निकम  सारख्या प्रामाणिक व्यक्तीचा टीकाव कसा लागेल . या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या ‘ Kasab biryani controversy’ मधे मिळुन जाते . एडव्हकेट उज्जवल निकम यांनी एकदा जाहीरपणे असे मान्य करून टाकले होते कीकसाबने कारागृहात बिर्यानी ची मागणी केली होतीअसे बनावट विधान मी मिडिया समोर हेतुपुरस्सर केले कारण कसाब बद्दल सहानुभूति  निर्माण करण्याचा प्रयत्न काही स्तरावर होत होता त्याला counter attack करण्यासाठी मला असे विधान करावे लागले असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.


वरील उदाहरण पाहता एडव्हकेट उज्जवल निकम यांचा तत्ववाद वास्तविकतेला धरून उभा रहातो असे दिसते . ‘अंतिम विजयहेच लक्ष मानणारे तार्किक लढवैये ते आहेत . Justice at any cost अशी भूमिका घेणारे डव्हकेट उज्जवल निकम  राजकारणाच्या दलदलीतही 'कमळा' सारखे फुलतील यात शंका नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या